Top Marathi News Today Live: विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार; 2 नक्षलवादी ठार
01 Oct 2025 04:04 PM (IST)
Indian Politics: देशाच्या राजकारणात सातत्याने केंद्रातील मोदी सरकार आपला तिसरा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही. अन्य पक्षांच्या मदतीने ही सरकार काम करत आहे. 2029 च्या आधी सरकार कोसळेल असे दावे विरोधी पक्षांकडून केले जात असतात. त्यातच यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वी 75 पूर्ण झाल्याने ते आपले पद सोडणार का? पक्षाचा नियम पाळणार का असे प्रश्न उपस्थित केले जात होते. आता एका कॉँग्रेस नेत्याने राहुल गांधी 2029 आधीच पंतप्रधान होतील असा दावा केल्याने राजकारण पुन्हा तापले आहे.
01 Oct 2025 03:55 PM (IST)
सुबोध भावे आणि मानसी नाईक ही जोडी प्रथमच प्रेक्षकांसमोर ‘सकाळ तर होऊ द्या’ हा चित्रपट घेऊन येत आहे. तसेच या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
01 Oct 2025 03:43 PM (IST)
मध्य प्रदेश: बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांना अनेकदा खोकल्याचा त्रास होतो. यावर उपाय म्हणून पालक त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा स्वतःच कफ सिरप देतात, जेणेकरून मुले लवकर बरी होतील. मात्र, आता हेच कफ सिरप बालकांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे.
01 Oct 2025 03:29 PM (IST)
पनवेलच्या बालसुधार गृहातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. बालसुधारगृहातून पाच मुली पळून गेल्या होत्या. या मुलींपैकी तीन मुलींना शोधून काढण्यात यश आले आहे तर, २ मुली सापडल्या नाही आहे.
01 Oct 2025 03:09 PM (IST)
उत्सव काळात सण साजरे करताना कायद्याच्या चौकटीत राहून करणे बंधनकारक असते. मात्र काही हौशी राजकारणी आपणच सरकार असल्यासारखं वागत, नियम पायदळी तुडवतात.
01 Oct 2025 03:02 PM (IST)
दसरा जवळ आल्याने सणांचा उत्साह आता सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे. यंदा दसऱ्याला गुगल जेमिनी एआय (Google Gemini AI) च्या मदतीने दसऱ्याच्या थीमवर आधारित फोटो तयार करून नेटकरी इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.
01 Oct 2025 02:55 PM (IST)
धनुष आणि क्रिती सेनन ही जोडी लवकरच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्यांची केमिस्ट्री स्पष्ट आणि छान दिसली आहे. ते त्यांच्या “तेरे इश्क में” या चित्रपटासाठी बऱ्याच काळापासून चर्चेत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा आता संपणार आहे. या टीझरमधून दोन्ही स्टार्समधील तीव्र केमिस्ट्री उघड झाली आहे. टीझर पाहून “रांझना” आणि “आशिकी” ची भावना जाग्या होत्या आहेत. “रांझना” नंतर, आनंद एल. राय आणि धनुष पुन्हा एकदा एकत्र येत आहेत.
01 Oct 2025 02:40 PM (IST)
बॉलीवूडची स्टायलिश अभिनेत्री सोनम कपूर पुन्हा एकदा आनंदाची बातमी घेऊन आली आहे. वृत्तानुसार, सोनम लवकरच दुसऱ्यांदा आई होणार असल्याचे समजले आहे. एका वृत्तानुसार, आनंद आहुजाची पत्नी आणि अनिल कपूरची मुलगी सोनम तिच्या गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत आहे आणि लवकरच अधिकृत घोषणा करू शकते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की कतरिना कैफ देखील बाळाचे स्वागत करणार आहे. तिने अलीकडेच विकी कौशलसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली.
