Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live: पोरींनी करून दाखवलं! भारताचा पाकिस्तानवर ८८ धावांनी दणदणीत विजय

Marathi breaking live marathi headlines- या विजयासह भारताने पाकिस्तानवर सलग १२व्यांदा मात केली असून, गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर पाकिस्तानचा संघ सहाव्या स्थानावर आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 06, 2025 | 11:55 AM
LIVE
Top Marathi News Today Live: विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार; 2 नक्षलवादी ठार

Top Marathi News Today Live: विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार; 2 नक्षलवादी ठार

Follow Us
Close
Follow Us:
  • 06 Oct 2025 11:55 AM (IST)

    06 Oct 2025 11:55 AM (IST)

    रोहित पवार घेणार मंगेश साबळेंची भेट

    राज्यातील शेतकरी आज अतिवृष्टीने पुरता कोलमडला असून ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सिल्लोड तहसील कार्यालयासमोर मागील सहा दिवसांपासून शेतकरी आमरण उपोषण करत आहेत. उपोषणकर्ते सरपंच मंगेश साबळे यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत असून सरकारने अजूनही दखल घेतलेली नाही, असे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटरवरून सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहेकी, त्यांची खालावत असलेली तब्येत बघता त्वरित त्या भागातील मंत्री किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ संवाद साधत तोडगा काढावा, ही विनंती! त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी! सोमवार मीही त्यांची भेट घेणार आहे.

  • 06 Oct 2025 11:45 AM (IST)

    06 Oct 2025 11:45 AM (IST)

    पोलिसावर कोयत्याने हल्ला

    पुणे पोलिसावर कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रविवारी मध्यरात्री कट मारल्याच्या रागातून डेक्कन परिसरातील लॉ कॉलेज रोडवर गुन्हे शाखा युनिट-३ मध्ये कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार अमोल काटकर यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला.

  • 06 Oct 2025 11:40 AM (IST)

    06 Oct 2025 11:40 AM (IST)

    निवडणूक आयोगाची चार वाजता पत्रकार परिषद

    केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा आयोगाकडून या पत्रकार परिषदेमध्ये घोषित केली जाण्याची शक्यता आहे.

  • 06 Oct 2025 11:35 AM (IST)

    06 Oct 2025 11:35 AM (IST)

    केंद्राला मदतीसाठी प्रस्ताव पाठवला नाही

    अहिल्यानगरमध्ये रविवारी दौऱ्यावर आलेल्या अमित शाहांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे सांगितले, मात्र, त्यांच्या वक्तव्यावरुन महायुती सरकारकडून केंद्र सरकारकडे अजूनही मदतीसाठी प्रस्ताव पाठवला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • 06 Oct 2025 11:30 AM (IST)

    06 Oct 2025 11:30 AM (IST)

    यंदा ‘आनंदाचा शिधा’नाही?

    शिवभोजन थाळी ही योजना जवळपास बंद पडल्याची चर्चा सुरू असतानाच आता ‘आनंदाचा शिधा’ ही लोकप्रिय योजना देखील कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीला अवघे 12 दिवस बाकी असताना याबाबत सरकारी पातळीवर कुठलीही हालचाल दिसत नाही.

  • 06 Oct 2025 11:23 AM (IST)

    06 Oct 2025 11:23 AM (IST)

    मराठी भाषा सप्ताहाचे उद्धघाटन

    अमरावतीत: अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे उद्धघाटन शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस् झाले. अमरावती गाडगेबाबा विद्यापीठात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने भारतीय अभिजात भाषा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

  • 06 Oct 2025 10:59 AM (IST)

    06 Oct 2025 10:59 AM (IST)

    हरमनप्रीतचा पाकविरुद्ध सामन्यातील व्हिडीओ व्हायरल

    सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये पाकिस्तानची गोलंदाज नशरा संधू ही भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर तिच्याकडे रागात पाहत असताना तिच्याच भाषेत हरमनने तिला उत्तर दिले आहे. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये ५ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा ८८ धावांनी पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. या सामन्यादरम्यान टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानची गोलंदाज नशरा संधू यांच्यात एक छोटीशी बाचाबाची झाली, ज्याला भारतीय कर्णधाराने तिच्याच शैलीत उत्तर दिले. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • 06 Oct 2025 10:55 AM (IST)

