Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Top Live Stories Today: रशियाने इराणच्या नव्या नेतृत्वाचे स्वागत केले असले तरी, नाटोने आर्क्टिक प्रदेशात आपले लष्करी सराव सुरू केल्याने जागतिक राजकारणात ध्रुवीकरण अधिक गडद होताना दिसत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 10, 2026 | 06:23 PM
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra to World Breaking News:

Iran-Israel War : अमेरिकेला युद्धामुळे दिवसेंदिवस बसतोय  मोठा फटका

वॉशिंग्टन : अमेरिका-इस्त्रायलच्या इराणवरील हल्ल्यामुळे एक नवीन जागतिक संकट निर्माण झाले आहे. जगात कुठेही युद्ध सुरू झाले की, लोक सामान्यतः बॉम्बस्फोट, क्षेपणास्त्र हल्ले आणि सैन्य तैनातीवर लक्ष केंद्रित करतात. परंतु, प्रत्येक युद्धाचा आणखी एक पैलू असतो जो बहुतेकदा कमी दिसून येतो. हा पैलू म्हणजे त्याचा आर्थिक खर्च. इराणशी सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकेच्या लष्करी कारवायांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

The liveblog has ended.
  • 10 Mar 2026 06:22 PM (IST)

    10 Mar 2026 06:22 PM (IST)

    Maharashtra Governor oath-taking : महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल! जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी सोहळा पार

    Maharashtra Governor : मुंबई : महाराष्ट्राच्या संवैधानिक पदाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. त्रिपुराचे प्रमुख नेते आणि ज्येष्ठ राजकारणी जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल (Maharashtra Governor) म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मुंबईतील लोकभवन (पूर्वीचे राजभवन) येथे झालेल्या एका भव्य समारंभात त्यांना मुंबई (Mumbai News) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी शपथ दिली.

  • 10 Mar 2026 06:17 PM (IST)

    10 Mar 2026 06:17 PM (IST)

    Indian Railway News: भारतीय रेल्वेसाठी ७६५ कोटींचा बूस्टर डोस; मुंबईसह अनेक विभागांचे होणार आधुनिकीकरण

    भारतीय रेल्वेची पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने ७६५ कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवला आहे. रेल्वेचे संचालन अधिक सुलभ करणे, मालवाहतुकीची क्षमता वाढवणे आणि रेल्वेच्या महत्त्वाच्या विभागांमध्ये आधुनिक दळणवळण यंत्रणा विकसित करणे, हा या प्रकल्पांचा मुख्य उद्देश आहे.

  • 10 Mar 2026 06:11 PM (IST)

    10 Mar 2026 06:11 PM (IST)

    ‘वॉर रूम’आणि पॉलिसी-आधारित विकास मॉडेलमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती; देवेंद्र फडणवीस

    मुंबई, दि. ९ : महाराष्ट्राच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘वॉर रूम’ प्रणाली आणि पॉलिसी-आधारित विकास मॉडेल या शासनाच्या कामकाजात वेग, पारदर्शकता आणि परिणामकारकता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण संकल्पना ठरत असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

  • 10 Mar 2026 05:50 PM (IST)

    10 Mar 2026 05:50 PM (IST)

    नांदेड मनपाच्या पहिल्या सभेला १६ तारखेचा मुहूर्त; स्थायी समिती, शिक्षण समिती सदस्यांची निवड होणार

    नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेला अखेर मुहूर्त मिळाला आहेे. येत्या सोमवारी म्हणजे दि.१६ मार्च रोजी महापौर कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता सभेस सुरूवात होणार आहे. या सभेच्या विषयपत्रिकेवर केवळ चार विषय ठेवण्यात आले आहेत. स्थायी समितीच्या १६ तर महिला बालकल्याण समितीच्या ११ सददस्यांची निवड या सभेत केली जाणार आहे. तौलनिक संख्याबळानुसार भाजप, शिवसेना महायुतीचे १० सदस्य निवडले जाणार असून काँग्रेस वंचित बहुजन आघाडी व एमआयएमचे प्रत्येकी ३ सदस्य राहणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट व अपक्ष नगरसेवकास स्थायी समितीत संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • 10 Mar 2026 05:45 PM (IST)

    10 Mar 2026 05:45 PM (IST)

    महाराष्ट्र साखर हंगाम २०२६: १२६ कारखान्यांची धुराडी बंद

    राज्यातील चालू साखर गाळप हंगाम संपन्न होण्याच्या टप्प्यात आहे. यंदा सुरू झालेल्या २१० सहकारी व खासगी साखर कारखान्यांपैकी आतापर्यंत १२६ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे १ हजार १० लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून ९५ लाख ६९ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा सरासरी ९.७४ टक्के साखर उतारा नोंदवला गेला आहे. साखर आयुक्तालयाकडून या वर्षी २१० कारखान्यांना गाळपाचे परवाने दिले गेले होते. पावसाळा लांबल्यामुळे हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता होती, मात्र मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत १ नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला.