01 Oct 2025 02:35 PM (IST)
बदलेली जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, मानसिक ताण, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांनासुद्धा हानी पोहचण्याची शक्यता असते. त्वचेची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येणे, फोड, मुरूम आणि त्वचेच्या इतरही समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता त्वचेसाठी अतिशय घातक ठरते. त्वचेच्या समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण तरीसुद्धा त्वचेच्या समस्या कमी होत नाही. स्किन केअर प्रॉडक्ट काही काळासाठी सुंदर आणि चमकदार करतात, मात्र कालांतराने पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते.
01 Oct 2025 02:35 PM (IST)
राष्ट्रीय जनता दल (RJD) चे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे आजच्या आघाडीच्या राजकारण्यांमध्ये आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीसोबतच त्यांची प्रेमकहाणीही खूप चर्चेत आहे. बिहारमधील सर्वात पात्र अविवाहितांपैकी एक असलेल्या तेजस्वी यादव यांचे लग्न झाले तेव्हा हजारो महिलांचे मन दुखावले होते. एका वेळी ४४,००० मुलींनी तेजस्वी यादव यांना WhatsApp वर प्रपोजल पाठवले होते.
01 Oct 2025 02:30 PM (IST)
Mohsin Naqvi apologizes to BCCI : आशिया कप २०२५ ही स्पर्धा या वेळी बरीच चर्चेत राहिली. या स्पर्धेत अनेक वादाला तोंड फुटले खासकरून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने वादग्रस्त ठरले. अंतिम फेरीत हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. या सामन्यानंतर अनेक नाट्यमयी घटना घडल्या. विजयानंतर, भारतीय संघाने एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दर्शवला. यानंतर मोहसीन नक्वी ट्रॉफी आपल्या सोबत घेऊन गेले. त्यानंतर भारताने ट्रॉफीविनाच सेलिब्रेशन केले आणि ट्रॉफीविनाच भारतीय संघ मायदेशी परतला.
01 Oct 2025 02:25 PM (IST)
Donald Trump war Hamas : तेल अवीव : इस्रायल आणि हमास युद्ध (Israel Hamas War) जवळपास दोन वर्षांपासून सुरु आहे. या युद्धाने गाझात प्रचंड विध्वंस घडवून आणला आहे. सध्या हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा प्रयत्न सुरु केले आहे. यासाठी ट्रम्प यांनी २० कलमी शांतता योजना आखली आहे, ज्याला इस्रायलकडून सहमती मिळाली आहे. पण हमासने मात्र अद्याप याला होकार दिलेला नाही. यामुळे ट्रम्प यांनी हमासला गाझा योजनेला सहमती देण्यासाठी तीन ते चार दिवस दिले आहेत.
01 Oct 2025 02:13 PM (IST)
संगीताच्या जगात प्रकाशझोत नेहमी त्या गायकांवर पडतो ज्यांच्या आवाजाने प्लेलिस्ट, मैफली आणि हृदये गाजतात. पण पडद्यामागे एक संपूर्ण टीम असते. मॅनेजर्स, रणनीतिकार आणि विश्वासू सहकारी, जी सतत मेहनत करत राहते. हेच लोक गोंधळ हाताळतात, करिअर घडवतात आणि अशी दारे उघडतात ज्यामुळे खरी कला चमकू शकते.
01 Oct 2025 01:55 PM (IST)
राज्यात यंदा मान्सून चांगलाच लांबला आहे. मे महिन्याच्या मध्यातच यावेळी पावसाळा सुरुवात झाली. पावसाळ्याच्या आधी सुरू झालेला पुस पावसाळा संपला तरी अजून जायचे नाव घेताना दिसून येत नाहीये. कारण जोरदार पावसामुळे महाराष्ट्रात जोरदार धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
01 Oct 2025 01:50 PM (IST)
महामार्गावरून वाहने नेताना वाहनचालकांना टोल द्यावा लागतो. मात्र, आता टोलबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात नवीन दर लागू केले जाणार आहेत. यामध्ये नव्या नियमानुसार, वाहनचालकांना देशभरात टोल करात सवलत मिळणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) सर्व प्रादेशिक अधिकाऱ्यांना टोल दरांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत.
