Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live: 300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना

तज्ज्ञांच्या मते, ही नाणी मेक्सिको, पेरू आणि बोलिव्हियाच्या स्पॅनिश वसाहतींमध्ये टाकण्यात आली असावीत. अनेक नाण्यांवर मिंट मार्क्स आणि तारखा स्पष्टपणे दिसतात.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 04, 2025 | 02:25 PM
LIVE
Top Marathi News Today Live: विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार; 2 नक्षलवादी ठार

Top Marathi News Today Live: विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार; 2 नक्षलवादी ठार

Follow Us
Close
Follow Us:
  • 04 Oct 2025 02:25 PM (IST)

    04 Oct 2025 02:25 PM (IST)

    पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…; नेमकं काय घडलं?

    राजस्थान येथून एक हत्येची धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीनेच आपल्या पत्नीची हत्या करून मृतदेह दुःखाच्या तळघरात पुरल्याचे समोर आले आहे. त्याने सहा दिवस मृतदेह लपवून ठेवल्यानंतर, त्याने पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस आता हत्येमागचा हेतू शोधत आहेत. ही घटना राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यात घडली आहे.

  • 04 Oct 2025 02:25 PM (IST)

    04 Oct 2025 02:25 PM (IST)

    India Rain Alert: आता नुसता पाऊस नव्हे तर…; ‘या’ राज्यांवरचे संकट वाढले, IMD चा अलर्टने चिंता वाढली

    India Weather Update: गेले काही दिवस देशभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे तर काही राज्यांमध्ये पावसाने थोडीशी विश्रांती घेतली होती. मात्र आता ऑक्टोबर महिन्यात अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर अनेक राज्यांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने कोणता अलर्ट दिला आहे ते जाणून घेऊयात.

  • 04 Oct 2025 02:15 PM (IST)

    04 Oct 2025 02:15 PM (IST)

    फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

    भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सुरु असलेल्या मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने दमदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाने संघासाठी आता पर्यत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. पहिल्या इंनिगमध्ये भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला 162 धावांवर रोखले तर दुसऱ्या इंनिगच्या पहिल्याच सेशनमध्ये भारताच्या संघाने वेस्ट इंडिजच्या पाच फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या सामन्यात दुसऱ्या इंनिगचा पहिला भारताचा विकेट मोहम्मद सिराजने पहिला विकेट मिळवून दिला.

  • 04 Oct 2025 02:01 PM (IST)

    04 Oct 2025 02:01 PM (IST)

    भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव

    भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये मालिकेचा पहिला सामना पार पडला. हा पहिला सामना तिसऱ्याच दिवशी संपला आहे. भारताचे संघाने पहिल्याच इनिंग मध्ये वेस्ट इंडिज समोर 448 धावा करून डाव घोषित केला होता. वेस्टइंडीजच्या संघाने पहिल्या डावामध्ये 162 धावा केल्या होता. टीम इंडियाने वेस्टइंडीजच्या संघाला पहिल्याच दिवशी दुसऱ्या सेशनमध्ये 162 धावांवर रोखले. तिसऱ्या दिवशी वेस्टइंडीजच्या संघाला भारतीय संघाने 146 धावांवर रोखले आणि सामना नावावर केला आहे.

  • 04 Oct 2025 02:00 PM (IST)

    04 Oct 2025 02:00 PM (IST)

    ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

    Huawei Watch D2 स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आले आहे. हुवावेच्या या नवीन स्मार्टवॉचमध्ये 1.82-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग आणि ECG सह स्किन टेंप्रेचरसारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. हे स्मार्टवॉच दमदार फीचर्सनी सुसज्ज आहे. टिकाऊपणाच्या बाबतीत, Huawei Watch D2 स्मार्टवॉच IP68 रेटिंगसह येते.