  • 10 Mar 2026 05:40 PM (IST)

    10 Mar 2026 05:40 PM (IST)

    इंधन टंचाईचे सावट गडद! पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक; परराष्ट्र आणि पेट्रोलियम मंत्र्यांसोबत खलबते

    मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा थेट फटका आता भारतातील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे देशात एलपीजी (LPG) सिलेंडची टंचाई निर्माण झाली असून, केंद्र सरकारने (Central Goverment) परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘एस्मा’ (ESMA – अत्यावश्यक सेवा संरक्षण कायदा) लागू केला आहे. घरगुती ग्राहकांना गॅसचा पुरवठा विस्कळीत होऊ नये, यासाठी सरकारने हा कठोर निर्णय घेतला आहे.

  • 10 Mar 2026 05:35 PM (IST)

    10 Mar 2026 05:35 PM (IST)

    मां कालीचे ‘हे’ मंदिर आहे अतिशय खास; 1800 पायऱ्या चढून गेल्यावर मिळते तंत्र-मंत्रापासून मुक्ती!

    देशातील प्रत्येक मंदिराचा इतिहास आपल्या पुराणांशी जोडलेला आहे. प्रत्येक मंदिराचे महत्त्व आणि इतिहास दर्शविणाऱ्या पौराणिक कथा आहेत, ज्यामुळे प्रत्येक मंदिर इतर मंदिरांपेक्षा वेगळं ठरतं.  प्रत्येक मंदिराची अशी अख्यायिका आहे. 51 शक्तीपीठांमध्ये समाविष्ट असलेले गुजरातमधील पंचमहल जिल्ह्यात बांधलेले माँ कालिका मंदिर स्वतःमध्ये विशेष आहे. नवरात्रीत, भाविक 800 मीटर उंचीवर पायी चढून आईचे दर्शन घेण्यासाठी या मंदिरात पोहोचतात. असं मानलं जातं की मनापासून दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या सर्व इच्छा आई पूर्ण करते. यावेळी चैत्र नवरात्र गुरुवार, 19 मार्चपासून सुरु होत आहे. नवरात्रीला मां कालीच्या मंदिरात मोठी गर्दी होते.

  • 10 Mar 2026 05:30 PM (IST)

    10 Mar 2026 05:30 PM (IST)

    ‘गुढीपाडवा, प्रवेश वाढवा’ अभियान! जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढवण्यासाठी विशेष उपक्रम

    जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीसह पुढील सर्व वर्गांत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढावेत आणि एकही विद्यार्थी शिक्षणाबाहेर राहू नये, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने ‘गुढीपाडवा, प्रवेश वाढवा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर या अभियानाची सुरुवात करण्यात येत असल्याची माहिती संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे यांनी दिली.

  • 10 Mar 2026 05:25 PM (IST)

    10 Mar 2026 05:25 PM (IST)

    ‘वाराणसी’ साठी ग्लोबल ब्रँड पार्टनरशिप; SKY BLUE सिनेमॅटिक्सकडे एक्सक्लूसिव राइट्स, 120 देशांमध्ये होणार रिलीज

    दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या “वाराणसी” या बॉलीवूड चित्रपटासाठी एक मोठी धोरणात्मक भागीदारी जाहीर करण्यात आली आहे. या करारांतर्गत, स्काय ब्लू सिनेमॅटिक्सला चित्रपटासाठी विशेष जागतिक ब्रँड एकत्रीकरण अधिकार देण्यात आले आहेत. ही धोरणात्मक भागीदारी मोठ्या बजेटच्या चित्रपटांमध्ये ब्रँड्सचा समावेश करण्याच्या पद्धतीत बदल करू शकते. चित्रपटांमध्ये सामान्यतः ब्रँड्स केवळ उत्पादन प्रिंट म्हणून दाखवले जातात, परंतु या प्रकल्पात त्यांना कथेत समाकलित करण्याची योजना आहे.

  • 10 Mar 2026 05:20 PM (IST)

    10 Mar 2026 05:20 PM (IST)

    लई अवघड रे गड्या! छत्री, रेनकोट सोडा अन्…; देशात यंदा उष्णतेचा कहर असणार

    भारतीय हवामान विभागाने मार्च ते मे या कालावधीसाठीचा हंगामी तापमान आणि पावसाचा अंदाज नुकताच जाहीर केला. यंदा देशातील उन्हाळा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मार्च ते मे २०२६ या कालावधीत देशातील बहुतांश भागांत कमाल तसेच किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. काही भागांत उष्णतेच्या लाटांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

  • 10 Mar 2026 05:15 PM (IST)

    10 Mar 2026 05:15 PM (IST)

    परदेशात शिक्षण घ्यायचे आहे? जागतिक स्तरावर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध

    आजच्या काळात नोकरी मिळवणे जितके कठीण झाले आहे, तितकेच योग्य शिक्षण आणि कौशल्य मिळवणेही महत्त्वाचे झाले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक तरुणाची अशी इच्छा असते की त्याला चांगल्या पगाराची आणि सुरक्षित भवितव्य देणारी नोकरी मिळावी. त्यामुळे अनेक विद्यार्थी आता परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा पर्याय निवडत आहेत. परदेशातील काही अभ्यासक्रम असे आहेत ज्यामुळे जागतिक स्तरावर करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होतात.