01 Oct 2025 01:45 PM (IST)
गेल्या दोन महिन्यांत भारतातील आयपीओ बाजारात प्रचंड गर्दी दिसून आली आहे. मेनबोर्ड आणि एसएमई विभागांसह ८० हून अधिक कंपन्यांनी बाजारात प्रवेश केला आहे, त्यांनी अंदाजे ₹३५,००० कोटी उभारले आहेत. यापैकी केवळ ३१ मेनबोर्ड कंपन्यांनी अंदाजे ₹३१,००० कोटी उभारले आहेत.
01 Oct 2025 01:35 PM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगातली सात युद्ध थांबवल्याचा दावा करत, नोबेल पुरस्काराची मागणी केली आहे. ट्रम्प यांनी मोठे धक्कादायक विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला नाही, तर हा अमेरिकेचा मोठा अपमान असले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
01 Oct 2025 01:33 PM (IST)
Rain Marathi News: राज्यात यंदा मान्सून चांगलाच लांबला आहे. मे महिन्याच्या मध्यातच यावेळी पावसाळा सुरुवात झाली. पावसाळ्याच्या आधी सुरू झालेला पुस पावसाळा संपला तरी अजून जायचे नाव घेताना दिसून येत नाहीये. कारण जोरदार पावसामुळे महाराष्ट्रात जोरदार धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
01 Oct 2025 01:30 PM (IST)
मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये एक भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. एका भरधाव वेगाने येणाऱ्या बसने दुर्गा मताच्या मंडपाला धडक दिली. या अपघातात २० हुन अधिक लोक जखमी झाले असून त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींचा उपचार रुग्णालयात सुरु आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरच्या सिहोरा भागात ही घटना घडली आहे.
01 Oct 2025 01:25 PM (IST)
केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची वाट पाहिली जात होती, त्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 55 टक्के महागाई भत्ता मिळत आहे, पण महागाईच्या वाढत्या दरामुळे सरकारकडून महगाई भत्त्यात वाढ करण्यात आली. असे मिडिया रिपोर्टसमधून समोर येत आहे. यावर्षीच्या सुरुवातीस सरकारने मार्चमध्ये DA मध्ये 2% वाढ मंजूर केली होती, ज्यामुळे मूलभूत पगार आणि पेन्शनचा टक्का 53% वरून 55% झाला.
01 Oct 2025 01:20 PM (IST)
अलिकडेच देशात वस्तू आणि सेवा करात (जीएसटी) काही महत्त्वाचे बदल करण्यात आले, ज्यामुळे वस्तू स्वस्त होतील आणि लोकांची खरेदी वाढेल अशी अपेक्षा होती. तथापि, जुलै ते सप्टेंबर दरम्यान किराणा आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या विक्रीत घट झाली. किराणा पॅक, सॉफ्ट ड्रिंक्स, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर आणि स्मार्टफोन यासारख्या वस्तूंच्या विक्रीत ५% ते २५% घट झाली.
01 Oct 2025 01:18 PM (IST)
नवरात्रौत्सावाची सांगता होणार असून दसरा सणाची तयारी सुरु झाली आहे. विजयादशमीसाठी राजकीय वर्तुळामध्ये जोरदार तयारी केली जाते. दसऱ्याच्या निमित्ताने अनेक राजकीय नेते हे मेळावे घेत असतात. यामध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा हा जोरदार चर्चेत असतो. बाळासाहेब ठाकरे असल्यापासून शिवसेनेचा शिवतीर्थावर शिवसैनिकांना विचारांचे सोने लुटले जाते. मात्र आता ठाकरे गटाच्या मेळाव्याच्या बजेटची जोरदार चर्चा रंगली आहे.
01 Oct 2025 01:15 PM (IST)
उत्तर प्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जौनपूर जिल्ह्यात राहणाऱ्या एका ७५ वर्षीय वृद्धाने ३५ वर्षीय महिलेशी मग्न केले. मात्र त्यांचा आनंदाचा क्षण जास्त काळ काही टिकला नाही. लग्नाच्या रात्री लगेच वृद्धाचा मृत्यू झाला. या अनपेक्षित घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चां होत आहे. सर्वांचे लक्ष पोलिसांच्या पुढील तपासाकडे लागले आहे.