  • 04 Oct 2025 01:58 PM (IST)

    04 Oct 2025 01:58 PM (IST)

    प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद

    राज्यातील बहुतांश भागात पूर, अतिवृष्टीने शेतकऱ्यांची शेती, पिके, जनावरे, घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. अजूनही काही भागांत पूरस्थिती आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईतून आधार देण्याची सरकारची जबाबदारी असताना पुन्हा शेतकऱ्यांनीच शेतात घाम गाळून, कष्टाने पिकविलेल्या उसाच्या बिलांतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पूरग्रस्त निधीसाठी प्रतिटन १५ रुपये कपात करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला शेतकऱ्यांकडून विरोध होत असून, संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

  • 04 Oct 2025 01:55 PM (IST)

    04 Oct 2025 01:55 PM (IST)

    धावत्या लोकलमध्ये मोटारमनची तब्येत बिघडली अन्… ;काळ आला पण वेळ आली नव्हती

    मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल. चाकरमान्यांना वेळेत आणि कमी खर्चाच पोहोचवणारी एकमेव वाहतूक अर्थाततच मुंबई लोकल. याचे आजवर अनेक चांगले वाईट किस्से आहेत. सध्या एक अशीच विचित्र घटना घडली आहे ती म्हणजे नवी मुंबईमध्ये. धावत्या लोकलमध्ये एका मोटारमनची अचानक तब्येत बिघडली. कर्तव्य बजावत असाताना या मोटारमनला अचानक अस्वस्थ वाटू लागलं होतं. मात्र एवढ्या प्रवाशांच्या जीवाची जबाबदारी त्याच्यावर होती. या मोटारमनने प्रसंगावधान राखत आणि मोठ्या हिमतीने लोकल बेलापूर स्थानकात सुखरुप पोहोचवली.

  • 04 Oct 2025 01:50 PM (IST)

    04 Oct 2025 01:50 PM (IST)

    फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

    भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सुरु असलेल्या मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने दमदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाने संघासाठी आता पर्यत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. पहिल्या इंनिगमध्ये भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला 162 धावांवर रोखले तर दुसऱ्या इंनिगच्या पहिल्याच सेशनमध्ये भारताच्या संघाने वेस्ट इंडिजच्या पाच फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या सामन्यात दुसऱ्या इंनिगचा पहिला भारताचा विकेट मोहम्मद सिराजने पहिला विकेट मिळवून दिला.

  • 04 Oct 2025 01:45 PM (IST)

    04 Oct 2025 01:45 PM (IST)

    ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!

    महेश वामन मांजरेकर लिखित, दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांसमोर आला असून, टिझर पाहून या सिनेमाबद्दलची उत्कंठा प्रेक्षकांच्या मनात चांगलीच वाढली आहे आणि त्यात भर घातली ती काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘दुर्गे दुर्गट भारी’ या गाण्याने. या गाण्यात दिसणारा महेश मांजरेकर यांचा लूक प्रेक्षकांसाठी मोठं सरप्राईज ठरला आहे. आतापर्यंत विविध सकारात्मक, नकारात्मक भूमिकांमध्ये दिसलेले मांजरेकर पहिल्यांदाच साधूच्या भूमिकेत झळकत आहेत. त्यामुळे त्यांच्या या नवीन अवताराकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

  • 04 Oct 2025 01:35 PM (IST)

    04 Oct 2025 01:35 PM (IST)

    प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद

    राज्यातील बहुतांश भागात पूर, अतिवृष्टीने शेतकऱ्यांची शेती, पिके, जनावरे, घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. अजूनही काही भागांत पूरस्थिती आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईतून आधार देण्याची सरकारची जबाबदारी असताना पुन्हा शेतकऱ्यांनीच शेतात घाम गाळून, कष्टाने पिकविलेल्या उसाच्या बिलांतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पूरग्रस्त निधीसाठी प्रतिटन १५ रुपये कपात करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला शेतकऱ्यांकडून विरोध होत असून, संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

  • 04 Oct 2025 01:25 PM (IST)

    04 Oct 2025 01:25 PM (IST)

    रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं..?: अनिल परबांचा रामदास कदमांवर पलटवार

    शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी सनसनाटी दावा केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाही सुरू झाल्या होत्या. पण ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी कदमांवर त्याच सडेतोड भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अनिक परब यांनी केली आहे. पण परब यांच्या या मागणीमुळे शिंदे गट आणि ठाकरे गटात पुन्हा नव्या वादाची ठिणगी पडणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

  • 04 Oct 2025 01:15 PM (IST)

    04 Oct 2025 01:15 PM (IST)

    “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

    बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरु असल्याचे दिसून येता आहे. विविध राजकीय पक्षांमध्ये वाटाघाटींवर खल सुरू आहे. तर भारतीय निवडणूक आयोगाने एसआयआरची (सखोल मतदार पडताळणी) आकडेवारी जाहीर केली आहे. दरम्यान निवडणूक आयोग बिहार विधानसभा (Bihar Election) निवडणुकीची तयारी अंतिम करत आहे. बिहारची राजधानी पाटणा येथील ताज हॉटेलमध्ये आज (4 ऑक्टोबर) सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक झाली. या बैठकीत भाजपने निवडणूक आयोगाने दोन टप्प्यात निवडणुका घेण्याची मागणी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी बैठकीचे अध्यक्षपद भूषवले आहे.

  • 04 Oct 2025 01:02 PM (IST)

    04 Oct 2025 01:02 PM (IST)

    अमेरिकेत चौथ्या दिवशीही शटडाऊन सुरुच; ट्रम्प पुन्हा निधी विधेयक मंजूर करण्यात अपयशी

    सध्या अमेरिकेत मोठे संकट उभे राहिले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड (Donald Trump) ट्रम्प फंडिंग बिल पास करण्यात चौथ्यांदा अपयशी ठरले आहेत. हे बिल पास होण्यासाठी ६० मतांची आवश्यकता असते, पण सिनेटमध्ये या बिलाला केवळ ५४ मते मिळाली आहेत. यामुळे सरकारला आवश्यक निधी मिळू शकलेला नाही. यामुळे अमेरिकेत सर्वत्र सरकारी कामकाज ठप्प झाले आहे.

  • 04 Oct 2025 12:45 PM (IST)

    04 Oct 2025 12:45 PM (IST)

    अमरावतीमध्ये क्राईम ब्रांचची मोठी धाड फसली

    अमरावतीच्या परतवाड्यात मुंबई, नागपूर आणि अमरावती क्राईम ब्रांच पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. ती कारवाई म्हणजे पोलिसांनी दोन ठिकाणाहून १३ जणांना अटक करण्यात आली होती. यात आंतरराष्ट्रीय बिश्रोई गॅंगशी संबंधित एक आरोपी असल्याचा पोलीसांना माहिती मिळाली होती. मात्र तपासाअंती पोलिसांनी पकडण्यात आलेल्या सर्व संशयितांना सोडण्यात आलं. म्ह्णून हि कारवाई फसली का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

     

  • 04 Oct 2025 12:35 PM (IST)

    04 Oct 2025 12:35 PM (IST)

    ४ महिन्याच्या बाळाला बॅरलमध्ये टाकून वडिलांची आत्महत्या

    बीडमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका चार महिन्याच्या बाळाला पाण्याच्या बॅरेलमध्ये टाकून वडिलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना गेवराई तालुक्यातील तालवाडा येथील तहत रामनगर येथे घडली आहे.

  • 04 Oct 2025 12:25 PM (IST)

    04 Oct 2025 12:25 PM (IST)

    पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

    पुणे : शांत शहरातील गजबजलेला फर्ग्युसन कॉलेज रोड, वर्दळीचा कॅम्पमधील एम. जी. रोड आणि विश्रांतवाडीतील उच्चभ्रू आर अँड डी ई परिसर मोठ्या थराराने गाजला. अंगावर शहारे आणणारा हा सर्व थरार नागरिकांनी डोळ्यात साठवला. पण, भितीने काही काळ हृदयाचा ठोका चुकवलेला हा प्रसंग एक मॉकड्रिल असल्याचे समजल्यानंतर त्यांनी नि:श्वास सोडला. या ड्रिलमध्ये सुरक्षा दल, विमान हायजॅक व नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स (एनएसजी), केंद्रीय दल आणि स्थानिक पोलिसांचा सहभाग होता.

