Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आनंदाची बातमी – ज्येष्ठ निरुपणकार आणि समाजसेवक अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे पुत्र आप्पासाहेब धर्माधिकारीही समाज प्रबोधनाच्या कार्यात अग्रेसर आहेत. अध्यात्म, पर्यावरण, व्यसनमुक्ती आणि आरोग्य क्षेत्रात धर्माधिकारी आणि त्यांच्या अनुयायांचं काम मोठ्या प्रमाणात आहे.

  • By साधना
Updated On: Feb 08, 2023 | 02:12 PM
eknath shinde and devendra fadnavis with appasaheb dharmadhikari

eknath shinde and devendra fadnavis with appasaheb dharmadhikari

Follow Us
Follow Us:

मुंबई: ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan To Appasaheb Dharmadhikari) पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केले. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेतली. समाजप्रबोधनात धर्माधिकारी घराण्याचं मोठं योगदान आहे. विशेषत: रायगड, ठाणे जिल्ह्यात त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येनं आहेत.

पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म 14 मे 1946 रोजी झाला. गेली 30 वर्ष ते निरुपण करत असून अंधश्रध्दा,बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या. आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले.

डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडच्या काळात संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय वृक्षसंवर्धन,तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही नियमितरीत्या करण्यात येते. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवनंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात

रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. बालपणापासून त्यांना कीर्तन ,भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. याशिवाय त्यांना मैदानी खेळ व पोहणेही आवडायचे. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे. या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी ह्यांनी 1943 सालापासून केली होती आणि आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत.

वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे पुत्र आप्पासाहेब धर्माधिकारीही समाज प्रबोधनाच्या कार्यात अग्रेसर आहेत. अध्यात्म, पर्यावरण, व्यसनमुक्ती आणि आरोग्य क्षेत्रात धर्माधिकारी आणि त्यांच्या अनुयायांचं काम मोठ्या प्रमाणात आहे. राज्यात अनेक ठिकाणी वृक्षारोपण, रक्तदान शिबिरं, निशुल्क वैद्यकीय शिबीरे, रोजगार मेळावे, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती यात आप्पासाहेब धर्माधिकारी यांचं मोठं योगदान आहे. याआधी २०१७ साली त्यांना पद्मश्री या भारतीय नागरी सन्मानांही गौरवण्यात आलेलं आहे.

Web Title: Maharashtra bhushan award declaired to aapasaheb dharmadhikari nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2023 | 02:09 PM

Topics:  

  • appasaheb dharmadhikari
  • Cm Eknath Shinde
  • Marathi News
  • Raigad News

संबंधित बातम्या

Nagpur Police :डेटाच्या आधारे ठरणार पोलिसांचे संख्याबळ; मुंबईच्या धर्तीवर ‘अर्बन पोलिसिंग’
1

Nagpur Police :डेटाच्या आधारे ठरणार पोलिसांचे संख्याबळ; मुंबईच्या धर्तीवर ‘अर्बन पोलिसिंग’

Nagpur News : पाण्यासाठी हाहाकार ;मनपा बेफिकीर
2

Nagpur News : पाण्यासाठी हाहाकार ;मनपा बेफिकीर

Ahilyanagar News: केंद्रीय पथक थेट बांधावर; अहिल्यानगरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
3

Ahilyanagar News: केंद्रीय पथक थेट बांधावर; अहिल्यानगरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

Raigad News: पनवेलकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! जय भारत नाक्यावरील अडथळे हटवले, आयुक्त मंगेश चितळे यांची कारवाई
4

Raigad News: पनवेलकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! जय भारत नाक्यावरील अडथळे हटवले, आयुक्त मंगेश चितळे यांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.