01 Oct 2025 01:10 PM (IST)
सिंगापूरमधील प्रतिष्ठित नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हल (NEIF) दरम्यान लोकप्रिय आसामी गायक जुबिन गर्ग यांच्या गूढ मृत्यूने आता गंभीर वळण घेतले आहे. पोलिसांनी महोत्सवाचे मुख्य आयोजक श्यामकानु महंत आणि जुबिन गर्ग यांचे मॅनेजर सिद्धार्थ शर्मा यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंगापूरहून नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचताच श्यामकानु महंत यांना अटक करण्यात आली आहे.
01 Oct 2025 01:04 PM (IST)
‘तारिणी’ मालिकेमधील कौशिकी हे पात्र जितकं नीतीमूल्यांवर चालणारं आहे, तितकीच अभिनेत्री अभिज्ञा भावे देखील वास्तव जीवनात खरीखुरी, प्रामाणिक, मातृत्व भावना आणि संवेदनशील स्वभावाची आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने, अभिज्ञाने तिच्या जीवनमूल्यांवर प्रकाश टाकताना सांगितले की, “मी स्कंदमातेच्या गुणांशी स्वत:ला जोडते – आईपण, करुणा आणि निस्वार्थीपणा ही तिची प्रमुख वैशिष्ट्यं आहेत आणि ती माझ्यातदेखील मी अनुभवते. हे गुण माझ्यात आधीपासूनच होते, पण जेव्हा मी गरजू लोकांशी संवाद साधू लागले, तेव्हा मला जाणवलं की त्यांना मदत करताना, कुठलाही स्वार्थ न ठेवता मी त्यांच्या पाठीशी उभी राहते. हीच खरी निस्वार्थी सेवा आहे. मानवांप्रमाणेच प्राण्यांविषयीही तितकीच संवेदनशील आहे.
01 Oct 2025 01:00 PM (IST)
इलेक्ट्रॉनिक्स बाजारात पैसे गुंतवणुकीवर नऊ ते बारा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाला जावई व सासऱ्याच्या जोडीने तब्बल सहा कोटी नऊ लाख ५७ हजार १०३ रूपयांचा गंडा घातला. गंडा घालणाऱ्या जावयाचे नाव शेख रियाज व त्याचे सासरे सय्यद अनिस रझवी (रा. बड़े नवाब बाडा, चेलूपर, ह.मु. युनाईटेट अरब इमिरेटस, दुबई) असे आहे.
01 Oct 2025 12:45 PM (IST)
मीरा रोड येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मीरा रोड पूर्वेतील जे.पी. नॉर्थ गार्डनर सिटी या नामांकित सोसायटीत सार्वजनिक गरबा कार्यक्रमादरम्यान अंडे फेकल्याच समोर आलं आहे. या प्रकरणी एस्टेला बिल्डिंगच्या एका रहिवासी व्यक्तीच्या विरोधात काशिमिरा पोलिसांनी बी.एन.एस. 2023 कलम 300 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
01 Oct 2025 12:36 PM (IST)
अकोला: अकोल्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. अकोला शहरातील शिवापूर म्हाडा कॉलनी परिसरात पती-पत्नीतील वादातून एका महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव मीरा मुरलीधर मानकर (वय 37) असे आहे. ती एका मुलाची आई होती. याचा सततच्या वादाचा त्रास झाल्याने मीरने आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
01 Oct 2025 12:05 PM (IST)
पुण्यातल्या कोथरूडमध्ये घरफोडीच्या उद्देशाने दोन आरोपींनी सोसायटीत घुसखोरी केली. कोथरूड परिसरात वाढत्या गुन्हेगारी प्रकारांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याचदरम्यान, कोथरूडमधील एका नामांकित सोसायटीत दोन आरोपी हातात हत्यारे घेऊन घरफोडीच्या उद्देशाने घुसल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
01 Oct 2025 11:55 AM (IST)
विजयादशमी म्हणजे असत्यावर सत्याचा विजय. विजयादशमीला संघाची स्थापना हा योगायोग नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्यात म्हणाले.
