Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपला रामराम, 19 वर्षानंतर राणे पुन्हा शिवसेनेत, कुडाळच्या जागेवर धनुष्यबाण चिन्हावर विधानसभा लढविणार?

भाजप खासदार नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 22, 2024 | 12:45 PM
भाजपला रामराम, 19 वर्षानंतर राणे पुन्हा शिवसेनेत, कुडाळच्या जागेवर धनुष्यबाण चिन्हावर विधानसभा लढविणार?
Follow Us
Follow Us:

माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत. बुधवारी (23 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते कुडाळ येथे प्रवेश करणार आहेत आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात निलेश राणे यांना शिवसेनेकडू (शिंदे गट) उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

नारायण राणे यांनी 2005 मध्ये शिवसेना सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता ते भाजपमध्ये आहेत. तर, नितेश राणे हे भाजपचे आमदार आहेत. निलेश राणे यांनी भाजपसाठीच काम करत होते.मात्र 19 १९ वर्षांनंतर राणे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

नीलेश राणे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, 2019 मध्ये नारायण राणे आणि नितेश राणेंसोबत भाजपमध्ये आलो. पक्षप्रवेश केल्यापासून भाजपची शिस्त शिकायला मिळाली. देवेंद्र फडणवीसांनी मला लहान भावासारखं सांभाळलंय. मी उद्या दुपारी 4 वाजता शिंदे गटात प्रवेश करणार आहे,” असं निलेश राणे पत्रकार परिषदेत म्हणाले. “उद्या कुडाळच्या मैदानात सभा असून तिथेच शिंदे गटात प्रवेश करणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक मी जिंकणार,” असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला.

तसेच उद्या 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील सहकारी यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे प्रवेशाची सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत कुडाळ मतदारसंघातून आम्हाला 27 हजारांचं मताधिक्य मिळालं. 90 टक्के ग्रामपंचायत, खरेदी-विक्री संघ, बाजार समिती, कृषी सोसायटीवर आमची सत्ता आहे. त्यासह लोकसभेलाही आमचा खासदार निवडून आला आहे. महायुतीत आम्ही सगळ्या निवडणुका जिंकल्या. विधानसभाही आम्ही जिंकणार आहोत,” असा विश्वास नीलेश राणे यांनी व्यक्त केला.

गेल्या काही वर्षांपासून नीलेश राणे यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ भाजपाची बांधणी केली आहे. याचे सकारात्मक परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आले. कुडाळ मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांना 26 हजार 136 मतांचे बहुमत मिळाले होते. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आग्रही राहिले होते. मात्र महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे जाणार असल्याने, निलेश राणे यांना शिवसेनेत घेऊन धनुष्यबाणावर निवडणूकीत उतवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Maharashtra assembly elections 2024 nilesh rane poised to join shiv sena and contest from kudal constituency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 12:23 PM

Topics:  

  • BJP
  • nilesh rane
  • shivsena

संबंधित बातम्या

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी
1

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
2

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
3

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?
4

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.