  • 04 Oct 2025 12:15 PM (IST)

    04 Oct 2025 12:15 PM (IST)

    डोंबिवलीत मोबाईल पासवर्डवरून हाणामारी

    डोंबिवलीतील खोणी पलावा येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादात हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. आजोबा आणि मुलाने कंबरपट्टा व स्वयंपाकघरातील वस्तूंनी आई आणि मुलाला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. या हाणामारीत माय- लेक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • 04 Oct 2025 11:55 AM (IST)

    04 Oct 2025 11:55 AM (IST)

    रामदास कदम यांना किंमत मोजावी लागेल- संजय राऊत

    रामदास कदमांना किंमत मोजावी लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे रामदास कदम यांना मोठा दावा बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युबद्दल केला आहे.

  • 04 Oct 2025 11:46 AM (IST)

    04 Oct 2025 11:46 AM (IST)

    भाजीपालाच्या किंमती वाढल्या

    राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने मराठवाडा विदर्भ आणि धाराशिव या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीच मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे आता भाजीपाला मध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे दादरच्या भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

  • 04 Oct 2025 11:40 AM (IST)

    04 Oct 2025 11:40 AM (IST)

    भाजप पदाधिकारी मेळावा

    स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजप कंबर कसली आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज भाजपचा महाराष्ट्रातील पहिला विजय संकल्प मेळावा होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कूर याठिकाणी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. भाजपचे नेते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, आमदार शिवाजी पाटील, आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या वतीने पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले जाणार आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवार निवडताना कसरत करावी लागणार आहे. जर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्वतंत्र लढल्यास कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी काटे की टक्कर पाहायला मिळेल.

  • 04 Oct 2025 11:34 AM (IST)

    04 Oct 2025 11:34 AM (IST)

    उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर

    ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असून दुपारी बारा वाजता ते पुणे श्रमिक पत्रकार संघ वार्तालाप करणार आहेत. त्यानंतर 1 वाजता अजित नागरी पतसंस्था महिला मेळाव्याला संबोधित करतील. तर पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात शिवसेना शाखा प्रमुख व पदाधिकाऱ्यांची बैठकीत ते मार्गदर्शन करणार आहेत.

  • 04 Oct 2025 11:30 AM (IST)

    04 Oct 2025 11:30 AM (IST)

    कल्याणच्या हिरवळीची कत्तल

    स्मार्ट सिटीत ‘झाडं तोडा, स्टॉल जोडा’चा घाट. अधिकृत फूड प्लाझा बंद, मात्र लोखंडी स्टॉल्ससाठी झाडांची कत्तल. ​मॉर्निंग वॉकर्स संतापले; ‘वॉर्म-अप’ची जागा बळकावली: “आम्ही फिरायचं कुठे?” कल्याणकरांचा प्रशासनाला संतप्त सवाल.

  • 04 Oct 2025 11:25 AM (IST)

    04 Oct 2025 11:25 AM (IST)

    उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) १०० व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असताना, शिवसेनेच्या मुखपत्राने प्रश्न उपस्थित केले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सामनामधील अलीकडील एका लेखात आरएसएसच्या डीएनए आणि विचारसरणीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. लेखात असा दावा केला आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाच्या संकल्पनेचा पुनर्विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे.

  • 04 Oct 2025 11:20 AM (IST)

    04 Oct 2025 11:20 AM (IST)

    करमाळा इथं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वाद विकोपाला

    एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे करमाळा इथले जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. महेश चिवटे हे शिंदेंचे स्वीय सहायक मंगेश चिवटे यांचे बंधू आहे. रश्मी बागल, दिग्विजय बागल यांच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा आरोप महेश चिवटे यांनी केला आहे.