01 Oct 2025 11:46 AM (IST)
आमदार रवी राणा आणि भाजपा नेत्या, माजी खासदार नवनीत राणा यांच्या पदयात्रेला सुरुवात झाली आहे. त्यांच्या गंगा सावित्री निवास्थानापासून ते अंबा देवी एकविरा देवी मंदिरपर्यंत अनवाणी पायाने ही पदयात्रा करणार आहेत. राणा दाम्पत्य दरवर्षी दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवमीला विदर्भाचे कुलदैवत असलेल्या अंबा देवीला साकडं घालण्यासाठी पदयात्रा करत असतात.
01 Oct 2025 11:25 AM (IST)
लाडकी बहिण आणि इतर काही लोकप्रिय योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक ताण आला आहे. त्यामुळे राज्यातील विधानसभा आणि विधान परिषेदेच्या 361 आमदारांचा निधी गेल्या 6 महिन्यांपासून रखडला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. स्थानिकच्या निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी तरी निधी मिळावा, अशी मागणी या आमदारांकडून केली जात आहे. तर लाडकी बहीण योजनेमुळे हा निधी थांबवल्याची तक्रार आमदार करत आहेत.
01 Oct 2025 11:15 AM (IST)
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झालाच नव्हता असा अहवाल नागपूर ग्रामीण पोलिसांनी कोर्टात सादर केला आहे. 18 नोव्हेंबर 2024 रोजी अनिल देशमुख यांच्या कारवर प्रचारा दरम्यान दगडफेक करुन हल्ला करण्यात आला होता. याबाबतची तक्रार त्यांनी पोलिसांत दिली होती. या हल्ल्यामध्ये देशमुखांच्या डोक्याला मार लागला होता. या हल्ल्याची फॉरेन्सिक आणि तांत्रिक तपासणी केल्यानंतर तयार झालेला बी फायनल रिपोर्ट पोलिसांनी आज कोर्टात सादर केला. पोलिसांनी दिलेल्या रिपोर्टमध्ये FIRमध्ये दिलेला घटनाक्रम झाला नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
01 Oct 2025 11:15 AM (IST)
आपल्या सर्वांचे बालपण कार्टुन नेटवर्क आजच्या दिवशी 1992 रोजी सुरु झाले. कार्टून नेटवर्क हे वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीच्या मालकीचे एक अमेरिकन केबल टेलिव्हिजन चॅनेल आहे. या कार्टुन नेटवर्कच्या माध्यमातून मुख्यत: 6 ते 14 वयोगटातील मुलांना विविध प्रकारचे कार्टुन दाखवले जाते. हा चॅनेल ॲनिमेशन-आधारित कार्यक्रम प्रदर्शित करतो. कार्टुन नेटवर्क चॅनलला भारतीय प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान आणि लोकप्रियताआहे. या चॅनेलच्या काही लोकप्रिय जुन्या आणि नवीन मालिकांमध्ये स्कूबी डू, टॉम अन्ड जॅरी आणि द जेट सन्स या कार्यक्रमांचा समावेश आहे.
01 Oct 2025 11:05 AM (IST)
पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतीटन ५ रुपये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० रुपये असा टनामागे १५ रु. कपात करण्याचा निर्णय घेऊन या सरकारने शेतकऱ्याचाच खिसा कापला. ही एकप्रकारे आधुनिक टोलवसुलीच आहे. देवाचंच घेऊन देवाला लावणाऱ्या या सरकारमध्ये पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी आणण्याची हिंमत नाही का? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
01 Oct 2025 10:56 AM (IST)
राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान झाले आहे. तसेच अजूनही काही भागात पूरस्थिती आहे. त्यामुळे सन २०२५-२६ या वर्षीचा ऊस गाळप हंगाम राज्यात दि. १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यासह मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन १० रुपये कपात आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रतिटन ५ रुपये कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
01 Oct 2025 10:45 AM (IST)
तामिळनाडूची राजधानी चेन्नईमधील एन्नोर थर्मल पॉवर स्टेशनच्या बांधकामाच्या ठिकाणी छत कोसळून भीषण दुर्घटना घडली आणि या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दहा जण गंभीर जखमी झालेत.
