Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Marathi news Live Blog- भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाने सव्वा-सव्वा वर्षांच्या सूत्रावर सहमती दर्शवत महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 05, 2026 | 09:55 AM
LIVE
Maharashtra breaking News Marathi

Maharashtra breaking News Marathi

Follow Us
Close
Follow Us:
  • 05 Feb 2026 09:55 AM (IST)

    05 Feb 2026 09:55 AM (IST)

    सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला घाई, मग विमान अपघाताच्या चौकशीला विलंब का

    मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. अजित पवारांच्या या विमान अपघातावर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहेत. अजित पवार यांचे शेवटचे संभाषण व्हायरल झाले आहे. पण ब्लॅकबॉक्समधील संभाषण अद्याप जाहीर झालेले नाही व चौकशीही होत नाही, हा विलंब अनाकलनीय आहे. त्यामुळे संशय बळावत चालला आहे. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला घाई केली गेली. मग विमान अपघाताच्या चौकशीला विलंब का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

  • 05 Feb 2026 09:50 AM (IST)

    05 Feb 2026 09:50 AM (IST)

    PM Kisan Scheme : ५० लाख शेतकऱ्यांचा 'पीएम किसान' हप्ता धोक्यात 

    पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या बिहारमधील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी आहे. राज्यातील सुमारे ५० लाख शेतकऱ्यांनी अद्याप आपले 'शेतकरी ओळखपत्र' तयार केलेले नाही. जर पुढील तीन दिवसांत हे कार्ड बनवले नाही, तर या शेतकऱ्यांना २२ व्या हप्त्यापासून मुकावे लागण्याची शक्यता आहे.

    केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आता शेतकरी ओळखपत्र अनिवार्य केले आहे. ओळखपत्र नसल्यास योजनेची रक्कम बँक खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने आपली नोंदणी पूर्ण करून ओळखपत्र मिळवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांचे कार्ड अद्याप प्रलंबित आहे, त्यांचा हप्ता तांत्रिक कारणास्तव अडकू शकतो.

  • 05 Feb 2026 09:40 AM (IST)

    05 Feb 2026 09:40 AM (IST)

    भाजप आणि ठाकरे गटाकडून नगरसेवकांना मुंबई न सोडण्याचे आदेश

    BMC Mayoral Election:  मुंबईच्या महापौरपदासाठी ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असल्याचे निश्चित झाले असून, या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. आपल्या नगरसेवकांनी मुंबई सोडून जाऊ नये आणि फुटू नये, यासाठी भाजप आणि शिवसेना (उबाठा) या दोन्ही पक्षांनी कडक आदेश जारी केले आहेत.

    महापौरपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी भाजप-शिवसेना महायुतीमध्ये सत्तावाटपावरून खलबते सुरू आहेत. केवळ महापौरच नाही, तर स्थायी आणि सुधार समितीसह इतर महत्त्वाच्या समित्यांच्या पदांसाठीही चढाओढ पाहायला मिळत आहे. ७ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने, त्यापूर्वीच नावांची निश्चिती करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे.

  • 05 Feb 2026 09:30 AM (IST)

    05 Feb 2026 09:30 AM (IST)

    WPL 2026: दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये

    WPL 2026: दिल्ली कॅपिटल्स संघाने वूमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) इतिहासात सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक मारून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे, यंदा जेमिमाह रॉड्रिग्स हिने आपल्या नेतृत्वाखाली पहिल्याच प्रयत्नात दिल्लीला जेतेपदाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले आहे.

    गेल्या तीन हंगामांत अंतिम फेरी गाठूनही दिल्लीला एकदाही ट्रॉफी उंचावता आलेली नाही. त्यामुळे यंदा चौथ्या प्रयत्नात ही प्रतीक्षा संपवण्याची सुवर्णसंधी दिल्लीकडे आहे. अंतिम सामन्यात त्यांच्यासमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (RCB) कडवे आव्हान असणार आहे. आता जेमिमाह रॉड्रिग्स दिल्लीचा अंतिम सामन्यातील पराभवाचा इतिहास बदलून संघाला पहिले जेतेपद मिळवून देणार का, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

  • 05 Feb 2026 09:25 AM (IST)

    05 Feb 2026 09:25 AM (IST)

    Gold and Silver Rate:  गोल्ड आणि सिल्व्हर ETF मध्ये ७ ते ९ टक्क्यांची वाढ

    Gold and Silver Rate:  जर तुम्ही सोने किंवा चांदीच्या ETF (Exchange Traded Funds) मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ४ फेब्रुवारी रोजी देशांतर्गत कमोडिटी मार्केटमध्ये सोने आणि चांदीच्या किमतीत जोरदार वाढ झाली असून, त्याचे थेट प्रतिबिंब ETF मार्केटवर दिसून येत आहे.

    गेल्या काही दिवसांतील घसरणीनंतर आज बाजारात पुन्हा एकदा तेजी परतली आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात सिल्व्हर ETF मध्ये ९ टक्के, तर गोल्ड ETF मध्ये ७ टक्क्यांची प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे. या दरवाढीमुळे गुंतवणूकदारांचा ओढा ETF खरेदीकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. किमतींमधील या अचानक झालेल्या बदलामुळे कमोडिटी मार्केटमध्ये मोठी खळबळ उडाली असून, भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने हे संकेत महत्त्वाचे मानले जात आहेत.