    06 Oct 2025 10:55 AM (IST)

    लाँचपूर्वी Amazon वर लिस्ट झाला हा नवा स्मार्टफोन

    Lava Bold N1 Lite लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे. खरंतर या स्मार्टफोनची अधिकृत लाँच डेट अद्याप जाहिर करण्यात आली नाही. मात्र यापूर्वीच आता हा आगामी स्मार्टफोन कोणत्याही अधिकृत घोषणेपूर्वी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर लिस्ट करण्यात आला आहे. हा आगामी स्मार्टफोन Lava Bold N1 सीरीजचे नवीन एडिशन असणार आहे, ज्यामध्ये सध्या Lava Bold N1 आणि Lava Bold N1 Pro मॉडेल्सचा समावेश आहे.

  • 06 Oct 2025 10:42 AM (IST)

    06 Oct 2025 10:42 AM (IST)

    ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ हिट की फ्लॉप?

    “कांतारा चॅप्टर १” बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असताना, “सनी संस्कार की तुलसी कुमारी” देखील बॉक्स ऑफिसवर आपला ताबा कायम ठेवत आहे. परंतु, कमाईच्या बाबतीत हा चित्रपट ऋषभ शेट्टीच्या चित्रपटापेक्षा खूपच मागे आहे. “सनी संस्कार की तुलसी कुमारी” ने रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजे पहिल्या रविवारी किती कमाई केली हे आपण जाणून घेऊयात.

    बातमी सविस्तर वाचा...

  • 06 Oct 2025 10:42 AM (IST)

    06 Oct 2025 10:42 AM (IST)

    बिहारमधील निवडणुकांची आज घोषणा होणार

    निवडणूक आयोग सोमवारी (६ ऑक्टोबर) दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेऊन बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. निवडणुकीच्या तारखांची अधिकृत घोषणा टप्प्यांची संख्या देखील स्पष्ट करेल. बिहारमध्ये मतदान दोन टप्प्यात पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्पष्ट केले होते की आगामी निवडणुका २२ नोव्हेंबरपूर्वी पूर्ण होतील. २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर रोजी संपत आहे.

    पीटीआयच्या वृत्तानुसार, जास्तीत जास्त मतदारांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला छठ सणानंतर लगेचच निवडणुका घेण्याची विनंती केली आहे. या सणामुळे परदेशात काम करणारे लोक मोठ्या संख्येने घरी परततात.

  • 06 Oct 2025 10:39 AM (IST)

    06 Oct 2025 10:39 AM (IST)

    भारताने गुणतालिकेच गाठले पहिले स्थान

    हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाच्या सहाव्या सामन्यात पाकिस्तानला ८८ धावांनी हरवून मोठे यश मिळवले आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय आहे आणि या विजयासह भारताने महिला विश्वचषकाच्या पॉइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे. हो, ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेविरुद्धचा पाठलाग सामना रद्द करण्यात आला होता ज्यामुळे कांगारू संघ ३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानला हरवून भारत ४ गुण मिळवणारा पहिला संघ बनला आहे.

  • 06 Oct 2025 10:32 AM (IST)

    06 Oct 2025 10:32 AM (IST)

    आईने आपल्याच १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केली

    कर्नाटक येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आधी १२ वर्षीय मुलीची हत्या केली नंतर स्वतः गळफास घेऊन जीवन संपवल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक तपासात महिला मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे ग्रस्त असल्याचे समोर आले आहे. याच कारणामुळे महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा संशय व्यक्त केला आहे. आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव श्रुती असं ही केवळ ३८ वर्षांची आहे. ही घटना शिवमोगा येथे घडली आहे.

  • 06 Oct 2025 10:24 AM (IST)

    06 Oct 2025 10:24 AM (IST)

    रविवारी ‘Kantara Chapter 1’ ने केले एवढे कलेक्शन

    २ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या “कांतारा: चॅप्टर १” ने पहिल्या दिवशी भारतात ६० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर असाधारणपणे चांगली कामगिरी करत आहे, कलेक्शनच्या बाबतीत बॉलीवूडचा ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ चित्रपटाला मागे टाकून हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. “कांतारा: चॅप्टर १” ने रिलीजच्या चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे आपण जाणून घेणार आहोत.

