Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीला चालना; बायोगॅस धोरण जाहीर, ५०० कोटींची गुंतवणूक

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून यामुळे पर्यावरण, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात बदल घडण्याची शक्यता आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 23, 2026 | 01:20 PM
कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीला चालना; बायोगॅस धोरण जाहीर, ५०० कोटींची गुंतवणूक

कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीला चालना; बायोगॅस धोरण जाहीर, ५०० कोटींची गुंतवणूक

Follow Us
Follow Us:
  • पर्यावरणपूरक उपाययोजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे.
  • उद्योगविकास आणि रोजगार निर्मितीस चालना देणारे निर्णय घेण्यात आले.
  • शिक्षण क्षेत्रातील काही महत्त्वाच्या मागण्यांनाही दिलासा देण्यात आला आहे.
कचरा साठल्यामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्या आणि पाण्याच्या स्त्रोतांचे प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण, २०२६ राबविण्यास बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी २०२६-२७ या वर्षात ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शहरांतील कचऱ्याची विल्हेवाट पर्यावरणपूरक पध्दतीने लावणे शक्य होणार आहे. या धोरणाच्या अंतर्गत कॉम्प्रेस्ड बॉयोगॅसच्या गरजेनुरूप वापरण्यायोग्य गॅस उपलब्ध होण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान वापरून प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली. धोरणांच्या अंमलबजावणीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे. असे प्रकल्प पीपीपी आणि हायब्रिड अॅन्युएटी तत्वावर राबविण्यात येणार आहे.

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार किती मतांनी निवडून येणार ? रोहित पवार म्हणाले…

प्रकल्पासाठी २०० टन प्रतिदिन क्षमेतचा निकष

कॉम्प्रेस्ड बॉयोगॅस प्रकल्पांसाठी किमान २०० टन प्रतिदिन क्षमतेचा निकष ठेवण्यात आला आहे. हे प्रकल्प स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि उपक्रम, खासगी विकासक आणि तेल व वायू वितरण कंपन्यांमार्फत ग्रीनफिल्ड किंवा ब्राऊनफिल्ड स्वरूपात राबविता येतील, ज्या ठिकाणी पुरेसा कचरा उपलब्ध नाही तिये क्लस्टर-आधारित प्रकल्प तसेच कृषि उत्पादक संस्थाच्या मदतीने कृषितील टाकाऊ घटकांचे एकत्रिकरण करून प्रकल्प उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे.

साताऱ्यात आयटी पार्क

राज्य मंत्रिमंडळाने सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे आय. टी. पार्कला जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे, औद्योगिक विकास महामंडळास ४२. ५५ हेक्टर जमीन देण्यात येईल. सातारा जिल्हा आणि परिसरातील आयटी क्षेत्राला प्रोत्साहन, युवकांना रोजगार-व्यवसायाच्या संधी निर्माण होतील.

सात आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना दिलासा

उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सात आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना आता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेतन दिले जाणार आहे. या शिक्षकांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आगामी पदभरती प्रक्रियेमध्ये अतिरिक्त गुण दिले जातील.

मोहोळमध्ये श्री नागनाथ महाराज यात्रेदरम्यान पेहरावावरून वाद; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मिरवणूक शांततेत

जमिनीचे रूपांतर करण्याबाबतच्या अधिमुल्याची पुनर्रचना

राज्यातील जमीन धारणा मर्यादेच्या नियमानुसार, ‘भोगवटादार वर्ग-२’ मधून ‘भोगवटादार वर्ग – १’ मध्ये जमिनीचे रूपांतर करण्याबाबतच्या अधिमुल्याची पुनर्रचना करण्यात आली आहे. अधिसूचना लवकरच निर्गमित करण्यास मान्यता दिली आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Maharashtra biogas policy 2026 cabinet decisions it park education reforms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • Government
  • investment
  • maharashtra

संबंधित बातम्या

Manisha Kayande : सोलापूर ITI मध्ये १५० मुलींच्या कथित धर्मांतरण छळाचा आरोप; विधान परिषदेत डॉ. मनीषा कायंदे यांचा गौप्यस्फोट
1

Manisha Kayande : सोलापूर ITI मध्ये १५० मुलींच्या कथित धर्मांतरण छळाचा आरोप; विधान परिषदेत डॉ. मनीषा कायंदे यांचा गौप्यस्फोट

Alibaug News : हलगर्जीपणाचा फटका! अपूर्ण पुलामुळे देहेन गावाचा संपर्क तुटला, ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
2

Alibaug News : हलगर्जीपणाचा फटका! अपूर्ण पुलामुळे देहेन गावाचा संपर्क तुटला, ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल

RTO Employees Strike : आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे; राज्यातील परिवहन विभागाचे कामकाज पूर्ववत सुरू होणार
3

RTO Employees Strike : आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे; राज्यातील परिवहन विभागाचे कामकाज पूर्ववत सुरू होणार

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी! वर्षाअखेरीस प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत वीज पोहोचवण्याचे लक्ष्य
4

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी! वर्षाअखेरीस प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत वीज पोहोचवण्याचे लक्ष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.