  • 10 Mar 2026 05:10 PM (IST)

    10 Mar 2026 05:10 PM (IST)

    ममता बॅनर्जींना दिलासा की धक्का? बंगालमध्ये ५७ लाख मतदार अर्जांचे भवितव्य आता न्यायाधिकरणाच्या हाती

    पश्चिम बंगालमधील मतदार यादीच्या विशेष सखोल फेरनिरीक्षण (SIR) प्रक्रियेवरून सुरू असलेल्या वादात सर्वोच्च न्यायालयाने आज एक मोठा निर्णय दिला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना, न्यायालयाने या प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षता राखण्यासाठी ‘अपीलीय न्यायाधिकरण’ (Appellate Tribunal) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

  • 10 Mar 2026 05:04 PM (IST)

    10 Mar 2026 05:04 PM (IST)

    ‘Dhurandhar 2’ च्या ट्रेलरनंतर आणखी एक सरप्राईज; रणवीर सिंगचा रिव्हेंज अवतार, नव्या पोस्टरने वेधलं लक्ष

    बॉलीवूडचा पॉवरहाऊस अभिनेता रणवीर सिंग त्याच्या आगामी अॅक्शन-सीक्वल “धुरंधर २: द रिव्हेंज” द्वारे बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करण्यासाठी सज्ज आहे. निर्मात्यांनी अलीकडेच एक अतिशय तीव्र आणि गडद पोस्टर रिलीज केले, ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. पोस्टर शेअर करताना रणवीरने त्याला “देव रागावत आहे” असे कॅप्शन दिले आहे. ही एक ओळ चित्रपटाची गंभीरता आणि अॅक्शन पातळी स्पष्टपणे दर्शवते. पोस्टरमध्ये रणवीरचा लूक खूपच हिंसक दिसत आहे, ज्यामुळे असे दिसून येते की यावेळी कथा आणखी आक्रमक असेल.

  • 10 Mar 2026 04:50 PM (IST)

    10 Mar 2026 04:50 PM (IST)

    शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर; २ लाखांची मदत अपुरी?

    राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली असली तरी अनेक शेतकऱ्यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. वाढत्या शेतीखर्चामुळे आणि मोठ्या प्रमाणावर असलेल्या कर्जामुळे दोन लाखांची मर्यादा अपुरी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांचे कर्ज तीन ते चार लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे. अशा परिस्थितीत फक्त दोन लाख रुपये माफ झाल्यास उर्वरित कर्जाचा भार कायम राहणार असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे सरकारने संपूर्ण कर्जमाफी किंवा किमान कर्जमाफीची मर्यादा वाढवावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.

  • 10 Mar 2026 04:45 PM (IST)

    10 Mar 2026 04:45 PM (IST)

    नगरपालिकेत वेगळे… पण पंचायत समितीत महायुती एकत्र!

    चिपळूण पंचायत समितीच्या सत्ताबदलाच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोकहिताचे निर्णय प्रभावीपणे घेण्यासाठी सत्तेत एकत्र असणे गरजेचे असल्याचे मत पंचायत समिती सदस्य विनोद झगडे यांनी व्यक्त केले. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष एकत्र नसला तरी आता महायुतीच्या माध्यमातून चिपळूण पंचायत समितीचा कारभार चालवणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, उपसभापती संदेश उर्फ बापू आयरे यांनीही आपल्या प्रतिक्रिया देताना सत्ताकाळ कितीही कमी असला तरी जनतेची कामे करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. सव्वा वर्ष असो किंवा दीड वर्ष, मिळालेल्या उपसभापती पदाच्या संधीचे सोने करून विकासकामांना प्राधान्य देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • 10 Mar 2026 04:40 PM (IST)

    10 Mar 2026 04:40 PM (IST)

    कोकणातील केमिकल कंपनीमुळे माणसांचं आरोग्य धोक्यात?

    कोकणातल्या लक्ष्मी ऑर्गेनिक केमिकल कंपनीकडून उत्पादित PFAS हे रसायन नष्ट होत नाहीत आणि त्याचं विघटनसुद्धा होत नाही. हे रसायन दीर्घकाळ पर्यावरणात टिकून राहतात तसेच परिसरातील पर्यावरण, भूजल, जलस्रोत तसेच स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर अत्यंत गंभीर व दीर्घकालीन दुष्परिणाम करत असल्याचा दावा माजी कामगार मंत्री हुसेन दलवाईं यांनी केला आहे.

  • 10 Mar 2026 04:35 PM (IST)

    10 Mar 2026 04:35 PM (IST)

    महिलांच्या कर्तृत्वाला सलाम, भेलसईत बचत गटांचा विशेष सन्मान सोहळा

    खेड तालुक्यातील भेलसई गावात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील महिला बचत गटांच्या पुढाकारातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, त्याबाबत यावेळी माहिती देण्यात आली. महिला दिनाचे औचित्य साधत गावातील शिक्षण, सामाजिक कार्य, उद्योजकता आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमातून महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला तसेच बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण कसे घडत आहे याचा आढावा घेण्यात आला.

  • 10 Mar 2026 04:30 PM (IST)

    10 Mar 2026 04:30 PM (IST)

    कुडाळ पोलिसांचा मोठा दणका! ७ लाखांच्या दारूसह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्यांवर कुडाळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी मुंबई-गोवा महामार्गावर सापळा रचून शाबाज अब्दुल गोरे (माणगाव, कुडाळ) आणि अभिषेक भालचंद्र चव्हाण (कुणकेश्वर, देवगड) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या आयशर टेम्पोमधून सुमारे ७ लाख २० हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली असून वाहनासह एकूण १७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

  • 10 Mar 2026 04:25 PM (IST)

    10 Mar 2026 04:25 PM (IST)

    नालासोपाऱ्यात पहाटे भीषण आग! प्लास्टिक व भंगार गोदामे जळून खाक

    नालासोपारा पूर्व येथील धानिव बाग तलावाजवळील भंगार गल्ली परिसरात आज पहाटे सुमारे ४.२० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ३ ते ४ गोदामे जळून खाक झाली आहेत. गोदामांमध्ये प्रामुख्याने भंगार आणि चप्पलांचा व्यवसाय असल्याने आग वेगाने पसरली. वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या ३ अग्निशमन गाड्या आणि ४ पाण्याचे टँकर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून सध्या कूलिंगचे काम सुरू आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही, आणि संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास सुरू आहे.

