Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Live Breaking News in Marathi: आजपासून दर गुरूवारी पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार

१५ ऑक्टोबर २०२६ च्या महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी. सर्वोच्च न्यायालयाचा रेल्वे प्रवाशांसाठी विमा अनिवार्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय, पुण्यात दर गुरुवारी पाणीकपातीला सुरुवात, आयसीसी रँकिंगमध्ये श्रेयस अय्यरची उत्तुंग झेप आणि सौदी अरामको मुख्यालयावर हुथींचा हल्ला; वाचा आजचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स एकाच ठिकाणी.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 15, 2026 | 10:10 AM
LIVE
Maharashtra Breaking News Today 15.10.2026

Maharashtra Breaking News Today 15.10.2026

Follow Us
Follow Us:
  • 15 Oct 2026 10:10 AM (IST)

    15 Oct 2026 10:10 AM (IST)

    ठाण्यात हत्यासत्र सुरूच? राजकीय नेत्याच्या हत्येनंतर युट्यूबरवर गोळीबार

    ठाण्यातील मनपाडा परिसरात शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच उल्हासनगरमध्ये पुन्हा गोळीबाराचा थरार घडला आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशनबाहेरील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर बुधवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास स्थानिक प्रसिद्ध युट्यूबर हरीश गजवानी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी पाठीमागून येत गजवानी यांच्या डोक्यात अगदी जवळून दोन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे उल्हासनगरसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

  • 15 Oct 2026 10:00 AM (IST)

    15 Oct 2026 10:00 AM (IST)

    India vs West Indies 4th T20 Match: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज चौथ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाचा २४ धावांनी पराभव 

    भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना अत्यंत रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक ठरला. या सामन्यात भारतीय संघाला २४ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले असून, या विजयासह वेस्ट इंडिजने मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. आता मालिकेचा अंतिम फैसला ५ व्या आणि अखेरच्या सामन्यात होणार आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीची चांगलीच धुलाई केली. निर्धारित २० षटकांत ३ गडी गमावून त्यांनी तब्बल २४७ धावांचा डोंगर उभा केला.

  • 15 Oct 2026 09:50 AM (IST)

    15 Oct 2026 09:50 AM (IST)

     Pradeep Purnekar Murder Case : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ॲड. गुणरत्न सदावर्तेंचे अत्यंत स्फोटक आरोप 

    ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात आता राजकीय आणि कायदेशीर पातळीवर मोठे वादळ उठले आहे. मृत प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची ठाण्यातील घरी जाऊन भेट घेतल्यानंतर प्रसिद्ध वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी घेतलेली पत्रकार परिषद सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या पत्रकार परिषदेत ॲड. सदावर्तेंनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेत गंभीर आरोप केले आहेत.

  • 15 Oct 2026 09:40 AM (IST)

    15 Oct 2026 09:40 AM (IST)

    Supreme Court Hearing Gyanesh Kumar:  ज्ञानेश कुमारांविरोधात सुप्रीम कोर्टातील याचिकेवर आज सुनावणी 

    Supreme Court Hearing Gyanesh Kumar:  मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात 'इंडिया' (INDIA) आघाडीने रान उठवले आहे. मतदार याद्यांमधील कथित अनियमितता, मोठ्या प्रमाणावर नावे वगळणे आणि विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांतील ११ प्रमुख नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. या महत्त्वपूर्ण याचिकेवर आज सुनावणी होणार असून संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागले आहे. विरोधी पक्षांच्या तीव्र निदर्शनांनंतर राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

  • 15 Oct 2026 09:30 AM (IST)

    15 Oct 2026 09:30 AM (IST)

    Maharashtra Government Land Disposal Policy Amendment:  राज्य सरकारच्या जमीन विल्हेवाट धोरणात मोठा बदल 

    राज्य सरकारने छोट्या, निरुपयोगी आणि अडकलेल्या (Land-locked) सरकारी जमिनींच्या विल्हेवाट लावण्याच्या धोरणात मोठे बदल करत यासंदर्भातील मर्यादा वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे आता लगतच्या भूखंडधारकांना मिळणाऱ्या सरकारी जमिनींचे क्षेत्रफळ वाढणार आहे.

    ऑगस्ट २०२५ च्या धोरणानुसार, अशा प्रकारच्या जमिनी लगतच्या (शेजारील) भूखंडधारकाला देताना त्याचे क्षेत्रफळ लगतच्या जमिनीच्या एकूण क्षेत्राच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त नसावी, अशी अट होती. मात्र, लोकप्रतिनिधींच्या सततच्या मागणीनंतर सरकारने ही मर्यादा थेट २५ टक्क्यांपर्यंत वाढवली आहे.

  • 15 Oct 2026 09:21 AM (IST)

    15 Oct 2026 09:21 AM (IST)

    CJP Tiranga Lehra Do Movement: १६ऑक्टोबरला सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंच 'लेहरा दो तिरंगा'चं आवाहन

    कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांना जंतरमंतरवर तिरंगा फडकावल्या प्रकरणी आणि घोषणाबाजी केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी  अटक केली. त्यानंतर त्यांना पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीतही पाठण्यात आले आहे. या अटकेच्या विरोधाप्रकरणी  उद्या १६ ऑक्टोबरला सीजेपी प्रमुख अभिजीत दिपके यांनी देशाला "लेहरा दो तिरंगा " या मोहिमेसाठी साद घातली आहे.

