Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: उसाला योग्य दर मिळण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक

३० ऑक्टोबर २०२६ च्या महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी. इस्रोचे NVS-03 नेव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपण, पीएम-किसान योजनेचा २४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, सोलापुरात ऊस दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन आणि भारत-न्यूझीलंड चौथा टी-२० सामना; वाचा सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 30, 2026 | 10:30 AM
LIVE
Maharashtra Breaking News Today 30.10.2026

Maharashtra Breaking News Today 30.10.2026

Follow Us
Follow Us:
  • 30 Oct 2026 10:30 AM (IST)

    30 Oct 2026 10:30 AM (IST)

    स्वानंदी आणि समर आई-बाबा होणार? ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत मोठा ट्विस्ट

    झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ सध्या एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. स्वानंदी आणि समरच्या आयुष्यात आता एका नव्या अध्यायाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. लवकरच स्वानंदी समरला गुड न्यूज देणार का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. नुकत्याच समोर आलेल्या नव्या प्रोमोमुळे मालिकेबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

  • 30 Oct 2026 10:20 AM (IST)

    30 Oct 2026 10:20 AM (IST)

    ठाण्यातील १५ कंत्राटी सफाई कामगारांना दिलासा; थकीत वेतनासह ७.५६ लाख रुपये जमा

    ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत सीवर लाईन, मलटाक्या, चेंबर्स आदींची सफाई करणाऱ्या जेटिंग गाड्यांवरील १५ कंत्राटी सफाई कामगारांना थकीत वेतनाची फरकाची रक्कम व नुकसानभरपाई मिळवून देण्यात श्रमिक जनता संघ युनियनला यश आले आहे. युनियनच्या पाठपुराव्यानंतर ठाणे महानगरपालिका प्रशासनाने संबंधित कामगारांच्या बँक खात्यात एकूण ७ लाख ५६ हजार ७१२ रुपये जमा केले आहेत. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

  • 30 Oct 2026 10:10 AM (IST)

    30 Oct 2026 10:10 AM (IST)

    अबब! 3 लाखांहून अधिक किंमत… नव्या Samsung स्मार्टफोनने हादरलं मार्केट

    टेक कंपनी सॅमसंगने गुरुवारी चीनमध्ये एक प्रिमियम स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Samsung W27 या नावाने लाँच करण्यात आला आहे. चीनमध्ये आयोजित ‘Heart of the World’ ईव्हेंटदरम्यान हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. चीनमध्ये लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन कंपनीच्या ‘बुक-स्टाईल’ फोल्डेबल फ्लॅगशिप, सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्रा वर आधारित आहे. स्मार्टफोनच्या किंमतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

  • 30 Oct 2026 10:00 AM (IST)

    30 Oct 2026 10:00 AM (IST)

    Sanjay Gaikwad Suspension : शेतकऱ्यांबद्दलच्या वादग्रस्त विधान; संजय गायकवाडांवर निलंबनाची कुऱ्हाड! 

    शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांविषयी केलेल्या एका अत्यंत वादग्रस्त विधानामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड संतप्त झाले असून, त्यांनी गायकवाड यांच्या पक्षातून निलंबनाचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

    शेतकऱ्यांबद्दल अनुचित आणि अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली असून पक्षशिस्त आणि शेतकऱ्यांच्या सन्मानाशी तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश दिला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर संजय गायकवाड यांच्या निलंबनाच्या कारवाईचे थेट आदेश जारी केले आहेत.

  • 30 Oct 2026 09:50 AM (IST)

    30 Oct 2026 09:50 AM (IST)

    Ex Bangladesh Air Officer Tahseef Sauri Found Dead: शेख हसीना यांच्या पलायनाचा व्हिडिओ बनवणाऱ्या माजी हवाई दल अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू!  

    बांगलादेशातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना ५ ऑगस्ट २०२४ रोजी देश सोडून जात असताना त्यांच्या पलायनाचा ऐतिहासिक व्हिडिओ शूट करणारे माजी हवाई दल अधिकारी के. एम. तहसीफ सौरी (K. M. Tahseef Sauri) यांचा मृतदेह गुरुवारी (२९ ऑक्टोबर २०२६) ढाका येथील नदीत अत्यंत संशयास्पद स्थितीत सापडला आहे.के. एम. तहसीफ सौरी हे २८ ऑक्टोबर रोजी अचानक बेपत्ता झाले होते. दुसऱ्याच दिवशी ढाक्यातील टोंगी बंदर घाट परिसरातील नदीत त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

  • 30 Oct 2026 09:40 AM (IST)

    30 Oct 2026 09:40 AM (IST)

    Israel Election Result: इस्रायल निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती! १९ जागा जिंकणारे 'अरब पक्ष' ठरले किंगमेकर

    इस्रायलमध्ये २७ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या अत्यंत संवेदनशील सार्वत्रिक निवडणुकीचे अखेर संपूर्ण निकाल समोर आले आहेत. १२० सदस्यांच्या नेसेट (Knesset - इस्रायली संसद) मध्ये सत्तास्थापनेसाठी बहुमताचा ६१ जागांचा आकडा कोणत्याही एका आघाडीला गाठता आलेला नाही, ज्यामुळे देशात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या लिकुड पार्टी (Likud) आणि मित्रपक्षांच्या उजव्या विचारसरणीच्या आघाडीला सर्वाधिक ५३ जागा मिळाल्या आहेत.

  • 30 Oct 2026 09:30 AM (IST)

    30 Oct 2026 09:30 AM (IST)

    पुण्यात ८१.६६ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी CBI ची मोठी कारवाई

    केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पुण्यात एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई करत शहरात विविध ठिकाणी छापे टाकले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून प्राप्त झालेल्या अधिकृत तक्रारीनंतर सीबीआयने ८१.६६ कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणी ही धडक कारवाई केली आहे.

    सीबीआयने या प्रकरणात ‘आज का आनंद पेपर्स प्रा. लि.’ (Aaj Ka Anand Papers Pvt. Ltd.) या कंपनीसह तिच्या संचालकांवर आणि काही अज्ञात सरकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा आणि निधीचा मोठा अपहार (Misappropriation of Funds), खात्यांच्या हिशेबात फेरफार करणे आणि बँकेची थेट फसवणूक केल्याचा गंभीर आरोप कंपनीवर ठेवण्यात आला आहे.

  • 30 Oct 2026 09:20 AM (IST)

    30 Oct 2026 09:20 AM (IST)

    Maharashtra Politics:  'उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात!'  रवींद्र धंगेकरांचा राजकीय बॉम्ब'

    दादर येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावर एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. या दिग्गज नेत्यांनी मंचावरून एकमेकांवर मिश्किल टिप्पण्या आणि राजकीय कोट्या केल्यामुळे बऱ्याच दिवसांनी एक वेगळे राजकीय चित्र पाहायला मिळाले. मात्र, या भेटीच्या अवघ्या २४ तासांत रवींद्र धंगेकर यांनी टाकलेल्या एका 'राजकीय बॉम्ब'मुळे राजकीय वर्तुळात नवा भूकंप आला आहे.दादरमधील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे बंधू (राज-उद्धव) एकत्र आल्यामुळे युती आणि राजकीय समीकरणांच्या नव्या चर्चांना उधाण आले आहे.

  • 30 Oct 2026 09:10 AM (IST)

    30 Oct 2026 09:10 AM (IST)

    Rashid Khan 200 T20I Wickets History: रशीद खानचा आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ऐतिहासिक विक्रम!  

    अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू रशीद खानने (Rashid Khan) आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास रचला आहे. या फॉरमॅटमध्ये २०० बळींचा टप्पा गाठणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला असून त्याने क्रिकेट विश्वात आपल्या नावाचा डंका वाजवला आहे.झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात रशीद खानने हा अभूतपूर्व पराक्रम केला. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात आजवर कोणत्याही गोलंदाजाला २०० बळींचा टप्पा गाठता आलेला नव्हता. रशीदने हा टप्पा ओलांडून अव्वल स्थान पटकावले आहे.