  • 04 Oct 2025 11:10 AM (IST)

    04 Oct 2025 11:10 AM (IST)

    जळगाव शासकीय रुग्णालयातील डॉक्टरवर हल्ला

    जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कनिष्ठ निवासी डॉ. मोहित गादिया यांच्यावर उपचारादरम्यान रुग्णाच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. रुग्णालयात गर्दी केल्यामुळे डॉक्टरांनी नातेवाईकांना बाहेर जाण्यास सांगितले होते. त्याचा राग आल्याने काही नातेवाईकांनी डॉ. गादिया यांना कानशिलात लगावत खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत डॉक्टरांच्या कानाचा पडदा फाटला असून नाकातून रक्तस्त्रावही झाला आहे. पोलिसांनी दोघा संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.

  • 04 Oct 2025 10:59 AM (IST)

    04 Oct 2025 10:59 AM (IST)

    कधी लाँच होणार सॅमसंगचा ट्रिपल स्क्रीनवाला फोन?

    गेल्या काही महिन्यांपासून सॅमसंगच्या पहिल्या ट्राय फोल्ड फोनबाबत प्रचंड चर्चा सुरु झाली आहे. हा स्मार्टफोन कधी लाँच होणार, त्याची किंमत किती असणार आणि त्याचे फीचर्स काय असणार याबाबत युजर्समध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या फोनबाबत आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. या अपडेटमध्ये फोनच्या लाँचिंग डेटबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की, हा आगामी ट्राय फोल्ड फोन लवकरच लाँच केला जाणार आहे.

  • 04 Oct 2025 10:55 AM (IST)

    04 Oct 2025 10:55 AM (IST)

    हृदयद्रावक! कौटुंबिक वादातून टोकाचं निर्णय

    बीडमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका चार महिन्याच्या बाळाला पाण्याच्या बॅरेलमध्ये टाकून वडिलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना गेवराई तालुक्यातील तालवाडा येथील तहत रामनगर येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमोल हौसराव सोनवणे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने आधी आपल्याच चार महिन्याच्या बाळाला बॅरलमध्ये टाकून जीवे मारले. त्यांनतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली.

  • 04 Oct 2025 10:50 AM (IST)

    04 Oct 2025 10:50 AM (IST)

    गणेश नाईकांच्या टिकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर

    अलीकडील एका कार्यक्रमात गणेश नाईक यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव न घेता थेट शिंदे गटावर टीकेचे बाण सोडले. त्यांच्या या हल्लाबोलानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी नाईकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण आणखी तापले असून आगामी काळात या संघर्षाला कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 04 Oct 2025 10:43 AM (IST)

    04 Oct 2025 10:43 AM (IST)

    वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलमध्ये राजेश मापुस्करांचा खुलासा

    दिग्दर्शक राजेश मापुसकर यांच्या मास्टरक्लासपासून हंसल मेहता यांच्या पॅनेल डिस्कशनपर्यंत वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हल मध्ये काय काय घडलं याची चाहत्यांनाही नक्कीच उत्सुकता लागून राहिली आहे कारण वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलचा (WIFF) उद्घाटन सोहळा 2 ऑक्टोबरला अगदी मोठ्या दिमाखात पार असून ज्यामध्ये सिनेरसिक, इंडस्ट्रीतील जाणकार आणि स्वतंत्र फिल्ममेकर मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचा बघायला मिळालं.

  • 04 Oct 2025 10:33 AM (IST)

    04 Oct 2025 10:33 AM (IST)

    कठीण काळात अनिल अंबानीची लागली लॉटरी

    एकीकडे अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढत आहेत, तर दुसरीकडे त्यांना आनंदाची बातमीही मिळत आहे. SBI कर्ज प्रकरणात त्यांना मुंबई उच्च न्यायालयातून धक्का बसला आहे. सर्व कायदेशीर अडचणींमध्येही त्यांना परदेशातून आनंदाची बातमी मिळत आहे. अनिल अंबानी परदेशात एक मोठा करार करणार आहेत. या करारामुळे त्यांच्या बँक खात्यात ₹१००,०००,०००,००० येणार आहेत.