  • 10 Mar 2026 04:20 PM (IST)

    10 Mar 2026 04:20 PM (IST)

    कोकणातील आंबा-काजू बागायतदार आक्रमक

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खराब हवामानामुळे केवळ ५ ते १० टक्के आंबा उत्पादन शिल्लक राहिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी १२ मार्च रोजी सिंधुदुर्गात मोर्चार्चे आयोजन करण्यात आले आहे. आंबा-काजू बागायतदारांचा हा मोर्चा यशस्वी करून दाखवू असा विश्वास शेतकरी नेते संजय गावडे यांनी व्यक्त केला आहे.

  • 10 Mar 2026 04:15 PM (IST)

    10 Mar 2026 04:15 PM (IST)

    नवी मुंबईत घरगुती गॅससाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा

    नवी मुंबईत घरगुती गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सिलेंडर मिळवण्यासाठी गॅस एजन्सीवर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

  • 10 Mar 2026 04:06 PM (IST)

    10 Mar 2026 04:06 PM (IST)

    वसई विरारमधील CC OC प्रकरण विधानसभेत

    वसई-विरार महानगरपालिकेतील सीसी (Commencement Certificate) आणि ओसी (Occupancy Certificate) प्रकरण विधानसभेत गाजले. आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा मुद्दा उपस्थित करत अभय योजना लागू करण्याची मागणी केली. तसेच या प्रकरणातील संभाव्य घोटाळ्याची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. विभागीय आयुक्तांच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे.

  • 10 Mar 2026 03:50 PM (IST)

    10 Mar 2026 03:50 PM (IST)

    Porsche Car Accident प्रकरणातील विशाल अग्रवालला दिलासा?

    Supreme Court On Vishal Agrwal: कल्याणीनगर येथे पोर्शे कार अपघात प्रकरण घडले होते. अल्पवयीन आरोपीने वेगाने गाडी चालवून दोन जणांना उडवले होते. त्यानंतर त्याच्या आई- वडिलांना देखील अटक झाली होती. अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालला सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. अनेक अटीशर्तींसह कोर्टाने जामीन दिल्याचे समोर येत आहे. सुप्रीम कोर्टाने पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी आणि प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवालला दिलासा दिला आहे. कोर्टाने विशाल अग्रवालला नियमित जामीन मंजूर केला आहे. तब्बल 22 महीने विशाल अग्रवाल तुरुंगात होता. न्यायलाईन कोठडीत असल्याने त्यांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाल्याचे म्हटले जात आहे.

  • 10 Mar 2026 03:40 PM (IST)

    10 Mar 2026 03:40 PM (IST)

    Pakistan Crisis : ट्रम्प यांची जी हूजुरी अंगाशी!

    Pakistan News in Marathi : इस्लामाबाद : अमेरिका-इस्रायलने इराणव केलेल्या भीषण हल्ल्यानंतर संपूर्ण मुस्लिम जगात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात इराण सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Aytollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे इराण आक्रमक झाला असून तीव्र युद्ध सुरु आहे. दरम्यान या युद्धाचे पडसाद शेजारील देशांमध्ये देखील पडताना दिसत आहे. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर भारतासह, जगभरातील शिया मुस्लिमांनी अमेरिका-इस्रायलचा तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानमध्ये याविरोधात आंदोलनेही काढण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आणि लष्करप्रमुख असीम मुनीर देखील टीकेचे धनी बनले आहेत. शाहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांना ट्रम्प यांची चापलूसी अंगसट आल आहे.

  • 10 Mar 2026 03:30 PM (IST)

    10 Mar 2026 03:30 PM (IST)

    Chanakya Niti : लोकं तुमचा टिशू पेपरसारखे वापर करतात का?

    Chanakya Niti : एखाद्याला तुमचे काम करायला लावण्याची प्रक्रिया, जेव्हा ते घडत असते तेव्हा हाताळणीसारखी वाटत नाही. ती सल्ल्यासारखी वाटते. असे वाटते की ही व्यक्ती माझ्याबद्दल काळजी करत आहे आणि इतर कोणाचीही नाही. जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटेल तेव्हा प्रभाव तुमच्या विचारात आधीच रुजलेला असतो. शतकांपूर्वी, आचार्य चाणक्य यांनी इशारा दिला होता की सर्वात धोकादायक हाताळणी शत्रूंकडून केली जात नाही तर मानवी कमकुवतपणा आपल्यापेक्षा चांगले समजणारे लोक करतात. चाणक्य यांनी राजे, मंत्री, कुटुंबे, मैत्री आणि राजदरबारातील युतींचा अभ्यास केला. त्यांनी असा निष्कर्ष काढला की लोक कमकुवत असल्याने सत्ता गमावत नाहीत, तर जेव्हा दुसऱ्याचा प्रभाव त्यांच्या स्वतःच्या निवडींवर मात करतो तेव्हा ते ओळखण्यात अयशस्वी होतात.