01 Oct 2025 10:00 AM (IST)
श्री विठ्ठल-रुक्मिणी देवांच्या अभिषेकासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी मंदिर प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी देवांच्या अभिषेकासाठी स्थानिक चंद्रभागा नदीचे पाणी न वापरता उत्तर प्रदेशातील गंगाजल आणले जात आहे.
01 Oct 2025 09:59 AM (IST)
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणावर मतं मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची छाननी करण्यासाठी राज्य सरकारने मोठी मोहिम सुरू केली आहे. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाल्याने सरकारने आता कठोर निकष लागू केले आहेत. निवडणुकीच्या काळात लाभार्थ्यांच्या पात्रतेची पडताळणी फार काटेकोरपणे करण्यात आली नव्हती. मात्र, वाढता आर्थिक भार लक्षात घेऊन अलीकडच्या काळात लाखो बोगस लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
वाचा सविस्तर- लाडकी बहीण योजनेत नवे नियम; आता पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक
01 Oct 2025 09:50 AM (IST)
IRHPL च्या या इनसाईट्सनुसार, भारतातील विमानतळांवर दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांना सर्वाधिक पसंती मिळते. विशेषतः इडली, डोसा, सांबार, फिल्टर कॉफी यांची मागणी प्रवाशांमध्ये जास्त असते. त्यानंतर उत्तर भारतीय पदार्थ जसे की पनीर डिशेस, पराठे, राजमा-चावल आदींना पसंती दिली जाते.
01 Oct 2025 09:40 AM (IST)
फरचंदातील अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेला प्लेक कमी करण्यासाठी मदत करते. सफरचंद खाल्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. रोजच्या आहारात आंबट आणि विटामिन सी युक्त फळांचे नियमित सेवन करावे. या फळांच्या सेवनामुळे हृदयाला अनेक फायदे होतात. संत्र्यामध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. गोड चवीचा पपई सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. पपईमध्ये असलेले पापेन शरीरासाठी अतिशय महत्वाचे ठरते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित पपई खावा.
01 Oct 2025 09:30 AM (IST)
“पती पत्नी और पंगा” या टीव्ही शोच्या सेटवरून अविका गोरच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये “बालिका वधू” अभिनेत्री वधू आणि तिचा दीर्घकालीन बॉयफ्रेंड मिलिंच चांदवानी वराच्या वेशात दिसत आहेत. शोमधील फोटोंमध्ये, अभिनेत्री चमकदार लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये दिसत आहे. तिने हलक्या मेकअपने तिचा लूक पूर्ण केला आहे. ती संपूर्ण लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
01 Oct 2025 09:20 AM (IST)
मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये एक भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. एका भरधाव वेगाने येणाऱ्या बसने दुर्गा मताच्या मंडपाला धडक दिली. या अपघातात २० हुन अधिक लोक जखमी झाले असून त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींचा उपचार रुग्णालयात सुरु आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरच्या सिहोरा भागात ही घटना घडली आहे.
01 Oct 2025 09:10 AM (IST)
अतिवृष्टी, पुरामुळे मराठवाड्यात 32 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पंचनाम्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे पंचनामे करण्यात अडसर येत असल्याने ते थांबले होते. दरम्यान, आता पाऊस ओसरल्याने पंचनाम्यांना पुन्हा गती देण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. येत्या 5 ऑक्टोबरपर्यंत पंचनाम्यांचे काम पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी यंत्रणेला केल्या आहेत.