  • 05 Feb 2026 09:20 AM (IST)

    05 Feb 2026 09:20 AM (IST)

      शरद पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट

    Sharad Pawar Meets Dy. CM Sunetra Pawar:  राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरची ही पहिलीच सदिच्छा भेट असली, तरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या भेटीला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

    या भेटीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, यावेळी शरद पवारांसोबत संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होते. यामध्ये रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार, श्रीनिवास पवार आणि राजेंद्र पवार यांचा समावेश होता. मात्र, या महत्त्वाच्या कौटुंबिक आणि राजकीय भेटीत खासदार सुप्रिया सुळे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येणार का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

  • 05 Feb 2026 09:15 AM (IST)

    05 Feb 2026 09:15 AM (IST)

    India-America Trade Deal:  भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार?

    India-America Trade Deal: रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या कारणावरून अमेरिकेने भारतावर लादलेल्या ५० टक्के टॅरिफमध्ये ७ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भारतावरील मूळ टॅरिफ २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आला आहे, मात्र २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ अजूनही कायम असल्याने भारताला एकूण ४३ टक्के टॅरिफ भरावा लागणार आहे.

  • 05 Feb 2026 09:10 AM (IST)

    05 Feb 2026 09:10 AM (IST)

    Parth Pawar Mundhva Land Case: मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना  क्लीन चीट

    Parth Pawar Mundhva Land Case: पुण्यातील मुंढवा येथील बहुचर्चित महार वतन जमीन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विकास खारगे समितीने मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर समितीने पार्थ पवार यांना 'क्लीन चीट' दिली आहे. या व्यवहाराशी संबंधित कोणत्याही अधिकृत कागदपत्रावर पार्थ पवार यांचे नाव किंवा स्वाक्षरी नसल्याचे समितीने आपल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. या निर्णयामुळे पार्थ पवार यांच्यावरील आरोपांचे मळभ आता दूर झाले आहे.

  • 05 Feb 2026 09:05 AM (IST)

    05 Feb 2026 09:05 AM (IST)

    Pune-Mumbai Expressway: पुणे-मुंबई एक्सप्रेसवे वाहतूक ३२ तासांनंतर पूर्ववत

     पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ अपघातग्रस्त झालेला गॅस टँकर तब्बल ३२ तासांच्या अथक परिश्रमानंतर बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले आहे. बुधवारी रात्री १ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास चार मोठ्या हायड्रोलिक क्रेनच्या सहाय्याने हा टँकर हटवण्यात आला. या मोहिमेनंतर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत झाली असून खोळंबलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. अत्यंत धोकादायक परिस्थितीत प्रशासनाने ही कामगिरी फत्ते केल्याने एक्सप्रेसवेवरील वाहतुकीचा कोंडीचा प्रश्न सुटला आहे

Maharashtra to World Breaking News: 

भाजपचा प्लॅन यशस्वी होणार? महापौरपदासाठी भाजपला राष्ट्रवादीची साथ

अमरावती : महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या अगदी पूर्वसंध्येला राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. भाजप, युवा स्वाभिमान पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील राजकीय खेळीमुळे उपमहापौरपदाच्या निवडणुकीत अनिश्चितता निर्माण झाली आहे. भाजपचा महापौरपदावरील विजय मात्र जवळपास निश्चित मानला जात आहे. अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी शुक्रवारी निवडणूक होणार आहे. त्याआधीच राजकीय समीकरणे रंगतदार वळणावर पोहोचली आहेत. महापौरपदासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे.

Web Title: Maharashtra breaking maharashtra breaking news live today marathi maharashtra zilla parishad election 2026 maharashtra politics national international politics war sports wpl updates crime updates to

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 08:57 AM

Topics:  

  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! सुनेत्रा पवार यांना पुन्हा शपथ घ्यावी लागणार? वकिलाचे थेट राज्यपालांनाच पत्र
1

मोठी बातमी ! सुनेत्रा पवार यांना पुन्हा शपथ घ्यावी लागणार? वकिलाचे थेट राज्यपालांनाच पत्र

भाजपचा प्लॅन यशस्वी होणार? महापौरपदासाठी भाजपला राष्ट्रवादीची साथ; पण उपमहापौरपदासाठी आता…
2

भाजपचा प्लॅन यशस्वी होणार? महापौरपदासाठी भाजपला राष्ट्रवादीची साथ; पण उपमहापौरपदासाठी आता…

Baramati Plane Accident: बारामती विमान अपघातप्रकरणी अरविंद सावंतांची मोठी मागणी; तांत्रिक त्रुटींकडेही वेधलं लक्ष
3

Baramati Plane Accident: बारामती विमान अपघातप्रकरणी अरविंद सावंतांची मोठी मागणी; तांत्रिक त्रुटींकडेही वेधलं लक्ष

Maharashtra Politics: लाडकी बहीण योजनेबाबत ‘ही’ मोठी मागणी; CM फडणवीस म्हणाले, “अनेक…”
4

Maharashtra Politics: लाडकी बहीण योजनेबाबत ‘ही’ मोठी मागणी; CM फडणवीस म्हणाले, “अनेक…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.