  • 10 Mar 2026 03:20 PM (IST)

    10 Mar 2026 03:20 PM (IST)

    ‘घबाडकुंड’ चित्रपटातून मराठीत ‘युनिव्हर्स’ची सुरुवात

    बॉलीवूड आणि हॉलिवूडमध्ये गाजलेल्या चित्रपटांच्या ‘युनिव्हर्स’ संकल्पनेची आता मराठी चित्रपटसृष्टीतही दमदार एन्ट्री होत आहे. परस्परांशी जोडलेल्या कथानकांमधून वेगवेगळ्या चित्रपटांची एक भव्य गोष्ट सादर करण्याचा अनोखा प्रयत्न ‘घबाडकुंड’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत पहिल्यांदा होणार आहे. हा युनिव्हर्स चित्रपट प्रेक्षकांना थरार आणि रहस्य याचा रंजक सिनेमॅटिक अनुभव देणार आहे. अनेक कथा, रहस्य आणि पात्रं यांना एकाच धाग्यात गुंफणारा हा अनोखा प्रयोग प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे. 

  • 10 Mar 2026 03:10 PM (IST)

    10 Mar 2026 03:10 PM (IST)

    गर्लफ्रेंडसोबत स्टंट करणं चांगलंच महागात पडलं, Video Viral

    सोशल मिडियावर व्हायरल होण्यासाठी अनेक लोक काही ना काही स्टंट्स करुन लोकांना थक्क करण्याचा आणि त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा विचार करत असतात. अशात अलिकडेच स्टंट करताना तरुणासोबत घडलेल्या एका जीवघेण्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, प्रियकर आपल्या प्रयसीला मानेवर उचलक स्टंट करण्याचा प्रयत्न करतो आणि यातच मोठी दुर्घटना घडते. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच शेअर केला जात आहे. चला यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

  • 10 Mar 2026 03:01 PM (IST)

    10 Mar 2026 03:01 PM (IST)

    Bihar Crime: शिक्षकानेच अल्पवयीन विद्याथीनिवार केला लैंगिक अत्याचार

    बिहार: बिहार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी त्या शिक्षकाला अटक केली आहे. ही घटना बिहारमधील बेगुसराय येथील ही घटना आहे. रविवारी सायंकाळी उशिरा पुस्तके दाखवण्याचे कारण सांगून या शिक्षकाने घरात घुसून १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलगी जेव्हा फाटलेल्या कपड्यांसह रडत घराबाहेर आली, तेव्हा तिच्या कुटुंबियांना धक्काच बसला. आरोपी शिक्षक घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच गावकरी आणि कुटुंबीयांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक करून तुरुंगात धाडले आहे.

  • 10 Mar 2026 02:50 PM (IST)

    10 Mar 2026 02:50 PM (IST)

    आदिवासींच्या डोक्यावरील हंडा उतरेना!

    सतीश फापाळे/ घारगाव: संगमनेर तालुक्यातील पठार भागात पाणलोट क्षेत्र विकासासाठी आदर्श मानले जाणारे म्हसवंडी गाव आज वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. गावाने जलसंधारणाच्या कामांत उल्लेखनीय यश मिळवले असले, तरी याच गावातील आदिवासी वाड्या-वस्त्यांवरील सुमारे दीड हजार आदिवासी नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी एक ते दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे ‘हंडाभर पाण्यासाठीची वणवण कधी थांबणार?’ असा सवाल येथील आदिवासी समाज उपस्थित करत आहे.

  • 10 Mar 2026 02:45 PM (IST)

    10 Mar 2026 02:45 PM (IST)

    ट्रम्प यांची जी हूजुरी अंगाशी! पाकिस्तानचे PM शाहबाज विरोधात देशात संतापाची लाट

    अमेरिका-इस्रायलने इराणव केलेल्या भीषण हल्ल्यानंतर संपूर्ण मुस्लिम जगात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात इराण सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Aytollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे इराण आक्रमक झाला असून तीव्र युद्ध सुरु आहे. दरम्यान या युद्धाचे पडसाद शेजारील देशांमध्ये देखील पडताना दिसत आहे. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर भारतासह, जगभरातील शिया मुस्लिमांनी अमेरिका-इस्रायलचा तीव्र निषेध केला आहे.

  • 10 Mar 2026 02:40 PM (IST)

    10 Mar 2026 02:40 PM (IST)

    Porsche Car Accident प्रकरणातील विशाल अग्रवालला दिलासा?

    Supreme Court On Vishal Agrwal: कल्याणीनगर येथे पोर्शे कार अपघात प्रकरण घडले होते. अल्पवयीन आरोपीने वेगाने गाडी चालवून दोन जणांना उडवले होते. त्यानंतर त्याच्या आई- वडिलांना देखील अटक झाली होती. अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालला सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. अनेक अटीशर्तींसह कोर्टाने जामीन दिल्याचे समोर येत आहे.