01 Oct 2025 09:02 AM (IST)
दसरा आणि दिवाळीपूर्वी लोकांना महागाईचा फटका बसला आहे. दरात वाढ झाली आहे. त्यानुसार, राजधानी दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत पूर्वी १५८० होती, परंतु आता त्याची किंमत १५९५.५० झाली आहे. तर १९ किलोच्या एलपीजी कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत १५.५० रुपयांची वाढ झाली आहे. असे जरी असले तरी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
01 Oct 2025 08:48 AM (IST)
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेतील सप्टेंबर महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या योजनेतील हप्ते वेळेवर न मिळाल्याने महिलांमध्ये नाराजी आहे.सप्टेंबरचा हप्ता पुढे ढकलण्यात आला असून, येत्या काही दिवसांत महिलांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिवाळीपूर्वीही या योजनेतील पैसे मिळू शकतात, अशी माहिती समोर येत आहे. जर सप्टेंबरचा हप्ता आणखी विलंबित झाला तर ऑक्टोबर आणि सप्टेंबरचे दोन्ही हप्ते एकत्रितपणे जमा होण्याची शक्यता आहे.
01 Oct 2025 08:46 AM (IST)
मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ सोमवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. नवी मुंबईतील एका वृद्धाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून मोठा अनर्थ टाळला.
माहितीनुसार, संबंधित वृद्धाने नवी मुंबई महापालिका आणि पोलिस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. महापालिका आणि पोलिस मदत करत नसल्याचा आरोप करत त्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तो सोबत रॉकेलची बाटली घेऊन आला होता. अंगावर रॉकेल ओतण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला थांबवून ताब्यात घेतले.
01 Oct 2025 08:43 AM (IST)
अतिवृष्टी, पुरामुळे मराठवाड्यात 32 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पंचनाम्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे पंचनामे करण्यात अडसर येत असल्याने ते थांबले होते. दरम्यान, आता पाऊस ओसरल्याने पंचनाम्यांना पुन्हा गती देण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. येत्या 5 ऑक्टोबरपर्यंत पंचनाम्यांचे काम पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी यंत्रणेला केल्या आहेत. जून ते ऑगस्टपर्यंतचे नुकसानीसाठीचा मदतनिधी मंजूर झाला असून, निधीचे डीबीटी प्रणालीद्वारे संबंधित बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. बाधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी करुन घ्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून केले.
01 Oct 2025 08:41 AM (IST)
सध्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवसापासून अनेक नियमांत बदल केला जात आहे. त्यातच आता ऑक्टोबर महिना आजपासून सुरू झाला आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला रेल्वेने तिकीट बुकिंग नियमांमध्ये काही बदल केले आहेत, ज्याचा प्रवाशांना फायदा होईल. शिवाय, एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल करण्यात आला असून, दरात वाढ झाली आहे. याचा तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. रेल्वे तिकीट बुकिंग नियमांमध्ये आजपासून एक नवीन बदल लागू झाला आहे. या नवीन बदलांतर्गत, ज्यांनी आधीच आधार पडताळणी केली आहे तेच आरक्षण उघडल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांत तिकीट बुक करू शकतील.
Marathi Breaking news live updates: फिलीपिन्समध्ये सोमवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपाने सेबू शहरासह आसपासच्या भागांना हादरवून सोडले. ६.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे किमान ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.
सेबू प्रांतातील बोगो सिटीच्या ईशान्येला १७ किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्र होते. अचानक झालेल्या या धक्क्यांमुळे सेबू शहरातील अनेक इमारतींना तडे गेले, तर एक जुने दगडी चर्च पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून दानबंतायन शहरात संपूर्ण अंधार पसरला आहे.
भूकंपामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. फिलीपिन्स हा जगातील सर्वाधिक आपत्तीग्रस्त देशांपैकी एक मानला जातो. पॅसिफिक महासागरातील “रिंग ऑफ फायर” भूकंपीय क्षेत्रात असल्यामुळे येथे वारंवार भूकंप होतात. याशिवाय दरवर्षी वादळे आणि चक्रीवादळांचा तडाखा देखील बसतो.