  • 04 Oct 2025 10:25 AM (IST)

    04 Oct 2025 10:25 AM (IST)

    IND vs WI : भारताच्या संघाने 448 धावांवर केला डाव घोषित

    वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही खराब झाली. मोहम्मद सिराजने ताजनारायण चंद्रपॉलला बाद करून पहिला ब्रेकथ्रू मिळवला. नितीश रेड्डीने एक शानदार कॅच घेतला. तत्पूर्वी, तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी शुभमन गिलने ४४८ धावांवर भारतीय डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. भारताने पाहुण्यांवर २८६ धावांची आघाडी घेतली आहे.

  • 04 Oct 2025 10:22 AM (IST)

    04 Oct 2025 10:22 AM (IST)

    टेक जायंट कंपनी धमाका करण्यासाठी सज्ज!

    सप्टेंबरमध्ये टेक जायंट कंपनी Apple ने आयफोन 17 सीरीजसह अनेक नवीन प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. या प्रोडक्ट्सनंतर आता कंपनी पुन्हा एकदा नवीन प्रोड्क्टस लाँच करणार आहे. अशी माहिती समोर आली आहे की, कंपनी ऑक्टोबर महिन्यात 5 नवीन प्रोडक्ट्स लाँच करणार आहे. आगामी प्रोडक्ट्स Apple इकोसिस्टमच्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये लाँच केले जाणार आहेत. या आगामी प्रोड्क्समध्ये आयपॅडपासून नवीन Apple टिव्हीपर्यंत अनेक प्रोड्क्टसचा समावेश असणार आहे. कंपनी या महिन्यात कोणते नवीन प्रोडक्ट्स लाँच करणार आहे, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • 04 Oct 2025 10:11 AM (IST)

    04 Oct 2025 10:11 AM (IST)

    'ट्रॉफी चोर’ मोहसीन नक्वीला पाकिस्तानात सन्मानित करण्यात येणार

    टीम इंडियाने स्पष्ट केले होते की ते पाकिस्तान बोर्डाचे प्रमुख आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत. परिणामी नक्वी ट्रॉफी घेऊन पळून गेले आणि सोशल मीडियाने त्यांना ट्रॉफी चोर म्हटले. या उघड अपमानानंतरही, पाकिस्तानमध्ये त्यांचा सन्मान होणार आहे. आता ट्रॉफी घेऊन पळून गेल्याबद्दल त्यांना सुवर्णपदक मिळणार आहे. अनेक लोकप्रिय पाकिस्तानी नेते देखील या समारंभात सहभागी होतील.

  • 04 Oct 2025 09:59 AM (IST)

    04 Oct 2025 09:59 AM (IST)

    परतवाड्यात गोळीबार, बिश्नोई गॅंगशी संबंधाचा संशय

    अमरावती: अमरावतीच्या परतवाड्यात मुंबई, नागपूर आणि अमरावती क्राईम ब्रांच पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. ती कारवाई म्हणजे पोलिसांनी दोन ठिकाणाहून १३ जणांना अटक करण्यात आली होती. यात आंतरराष्ट्रीय बिश्रोई गॅंगशी संबंधित एक आरोपी असल्याचा पोलीसांना माहिती मिळाली होती. मात्र तपासाअंती पोलिसांनी पकडण्यात आलेल्या सर्व संशयितांना सोडण्यात आलं. म्ह्णून हि कारवाई फसली का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

  • 04 Oct 2025 09:50 AM (IST)

    04 Oct 2025 09:50 AM (IST)

    आज सलमान कोणाची घेणार शाळा?