  • 10 Mar 2026 02:35 PM (IST)

    10 Mar 2026 02:35 PM (IST)

    रहस्य, थरार आणि भव्य कथा; ‘घबाडकुंड’ चित्रपटातून मराठीत ‘युनिव्हर्स’ची सुरुवात

    बॉलीवूड आणि हॉलिवूडमध्ये गाजलेल्या चित्रपटांच्या ‘युनिव्हर्स’ संकल्पनेची आता मराठी चित्रपटसृष्टीतही दमदार एन्ट्री होत आहे. परस्परांशी जोडलेल्या कथानकांमधून वेगवेगळ्या चित्रपटांची एक भव्य गोष्ट सादर करण्याचा अनोखा प्रयत्न ‘घबाडकुंड’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत पहिल्यांदा होणार आहे. हा युनिव्हर्स चित्रपट प्रेक्षकांना थरार आणि रहस्य याचा रंजक सिनेमॅटिक अनुभव देणार आहे. अनेक कथा, रहस्य आणि पात्रं यांना एकाच धाग्यात गुंफणारा हा अनोखा प्रयोग प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.

  • 10 Mar 2026 02:30 PM (IST)

    10 Mar 2026 02:30 PM (IST)

    कृतिका कामरा आणि गौरवचं लग्नाचं अनोखं निमंत्रण

    टीव्ही स्टार कृतिका कामरा आणि क्रिकेट होस्ट गौरव कपूर यांच्या लग्नाने बॉलीवूडमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. ११ मार्च २०२६ रोजी गौरवच्या मुंबईतील घरी झालेल्या नोंदणीकृत लग्नानंतर, १२ मार्च रोजी होणाऱ्या पार्टीचे आमंत्रण सोशल मीडियावर आले आहे. या निमंत्रणाने त्याच्या मजेदार आणि विचित्र भाषेमुळे लक्ष वेधले आहे, जे या जोडप्याच्या मजेदार केमिस्ट्रीचे प्रतिबिंब आहे.

  • 10 Mar 2026 02:25 PM (IST)

    10 Mar 2026 02:25 PM (IST)

    पुढील पाच वर्षांत 8 आयसीसी स्पर्धा खेळल्या जातील…

    २०२६ चा टी२० विश्वचषक संपला आहे आणि पुढचा आयसीसी कार्यक्रम कधी आणि कुठे खेळला जाईल हे जाणून घेण्यासाठी सर्वांना उत्सुकता आहे. जर तुम्हाला वाटत असेल की पुढचा आयसीसी कार्यक्रम २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक असेल, तर तुम्ही चुकीचे आहात. पुढील पाच वर्षांत आठ आयसीसी ट्रॉफी निश्चितच धोक्यात आहेत, परंतु पुढचा आयसीसी ट्रॉफी हा एकदिवसीय विश्वचषक नसेल. पुढील आयसीसी ट्रॉफी जून २०२७ मध्येच अनावरण केली जाईल, जेव्हा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना होईल.

  • 10 Mar 2026 02:20 PM (IST)

    10 Mar 2026 02:20 PM (IST)

    विशाखा सुभेदारचा मुलगा कुवेतमधून सुखरुप मायदेशी परतला

    अमेरिका इस्त्रायल आणि इराण यांच्या सुरू असलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेकडो भारतीय नागरिक वेगवेगळ्या आखाती देशांमध्ये अडकले होते. यामुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठी चिंता होती.. यातच मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार देखील कुवेतमध्ये अडकला होता.

  • 10 Mar 2026 02:15 PM (IST)

    10 Mar 2026 02:15 PM (IST)

    अज्ञात वाहनाच्या धडकेत ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू

    बारामती: बारामती तालुक्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. जळगाव क. प. गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या राज्य मार्गावर सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका ग्रामसेवकाचा जागोच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संतप्त ग्रामस्थांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

  • 10 Mar 2026 02:10 PM (IST)

    10 Mar 2026 02:10 PM (IST)

    या स्वस्त प्लॅनमध्ये मिळणार 14 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडीटी

    सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल त्यांच्या यूजर्ससाठी सतत नवीन रिचार्ज प्लॅन्स आणि ऑफर्स घेऊन येत असते. आता पुन्हा एकदा कंपनी त्यांच्या यूजर्ससाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. कंपनीने त्यांच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी 14 दिवसांनी वाढवली आहे. ही ऑफर यूजर्ससाठी मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे. या ऑफरबाबत कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. कंपनीच्या या ऑफरअंतर्गत आता यूजर्सना स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये 14 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे.

  • 10 Mar 2026 02:03 PM (IST)

    10 Mar 2026 02:03 PM (IST)

    26 बिनविरोध…; आता राज्यसभेच्या ‘या’ ११ जागांसाठी होणार निवडणूक

    राज्यसभा निवडणुकीच्या १० राज्यांतील ३७ जागांपैकी २६ जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सातही उमेदवारांचा समावेश असून, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले पुन्हा एकदा राज्यसभेवर जाणार आहेत. उर्वरित ११ जागांसाठी आता १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. बिनविरोध निवड झालेल्या नेत्याला कोणताही विरोध नव्हता.