  • 30 Oct 2026 09:00 AM (IST)

    30 Oct 2026 09:00 AM (IST)

    Gokul Milk Union: 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीत मोठा हायड्रॉमा! कोरमअभावी सभा तहकूब 

    कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध 'गोकुळ' (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) अध्यक्षपदाच्या निवडीवरून मोठे राजकीय नाट्य रंगले आहे. बैठकीसाठी आवश्यक असलेली गणपूर्ती (कोरम) पूर्ण न झाल्याने ही विशेष सभा तहकूब करण्यात आली, ज्यामुळे अध्यक्षपदाची निवड रखडली आहे. या घटनेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल केला आहे. आमदार सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे १३ संचालक बैठकीस उपस्थित होते. मात्र, बहुमताचा आकडा असूनही विरोधी संचालक गैरहजर राहिल्याने कोरम पूर्ण होऊ शकला नाही आणि सभा तहकूब झाली."देवेंद्रजी, तुम्ही लोकशाही मानताय की नाही?" असा थेट सवाल करत राजू शेट्टी म्हणाले की, ५ लाख दूध उत्पादक आणि ५,४०० ठरावधारकांचा हा थेट अपमान आहे.

  • 30 Oct 2026 08:53 AM (IST)

    30 Oct 2026 08:53 AM (IST)

    Pune Water Shortage Cancle: दिवाळीत पुण्यातील गुरुवारी होणारी पाणी कपात रद्द 

    दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने (PMC) शहरातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत पुणेकरांची पाण्यासाठी गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेने दर गुरुवारी केली जाणारी पाणी कपात तात्पुरती रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

    स्थायी समितीच्या बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर दिवाळीच्या काळात गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद न ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि संभाव्य टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने गेली दोन आठवडे दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवून पाणी बचतीचे धोरण राबवले होते.

Maharashtra to World Breaking News :

सोलापूर आणि पंढरपुरात उसाला योग्य दर मिळण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून साखर कारखानदारांविरोधात आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून आज ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेचा २४ वा हप्ता जारी करण्यात आला आहे.  देशातील ९.३४ कोटी पात्र शेतकऱ्यांना ₹२००० चा हप्ता हस्तांतरित केला जाणार आहे.

विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीतील वाद उफाळला असून आगामी निवडणुकांच्या धोरणांबाबत सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये बैठकांची सत्रे सुरू झाली आहेत.  भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (ISRO) आज श्रीहरिकोटा येथून GSLV-F18 रॉकेटद्वारे ‘NVS-03’ नेव्हिगेशन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात येणार आहे. 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा टी-२० सामना आज ऑकलंडमधील ईडन पार्क मैदानावर खेळवला जात आहे. डिजिटल ॲडव्हर्टायझिंग एजन्सीशी संबंधित ₹१,००० कोटींच्या खटल्यात ‘मेटा’ (Meta) कंपनीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

Web Title: Maharashtra and india breaking news live updates 30 october 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 08:39 AM

Topics:  

  • Maharashtra Breaking News update

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मीनाक्षी शिंदे यांचा ठाणे जिल्हा महिला प्रमुखपदाचा राजीनामा
1

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मीनाक्षी शिंदे यांचा ठाणे जिल्हा महिला प्रमुखपदाचा राजीनामा

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीध निवडणुकीचे आज निकाल जाहीर होणार
2

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीध निवडणुकीचे आज निकाल जाहीर होणार

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:मध्य रेल्वेची लोकलसेवा अनिश्चित काळासाठी उशिराने
3

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:मध्य रेल्वेची लोकलसेवा अनिश्चित काळासाठी उशिराने

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:  MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड
4

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.