    कलर्सचा वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १९’ हा हाय-व्होल्टेज ड्रामापासून मुक्त होणे अशक्य आहे. या स्पर्धकांना कितीही समजावून सांगितले तरी ते त्यांच्या कृत्यांपासून मागे हटत नाहीत. अशा परिस्थितीत सलमान खान हा एकमेव असा व्यक्ती आहे ज्याच्याकडे त्यांना हाताळण्याची ताकद आहे. हे सर्व स्पर्धक बॉलिवूडच्या दबंग खानसमोरही सरळ होतात. या वीकेंड का वारमध्ये, सलमान खान ज्यांनी सुधारणा केली नाही त्यांनाही सुधारेल. या आठवड्यात सलमान खान ‘बिग बॉस १९’ च्या सहा स्पर्धकांना एकामागून एक फटकारण्याची शक्यता आहे.

  • 04 Oct 2025 09:40 AM (IST)

    04 Oct 2025 09:40 AM (IST)

    महिलेने बिबट्याला घडवली अद्दल, ओढतच घेतलं घरात...

    बिबट्या हा जंगलाचा एक धोकादायक शिकीरी आहे, त्याच्या शिकारीने संपूर्ण जंगल हादरतं. पण मानवी वस्तीत मात्र त्याचा काही टिकाव लागला नाही. बिबट्याने जेव्हा पहिल्यांदा मानवी वस्तीत एंट्री घेतली तेव्हा त्याचे असे हाल केले की जन्मभर त्याला ते विसरता येणार नाही. जंगलाचा शिकारी एका महिलेच्या घराबाहेर गेला आणि तिथेच त्याचा अनोखा स्वागतसमारंभ झाला. महिलेने शिकाऱ्याची अशी हालत केली की पाहणारे पाहतंच राहिले. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

  • 04 Oct 2025 09:30 AM (IST)

    04 Oct 2025 09:30 AM (IST)

    मध्यरात्री पाकिस्तानला ४.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

    Earthquake in Pakistan:  भारताच्या शेजारील देश पाकिस्तानमध्ये नैसर्गिक आपत्तींनी लोकांना त्रास देत आहे. पुराचे संकट अद्याप कमी झालेले नाही आणि वारंवार येणाऱ्या भूकंपांमुळे आता घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी पहाटे १:५९ वाजता ४.५ रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवण्यात आला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, भूकंपाचे केंद्र जमिनीपासून सुमारे १० किलोमीटर खाली होते.

  • 04 Oct 2025 09:20 AM (IST)

    04 Oct 2025 09:20 AM (IST)

    मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार

    मुंबई: मुंबईतून एक धक्कदायक प्रकार समोर आलं आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत नृत्यांगना म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीवर बलात्काराची खळबळजनक घटना घडली आहे. आरे पोलिसांनी २२ वर्षीय नृत्य प्रशिक्षक आणि इव्हेंट ऑर्गनायझर असलेल्या तरुणाला याप्रकरणी अटक केली आहे. हा प्रकार सहा महिन्यांपूर्वी घडला होता. आता या घटनेची तक्रार दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे.

  • 04 Oct 2025 09:10 AM (IST)

    04 Oct 2025 09:10 AM (IST)

    भारताला WTC पॉइंट्स टेबलमध्ये कोणताही फायदा मिळणार नाही!

    भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दोन सामन्याची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. पहिल्या इंनिगमध्ये भारताच्या संघाने वेस्ट इंडिजच्या संघाला सर्वबाद करुन भारताचा संघ मागील दोन दिवसांपासून फलंदाजी करत आहे. भारताच्या संघाने या मालिकेमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाला पराभूत केले तरी संघ हा WTC पाॅइंट टेबलमध्ये फायदा होणार की नाही यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.