  • 10 Mar 2026 01:55 PM (IST)

    10 Mar 2026 01:55 PM (IST)

    RTO कडून ‘अभय योजना’ प्रस्तावित; वेळेत दंड भरल्यास सवलतीची शक्यता

    ई-चलानच्या मुद्द्यावरून राज्यातील परिवहन क्षेत्रात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. बस, ट्रक, टॅक्सी आणि ऑटो-रिक्षा यांसारख्या विविध परिवहन संघटनांनी ई-चलानमध्ये दिलासा देण्याच्या मागणीसाठी अलीकडे आंदोलन छेडले होते. त्यानंतर राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आंदोलन स्थगित करण्यात आले. यानंतर परिवहन विभागाने राज्य सरकारकडे एक प्रस्ताव पाठवला असून, त्यात परिवहन वाहनांवर आकारण्यात आलेल्या ई-चलानपैकी ५० टक्के दंड माफ करण्याची तसेच ‘अभय योजना’ लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

  • 10 Mar 2026 01:50 PM (IST)

    10 Mar 2026 01:50 PM (IST)

    कर्नाटक हादरलं! पतीचा खून करून ‘हार्ट अटॅक’चा बनाव

    कर्नाटक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकरासोबत मिळून प्रेयसीने हत्या केल्याचे समोर आले आहे. पतीच्या मृत्यूला हार्ट अटॅक असल्याचा बनाव करण्यात आला होता, मात्र हार्ट अटॅक नसून थंड डोक्याने केलेली हत्या असल्याचे समोर आले आहे. ही घटना महिन्याभरानंतर समोर आली. जाणून घ्या या प्रकरणाचा उलगडा कसा करण्यात आला.

  • 10 Mar 2026 01:45 PM (IST)

    10 Mar 2026 01:45 PM (IST)

    Right To Education प्रवेशाबाबत राज्य सरकारला हायकोर्टाचा झटका

    राज्य सरकारने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळांमध्ये प्रवेशासाठी काही अटींसह अधिसूचना जारी केली आहे. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत एक अधिसचूना जारी केली होती. या शाळेच्या १ किमी परिघात राहणाऱ्यांनाच RTE अंतर्गत प्रवेश दिला जाईल, असे नमुद करण्यात आले होते. पण या अधिसूचनेला आव्हान देत आशिष फुलझेले, वैभव कांबळे, अनिकेत कुत्तरमारे आणि इतरांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत या जाटक अटींना विरोध केला होता.

     

  • 10 Mar 2026 01:40 PM (IST)

    10 Mar 2026 01:40 PM (IST)

    विशाखा सुभेदारचा मुलगा कुवेतमधून सुखरुप मायदेशी परतला

    अमेरिका इस्त्रायल आणि इराण यांच्या सुरू असलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेकडो भारतीय नागरिक वेगवेगळ्या आखाती देशांमध्ये अडकले होते. यामुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठी चिंता होती.. यातच मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार देखील कुवेतमध्ये अडकला होता. दहा दिवसांपूर्वी तो लंडनला जात होता मात्र मध्य पूर्वेतील तणावामुळे त्याचे विमान कुवेतमध्ये उतरले. तिथे तो हॉटेमध्येच राहत होता. आपल्या मुलाला सुखरूप मुंबईत परत आणण्यासाठी सुरेखा सुभेदारने सरकारकडे विनंती केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना आश्वासनही दिलं होते. अभिनेत्री विनंतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: विशाखा सुभेदार यांना फोन केला होता.

  • 10 Mar 2026 01:35 PM (IST)

    10 Mar 2026 01:35 PM (IST)

    : ‘तेलाचा एक थेंबही नेऊ देणार नाही…’ , अमेरिकेच्या धमकीवर इराणचं आर-पार उत्तर

    अमेरिका इराण तणाव (US Iran War) आता धोकादाक वळणावर येऊन पोहचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या विध्वंसक इशाऱ्यानंतर इराणनेही सडेतोड उत्तर दिले आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला तेल पुरवठा बंद केल्यास किंवा जागतिक उर्जा सुरक्षेला पुन्हा धोका निर्माण केल्यास मोठ्या हल्ल्याची धमकी दिली होती. दरम्यान त्यांच्या या धमकीवर इराणचे रिव्होल्यूशनरी गार्डने कडक इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, होमुर्झच्या सामुद्रधनी तेला एक थेंबही नेऊ दिला जाणार नाही, वाहतूक तर सोडाचय इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे जागतिक स्तरावर पुन्हा एकदा इंधन संकट ओढवण्याची शक्यता आहे.

  • 10 Mar 2026 01:25 PM (IST)

    10 Mar 2026 01:25 PM (IST)

    BCCI ने T20 World Cup 2026 विजेत्या संघासाठी बक्षीस रक्कमेची केली घोषणा

    टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. भारताच्या संघाने या विश्वचषकामध्ये फक्त एक सामना गमावला होता. याव्यतिरिक्त भारताच्या संघाने एकही सामना न गमावता जेतेपद सलग दुसऱ्यांदा नावावर केले आहे. फायनलच्या सामन्यामध्ये भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडविरूद्ध पार पडला, या सामन्यामध्ये भारताच्या संघाने एकतर्फी विजय मिळवून न्यूझीलंडचा खेळ पहिल्याच इनिंगमध्ये संपवला होता.

  • 10 Mar 2026 01:20 PM (IST)

    10 Mar 2026 01:20 PM (IST)

    ‘अजित पवार यांच्या नावाला विरोध नाही, पण…

    दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाला आमचा विरोध नाही. मात्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या नावामध्ये खाडाखोड केल्यास जनसागर उसळेल, असा शासनाने रुग्णालयाच्या नावामध्ये कोणताही बदल करू नये, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी बोलताना दिला.बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शासकीय सर्वोपचार रुग्णालयाला स्व. अजित (दादा) पवार यांचे नाव देण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढल्याने धनगर समाजाच्या वतीने या निर्णयाबद्दल तीव्र निषेध व्यक्त करून हा अध्यादेश फाडण्यात आला.