    Lehra do Tiranga 🇮🇳

    16 Oct | Central Park, CP | 5 PM https://t.co/eFO1RfUBos

    — Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) October 14, 2026

  • 15 Oct 2026 09:15 AM (IST)

    15 Oct 2026 09:15 AM (IST)

    Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात वारं फिरलं!  सोलापूर, पुणे, कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार बरसण्याची शक्यता

    Maharashtra Weather Update:   राज्यात सध्या हवामानात कमालीची उलथापालथ पाहायला मिळत असून, एकीकडे ऑक्टोबर हीटचा (October Heat) चटका वाढला आहे, तर दुसरीकडे काही भागांत पावसाचे सावट दाटले आहे. राज्यात एकाच वेळी ऊन आणि पाऊस अशी संमिश्र स्थिती निर्माण झाली आहे.

    कोकण आणि किनारपट्टी भागात दमट आणि उष्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा चांगलाच वाढणार असून नागरिकांना घामाच्या धारा सहन कराव्या लागत आहेत. पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या विविध भागांत पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे.

  • 15 Oct 2026 09:05 AM (IST)

    15 Oct 2026 09:05 AM (IST)

    Indian Railways Dynamic Pricing Proposal: आता विमानांप्रमाणे बदलणार ट्रेनच्या तिकिटांचे दर! 

    भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेल्वे प्रवासाच्या तिकीट दरांबाबत एक मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून, आता विमान प्रवासाच्या धर्तीवर रेल्वे तिकिटांचे दरही रोजच्या रोज बदलण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे समजते.

    या नव्या सुत्रानुसार प्रवाशांची वाढती मागणी आणि जागांची उपलब्धता (Demand and Supply) विचारात घेऊन तिकिटांचे दर निश्चित केले जातील. या प्रणालीमुळे आज तुम्ही ज्या दराने तिकीट बुक केले आहे, उद्या त्याच तिकिटाची किंमत मागणीनुसार वाढू शकते किंवा स्वस्तही होऊ शकते.  एअरलाइन्स कंपन्यांप्रमाणेच गर्दीच्या हंगामात किंवा तातडीच्या प्रवासादरम्यान तिकीट दर वाढण्याची शक्यता यात आहे.

  • 15 Oct 2026 09:01 AM (IST)

    15 Oct 2026 09:01 AM (IST)

    Indian Railways: रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमा पॉलिसी

    सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे. त्यानुसार, रेल्वे प्रवासादरम्यान मिळणाऱ्या विम्याच्या नियमांमध्ये आणि उपलब्धतेमध्ये सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या ऑनलाइन रेल्वे तिकीट बुक करताना प्रवाशांना विम्याचा पर्याय मिळतो. हा प्रवास विमा घेणे अजिबात बंधनकारक नाही, तर तो पूर्णपणे ऐच्छिक आहे. प्रवाशाला गरज वाटल्यास तो त्यावर टिक करून हा पर्याय निवडू शकतो.

    या विम्यासाठी प्रति प्रवासी केवळ ४५ पैसे इतका खर्च येतो. हे विम्याचे पैसे तिकीट शुल्कासोबतच ऑनलाइन भरावे लागतात.हा प्रवास विमा रेल्वे प्रवासादरम्यान होणाऱ्या अपघातांसाठी संरक्षण देतो. प्रवासात एखादी दुर्घटना घडल्यास, पीडित प्रवाशाला १० लाख रुपयांपर्यंतची भरपाई मिळू शकते. म्हणजेच, केवळ ४५ पैशांच्या प्रीमियममध्ये १० लाख रुपयांचे संरक्षण मिळणे प्रवाशांच्या फायद्याचे ठरते.

Maharashtra to World Breaking News : 

आगामी पाणीटंचाईच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून आज, १५ ऑक्टोबरपासून दर गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय लागू करण्यात आला आहे. रेल्वे प्रवास सुरक्षित करण्यासाठी आणि अपघाती मदतीसाठी ऑफलाइन तिकीट खरेदी करणाऱ्या सर्व प्रवाशांना रेल्वे विमा अनिवार्य करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश दिले आहेत.

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनानंतर दिल्ली विमानतळाबाहेर CJP नेते अभिजीत दीपके यांना घेरण्याचा प्रयत्न; १६ ऑक्टोबरला ‘कनॉट प्लेस’ येथे नव्या आंदोलनाची घोषणा देण्यात  आला आहे.  भारतीय टी-२० संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने दमदार कामगिरीच्या जोरावर आयसीसी टी-२० फलंदाजी क्रमवारीत चौथ्या स्थानावर झेप घेतली. हुथी विद्रोही गटाच्या हल्ल्यानंतर सौदी अरेबियातील धहरान येथील ‘अरामको’ (Aramco) कंपनीच्या मुख्यालयात भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली.

Web Title: Maharashtra and india breaking news live updates 15 october 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • Maharashtra Breaking News update

संबंधित बातम्या

Maharashtra Live Breaking News in Marathi: आशुतोष रांका, सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी
1

Maharashtra Live Breaking News in Marathi: आशुतोष रांका, सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.