Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आगामी काळात शरद पवार आणि अजित पवार…”; काय म्हणाले विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे?

अण्णा बनसोडे यांच्या प्रयत्नातून पिंपरी- चिंचवडच्या वल्लभ नगर बस डेपोला नव्या कोऱ्या पाच एसटी बस शासनाकडून मिळाल्या आहेत. त्याच उद्घाटन अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आलं.

  • By तेजस भागवत
Updated On: May 13, 2025 | 08:02 AM
“आगामी काळात शरद पवार आणि अजित पवार…”; काय म्हणाले विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे?
Follow Us
Follow Us:

पिंपरी: विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याबाबत वक्तव्य केले आहे. पण त्यांना कुणीतरी एकत्र येऊ देत नाही. त्यांच्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम कुणीतरी करत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तो मिठाचा खडा कोण टाकणारा आहे, ते पत्रकारांनी शोधून काढावं, मात्र आगामी काळात नक्कीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र दिसतील अशी आशा अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली  आहे.

अण्णा बनसोडे यांच्या प्रयत्नातून पिंपरी- चिंचवडच्या वल्लभ नगर बस डेपोला नव्या कोऱ्या पाच एसटी बस शासनाकडून मिळाल्या आहेत. त्याच उद्घाटन अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अण्णा बनसोडे यांनी स्वतः एसटी बसचं सारथ्य केलं. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी एसटी बसचं स्टिअरिंग हातात घेतलं.

राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत दोन दिवसांपूर्वी शरद पवार वक्तव्य केलं होत. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत उत्सुकता लागली आहे. याबाबतचे सर्व अधिकार हे सुप्रिया सुळे यांना दिल्याचं बोललं जात आहे. यावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी परखड मत व्यक्त केलं आहे.” माझी आधीपासून शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं अशी भूमिका आहे.” आता दोन्हीकडील आमदार आणि खासदारांची भूमिका देखील तीच आहे.

शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले, तर महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल. एकत्र येण्याबाबत आमच्यात काही चर्चा झालेली नाही. या दोघांमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम कुणीतरी करत आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही. आगामी काळात नक्कीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र दिसतील अशी आशा देखील अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.

शरद पवार अजित पवार एकत्र येणार…?

राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवासांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रीया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट ही कौंटुबिक फूट आहे. त्यामुळे ते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. पण त्यांच्या या विधानामुळे मात्र राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

Sharad Pawar-Ajit Pawar News: शरद पवार अजित पवार एकत्र येणार…?शिंदे गटाच्या नेत्याचे सूचक विधान

माध्यमांशी संवाद साधताना संजय शिरसाट म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी दोन्ही काँग्रेससोबत युती करणं हेच चुकीचंच होतं. हे आम्ही त्यांना आधीपासूनच सांगत होते. पण आता त्यांना त्याचा प्रत्यय येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवाले तुमच्यासोबत जास्त दिवस राहणार नाहीत. हेच आम्ही त्यांना अनेकदा सांगत होतो. पण आता जसजसे त्यांचे भविष्य अंधारमय होत आहे. तसतसे ते टीका करत आहेत. राष्ट्रवादीतील ही फूट कौटुंबिक मानली जात असली तरी ते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Web Title: Maharashtra assembly vice president anna bansode statement about ajit pawar and sharad pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Anna Bansode
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका
1

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका

Supriya Sule Meets PM Modi: सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे ८ खासदार आज पंतप्रधान मोदींना भेटणार
2

Supriya Sule Meets PM Modi: सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे ८ खासदार आज पंतप्रधान मोदींना भेटणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.