  • 10 Mar 2026 01:15 PM (IST)

    10 Mar 2026 01:15 PM (IST)

    गॅसच्या तुटवड्यावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; संपूर्ण देशात ESMA कायदा लागू

    आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा (World War 3) परिणाम भारतामध्ये दिसू लागले आहेत. इराणवर झालेल्या हल्ल्ल्यानंतर त्यांनी कच्चा तेलाची वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. इराणने व्यापार बंद केल्यामुळे भारतामध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा (LPG Gas) भासत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून संपूर्ण देशात ESMA कायदा लागू करण्यात आला आहे.

  • 10 Mar 2026 01:06 PM (IST)

    10 Mar 2026 01:06 PM (IST)

    विरारमध्ये उभारणार १०० कोटींचे मँग्रोव्ह पार्क; वरिष्ठ वनाधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी

    वसई-विरार शहराच्या येथे पर्यटन विकासाला चालना देणारे सुमारे १०० कोटी रुपये खर्चाचे मॅग्रोव्ह (कांदळवन) पार्क विरार उभारण्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपाचे आमदार राजन नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे विरार पश्चिमेकडील मारंबळपाडा खाडी परिसरातील सुमारे सहा एकर जागेवर प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पासाठी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी प्रत्यक्ष पाहणी केली. कांदळवनांच्या विविध प्रजातींचे संवर्धन व्हावे, पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी आणि वसई-विरार परिसर पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे यावा, या उद्देशाने नालासोपारा मतदारसंघात मॅग्रोव्ह पार्क उभारण्याची मागणी आमदार राजन नाईक यांनी केली होती.

  • 10 Mar 2026 01:00 PM (IST)

    10 Mar 2026 01:00 PM (IST)

    पुतिन यांच्याशी चर्चा अन् ट्रम्प मवाळ! रशियन तेलावरील निर्बंध हटवणार? भारतासाठी मोठे संकेत

    सध्या मध्यपूर्वेतील तणावामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक तेलाच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली असल्याने अनेक देशांच्या उर्जा संरक्षणात अडथळे निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी रशिया तेलावरील निर्बंध कमी करण्याचे संकेत दिले आहेत.

  • 10 Mar 2026 12:50 PM (IST)

    10 Mar 2026 12:50 PM (IST)

    ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणारा २० वर्षीय तरुण अटकेत; परिसरात तणावपूर्ण शांतता

    पुण्यातील एका मोठ्या झोपडपट्टी परिसरात एका २० वर्षीय तरुणाने “पाकिस्तान झिंदाबाद” अशा घोषणा दिल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे. या घटनेनंतर रविवारी संबंधित तरुणाला पोलिसांनी अटक केली असून, परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि भीतीपोटी सोमवारी परिसरातील अनेक कुटुंबांनी इफ्तार रद्द केली.

    मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला तरुण बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून काम करतो. तो आपल्या कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य असून परिसरात त्याची ‘चांगला माणूस’ म्हणून त्याची ओळख होती. पण रविवारी त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये तो वादग्रस्त घोषणा देताना दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १९२ आणि १९६(१) अंतर्गत (धर्माच्या आधारावर दोन गटांत शत्रूत्वाला प्रोत्साहन देणे) गुन्हा दाखल केला आहे.

  • 10 Mar 2026 12:40 PM (IST)

    10 Mar 2026 12:40 PM (IST)

    ICC Team of the Tournament ची झाली घोषणा! 4 भारतीयांचा समावेश; विजेता कर्णधार सूर्याला वगळले…

    आयसीसीने स्पर्धेतील सर्वोत्तम संघाची घोषणा केली आहे. या संघात चार भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तथापि, विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवला वगळण्यात आले आहे.

Web Title: Maharashtra breaking news 10th march live updates maharashtra national international politics war world war3 us israel iran war breakingcrime cricket sports entertainment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 08:47 AM

Topics:  

  • international news
  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics
  • national news
  • World War 3

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि  देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
1

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Hormuz Strait: ट्रम्प आणि नेतान्याहू यांना येईल हार्ट अटॅक; इराणचा गंभीर इशारा, आता वापरणार ‘हे’ महाविनाशक शस्त्र
2

Hormuz Strait: ट्रम्प आणि नेतान्याहू यांना येईल हार्ट अटॅक; इराणचा गंभीर इशारा, आता वापरणार ‘हे’ महाविनाशक शस्त्र

मोठी बातमी ! बच्चू कडू करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; आता ‘प्रहार’चे काय होणार?
3

मोठी बातमी ! बच्चू कडू करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; आता ‘प्रहार’चे काय होणार?

International Dance Day: अल्लू अर्जुनपासून ऋतिकपर्यंत; ‘या’ 5 सुपरस्टार्सनी आपल्या स्टेप्सवर देशाला थिरकायला लावलं!
4

International Dance Day: अल्लू अर्जुनपासून ऋतिकपर्यंत; ‘या’ 5 सुपरस्टार्सनी आपल्या स्टेप्सवर देशाला थिरकायला लावलं!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.