  • 04 Oct 2025 08:58 AM (IST)

    04 Oct 2025 08:58 AM (IST)

    मुख्यमंत्री फडणवीसांचे मराठी भाषेबाबत महत्वाचे विधान

    मुंबई: भाषा ही संस्कृती जिवंत ठेवण्याचे माध्यम आहे. देशातील प्रत्येक भाषेने सांस्कृतिक ठेव दिलेली आहे. या सांस्कृतिक उत्थानात भाषेचे महत्त्व असल्याने मातृभाषा आणि इतर भाषांना जिवंत ठेवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आपली मराठी भाषा ही कालही अभिजात होती, आजही अभिजात आहे, आणि उद्याही अभिजातच राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठीचा सन्मान हा आपल्या सर्वांचा सन्मान आहे. गावा-गावांतून, घरा-घरांतून ज्या ओव्या गायल्या, त्या माऊलीचा, रामप्रहारी येणाऱ्या वासुदेवांचा, देवळातून गुंजणाऱ्या आरतीचा, भजन-कीर्तनाचा, संतपरंपरेचा, शाहिरांच्या पोवाड्याचा हा सन्मान आहे. संत ज्ञानेश्वरांच्या भावार्थ दीपिकेपासून ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वचिंतनापर्यंत अशा सर्वच विचारवंतांचा हा सन्मान आहे.

  • 04 Oct 2025 08:57 AM (IST)

    04 Oct 2025 08:57 AM (IST)

    अभिषेक शर्माने देशासाठी केला खूप मोठा त्याग

    भारताचा अ संघ सध्या ऑ्स्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामना खेळत आहे. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा सध्या देशासाठी खेळण्यात व्यस्त आहे. पण या व्यस्त वेळापत्रकामुळे त्याला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या कौटुंबिक सोहळ्याला मुकावे लागले. ३ ऑक्टोबर रोजी त्याची मोठी बहीण कोमल शर्मा लग्नबंधनात अडकली, परंतु त्याचा धाकटा भाऊ अभिषेक या खास दिवशी तिच्यासोबत उपस्थित नव्हता. त्याने देशासाठी मोठा त्याग केला आणि टीम इंडियासाठी फलंदाजी करण्यासाठी आला, पण तो निराश झाला.

  • 04 Oct 2025 08:57 AM (IST)

    04 Oct 2025 08:57 AM (IST)

    सोन्या-चांदीच्या किंमतीत चढउतार सुरुच!

    भारतात आज 4 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,852 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,864 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,889 रुपये आहे. भारतात 3 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,868 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,879 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,901 रुपये होता.

Marathi Breaking news live updates : समुद्राच्या खोलवर लपलेल्या रहस्यांच्या कथा नेहमीच रोमांचक असतात. अमेरिकेतील फ्लोरिडा किनाऱ्यावरील Divers नी ३०० वर्षे जुन्या जहाजाच्या ढिगाऱ्यातून १,००० हून अधिक सोन्या-चांदीची नाणी शोधून काढली आहेत. हे तेच जहाज आहे जे ऐतिहासिकदृष्ट्या “Treasure Fleet” म्हणून ओळखले जाते. १७१५ मध्ये, हे स्पॅनिश जहाज वादळात बुडाले आणि लाखो रुपयांचा खजिना सोबत घेऊन गेले. या शोधामुळे पुन्हा एकदा ३०० वर्षे जुन्या दुर्घटनेला पुन्हा जिवंत केले आहे.

वाचा सविस्तर- 300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले

 

 

Web Title: Marathi breaking news today live updates political national crime sports international entertainment news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2025 | 08:54 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today:  पाऊस चिंता वाढवणार; ऑक्टोबरमध्येही धुमाकूळ घालणार
1

Top Marathi News Today: पाऊस चिंता वाढवणार; ऑक्टोबरमध्येही धुमाकूळ घालणार

Top Marathi News Today: भारताच्या संघाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजय! पहा Video
2

Top Marathi News Today: भारताच्या संघाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजय! पहा Video

Top Marathi News Today Live: मुसळधार पावसाने मराठवाड्यात हाहाकार; संपर्क मार्ग ठप्प
3

Top Marathi News Today Live: मुसळधार पावसाने मराठवाड्यात हाहाकार; संपर्क मार्ग ठप्प

Top Marathi News Today: सुशिला कार्की यांनी घेतली नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान पदाची शपथ
4

Top Marathi News Today: सुशिला कार्की यांनी घेतली नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान पदाची शपथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.