    बातमी सविस्तर वाचा...

  • 06 Oct 2025 10:17 AM (IST)

    06 Oct 2025 10:17 AM (IST)

    श्रेयस अय्यरच्या संघाने कांगारुच्या संघाला चांगलचं धुतलं!

    ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत भारत अ संघाने अपवादात्मक कामगिरी केली. पहिल्या दोन सामन्यांनंतर मालिका १-१ अशी बरोबरीत होती. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जॅक एडवर्ड्सच्या संघाने ४९.१ षटकांत सर्व विकेट गमावून ३१७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारत अ संघाने केवळ ४६ षटकांत २ विकेट राखून सामना जिंकला. यासह, श्रेयस अय्यरच्या संघाने एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली.

  • 06 Oct 2025 10:06 AM (IST)

    06 Oct 2025 10:06 AM (IST)

    दिवाळीनंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता

    राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपूर्वी राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिल्यानंतर हालचालींना गती मिळाली आहे.

  • 06 Oct 2025 10:00 AM (IST)

    06 Oct 2025 10:00 AM (IST)

    बाजारात मंदीची चाहूल! गिफ्ट निफ्टीने दिले नकारात्मक संकेत

    जागतिक बाजारातील उत्साहवर्धक संकेत असूनही, सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची कमकुवत सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,९६२ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ४४ अंकांनी कमी होता.

  • 06 Oct 2025 09:50 AM (IST)

    06 Oct 2025 09:50 AM (IST)

    ‘या’ आठवड्यात ‘हे’ स्पर्धक झाले नॉमिनेटेड, कोण जाणार

    BBTak या लोकप्रिय शो बिग बॉस १९ शी संबंधित अपडेट्स शेअर करणाऱ्या ऑनलाइन पेजने त्यांच्या अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट या आठवड्यातील नामांकित स्पर्धकांची माहिती देते. या आठवड्यातील नामांकित स्पर्धकांमध्ये झीशान कादरी, नीलम गिरी, मृदुल तिवारी, बसीर अली, अशनूर कौर आणि प्रणीत मोरे यांचा समावेश आहे. परंतु, त्यापैकी कोणता स्पर्धक घराबाहेर येईल हे पाहणे बाकी आहे.

  • 06 Oct 2025 09:40 AM (IST)

    06 Oct 2025 09:40 AM (IST)

    मुख्याध्यापिकेकडून अपमान झाल्याने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

    नवी मुंबई येथील ऐरोलीत एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मुख्याध्यापिकेने सार्वजनिकपणे रागावल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे आरोप तिच्या पालकांनी केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव अनुष्का शहाजी केवळे असे आहे. ती ऐरोलीतील सुशिलाबाई देशमुख विद्यालयात दहावी या वर्गात शिक्षण घेत होती. तिच्या या टोकाच्या निर्णयाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  • 06 Oct 2025 09:30 AM (IST)

    06 Oct 2025 09:30 AM (IST)

    सोनं-चांदी झालं स्वस्त! ग्राहकांना मोठा दिलासा

    भारतात 6 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,939 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,944 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,954 रुपये आहे. भारतात 6 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,09,440 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,19,390 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 89,540 रुपये आहे.  भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 154.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,54,900 रुपये आहे.

  • 06 Oct 2025 09:20 AM (IST)

    06 Oct 2025 09:20 AM (IST)

    पाकला आणखी एकदा भारतीय संघाने चारली धूळ!

    महिला एकदिवसीय विश्वचषकाचा सहावा सामना काल पार पडला हा सामना कोलंबो येथील प्रेमादासा स्टेडियम वर खेळवण्यात आला. भारतीय महिला संघ विरुद्ध पाकिस्तान महिला संघ यांच्यामध्ये हा सामना झाला होता. या सामना भारताच्या संघाने 88 धावांनी विजय मिळवला. यामध्ये दीप्ती शर्मा आणि क्रांती गौड यांची कौतुकास्पद कामगिरी राहिली. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताच्या संघाने सुरुवातीपासूनच पाकिस्तानच्या संघावर दबदबा निर्माण केला होता

  • 06 Oct 2025 09:10 AM (IST)

    06 Oct 2025 09:10 AM (IST)

    भारत-अमेरिका व्यापार तणाव वाढला; ट्रम्प यांच्या दबावाला झुकणार नाही,

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर भरमसाठ टॅरिफ लादून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र भारत सरकार या दबावासमोर झुकण्यास नकार देत आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारत-अमेरिका व्यापार करारावर भाष्य करताना स्पष्ट केले की, भारत आपले राष्ट्रीय हित जपूनच निर्णय घेईल.

    अमेरिकेने सध्या भारतावर दोन प्रकारचे टॅरिफ लागू केले आहेत — पहिले परस्पर व्यापार शुल्क, आणि दुसरे रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्क. या निर्णयामुळे दोन्ही देशांतील व्यापार संबंधांवर ताण निर्माण झाला असून, पुढील काही दिवसांतील घडामोडींवर सर्वांचे लक्ष आहे.

  • 06 Oct 2025 09:00 AM (IST)

    06 Oct 2025 09:00 AM (IST)

    राहुल गांधींचा रायबरेलीतील दलित तरुणाच्या कुटुंबाशी दूरध्वनीवरून संवाद 

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रायबरेलीत मारहाणीत ठार झालेल्या दलित तरुणाच्या वडिलांशी आणि भावाशी परदेशातून दूरध्वनीवरून संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी, “या असह्य दुःखाच्या प्रसंगी आम्ही पीडित कुटुंबासोबत ठामपणे उभे आहोत,” असे सांगत कुटुंबाचे सांत्वन केले.

    काँग्रेसच्या मीडिया आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “लिंचिंगची ही घटना हृदयद्रावक आहे. आपल्या शेवटच्या क्षणी, काठ्या आणि पट्ट्यांनी क्रूरपणे मारहाण होत असताना, त्या तरुणाची शेवटची आशा राहुल गांधी होते,” असेही त्यांनी नमूद केले.

  • 06 Oct 2025 08:44 AM (IST)

    06 Oct 2025 08:44 AM (IST)

    दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बुधवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन 

    नवी मुंबईतील दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (८ ऑक्टोबर) भव्य कार्यक्रमात होणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीला जोरदार वेग आला असून, सुमारे ५० हजार लोकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

    या ऐतिहासिक सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नवी मुंबई आणि परिसरातील नागरिकांमध्ये या कार्यक्रमाबाबत उत्साहाचे वातावरण आहे. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या विमानतळाच्या उद्घाटनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

  • 06 Oct 2025 08:41 AM (IST)

    06 Oct 2025 08:41 AM (IST)

    मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी; अंतिम आराखडा प्रसिद्ध

    राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या तयारीला आता वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ३१ जानेवारीपूर्वी सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यानंतर प्रभाग रचना अंतिम करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती.

    या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात मोठी घडामोड झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेच्या सर्व २२७ प्रभाग रचनेस मंजुरी दिली असून, अंतिम आराखडा शासन राजपत्रात आणि मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Marathi Breaking news live updates-  महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर ८८ धावांनी शानदार विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. (INDW vs PAKW)

भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत २४७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानला विजयासाठी २४८ धावांचे आव्हान होते. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यासमोर पाकिस्तानी फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत आणि संपूर्ण संघ १५९ धावांवर गारद झाला. या विजयासह भारताने पाकिस्तानवर सलग १२व्यांदा मात केली असून, गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर पाकिस्तानचा संघ सहाव्या स्थानावर आहे.

 

 

Web Title: Maharashtra breaking news today live updates political national crime sports international entrertainment business breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 08:37 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today:  300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना
1

Top Marathi News Today: 300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना

Top Marathi News Today:  पाऊस चिंता वाढवणार; ऑक्टोबरमध्येही धुमाकूळ घालणार
2

Top Marathi News Today: पाऊस चिंता वाढवणार; ऑक्टोबरमध्येही धुमाकूळ घालणार

Top Marathi News Today: भारताच्या संघाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजय! पहा Video
3

Top Marathi News Today: भारताच्या संघाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजय! पहा Video

Top Marathi News Today Live: मुसळधार पावसाने मराठवाड्यात हाहाकार; संपर्क मार्ग ठप्प
4

Top Marathi News Today Live: मुसळधार पावसाने मराठवाड्यात हाहाकार; संपर्क मार्ग ठप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.