Top Marathi News Today Live: विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार; 2 नक्षलवादी ठार
29 Sep 2025 11:50 AM (IST)
आशिया कप 2025 फायनल मॅचमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना झाला. यामध्ये भारताने विजेतेपद पटकावल्यानंतर पाकिस्तानला उपविजेतेपद मिळाले. मात्र पाकिस्तानचा कॅप्टन मोशीन नक्वी यांनी पाकिस्तानी खेळाडूंना उपविजेता पुरस्कार न घेता चेक देखील फेकून दिला.
Big Breaking
Moshin Naqvi asked Pakistani players not to take the runner-up award
Because the Indian team refused to take the Trophy from him.
But the Pakistani players Haris Rauf and other said, We need money, we will take the award.#INDvsPAK pic.twitter.com/S2H7sOq5xE
— Yanika_Lit (@LogicLitLatte) September 28, 2025
29 Sep 2025 11:40 AM (IST)
भारतीय संघाने आशिया कप 2025 जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्वीटरवर लिहिले आहे की,#ऑपरेशनसिंदूर खेळाच्या मैदानावर. निकाल एकच आहे - भारत जिंकला! आपल्या क्रिकेटपटूंचे अभिनंदन, अशा भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या आहेत.
#OperationSindoor on the games field.
Outcome is the same - India wins!
Congrats to our cricketers.
— Narendra Modi (@narendramodi) September 28, 2025
29 Sep 2025 11:29 AM (IST)
खासदार संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील पूरस्थितीवर भाष्य केले. त्यांनी थेट राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधतला. “महाराष्ट्रामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर आहे आणि त्यामुळेच सर्वात जास्त डिझास्टर झाले आहे.” अशी टीका संजय राऊतांनी केली.
29 Sep 2025 11:20 AM (IST)
आज आपण डिझेल हे एक इंधन म्हणून ओळखतो. पण तुम्हाला हे माहिती आहे का इंधनाचा शोध नावणाऱ्या व्यक्तीचे आडनाव हे होते. रुडॉल्फ ख्रिश्चन कार्ल डिझेल यांनी इंधनाचा शोध लावला. त्यांच्या या शोधावरुन इंधनाला नाव देखील डिझेल देण्यात आले. १८९२ मध्ये पहिल्या कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन डिझाइनचे पेटंट घेतल्यानंतर, जर्मन शोधक आणि यांत्रिक अभियंता रुडोल्फ डिझेल यांनी पहिला डिझेल इंजिन प्रोटोटाइप यशस्वीरित्या तयार केला.जर्मन अभियंता असलेल्या रुडॉल्फ ख्रिश्चन कार्ल डिझेल यांचा आजच्या दिवशी 1913 साली मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूभोवती बरेच गूढ होते आणि अजूनही आहे. अधिकृतपणे ते आत्महत्या असल्याचे मानले गेले, परंतु अनेक लोकांचा असा विश्वास होता की डिझेलची हत्या झाली होती. मात्र आजही त्यांच्या शोधामुळे डिझेल यांचे नाव जगभरामध्ये रोज घेतले जाते.
29 Sep 2025 10:55 AM (IST)
जावळी तालुक्यातील आसनी येथे मार्च महिन्यात भोगवटा वर्ग एक असलेल्या क्षेत्रात बेकायदेशीररित्या खैर झाडांची वृक्षतोड झाली होती. या वृक्षतोडीवर वनपरिक्षेत्र अधिकारी जावली यांनी कारवाई करीत तब्बल आठ ते नऊ टन खैर पंचनामा करीत जप्त केला होता. मात्र हाच जप्त केलेला खैर वनविभागाच्या (Forest Department) कस्टडीतून चक्क चोरीला गेला असून, संबंधितावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे (Republican Party) जिल्हाध्यक्ष किरण बगाडे यांनी केली आहे.
29 Sep 2025 10:43 AM (IST)
अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर, सूर्यकुमार यादवने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले की, “मी या स्पर्धेतील माझी मॅच फी आपल्या सशस्त्र दलांना आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही नेहमीच माझ्या विचारात असाल.” सूर्यकुमार यादवने “जय हिंद” आणि भारतीय ध्वजाचे इमोजी देखील शेअर केले.
29 Sep 2025 10:33 AM (IST)
उत्तर प्रदेश येथून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका तरुणीने आपलं ठरलेलं लग्न मोडण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा फिल्मी षडयंत्र आखल्याचे समोर आले आहे. या तरुणीने आपल्या चेहऱ्यावर सॉस लावून रक्ताचे डाग असल्याचे भासवत धमकीचे फोटो आणि मेसेज पाठवले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांमध्ये एकाच खळबळ उडाली होती. तिने हे सर्व केळवळ ठरलेलं लग्न मोडावं या उद्देशाने केलं होत. परंतु पोलिसांनी जेव्हा या मुलीचा शोध घेता तेव्हा अनेक धक्कदायक बाब समोर आल्या आहेत. नेमकं काय घडलं?
29 Sep 2025 10:25 AM (IST)
महाराष्ट्राच्या लोककलेत खोलवर रुजलेली बारी आणि वारीची परंपरा आता रंगभूमीवर नव्या रुपात अनुभवायला मिळणार आहे. ‘संगीत बारी ते वारी’ हे नवे संगीतमय नाटक रसिक प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय मेजवानी ठरणार आहे. या नाटकात वारीची भक्तीभावाची झलक, लोककलेचा ठसा, तसेच जीवनातील संघर्ष आणि आनंद यांचे अप्रतिम चित्रण पाहायला मिळणार आहे. गायन, वादन, नृत्य आणि नाटक यांचा संगम घडवणारे हे प्रयोग प्रेक्षकांना रंगतदार अनुभव देणार आहेत.
29 Sep 2025 10:15 AM (IST)
फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी आजचे 29 सप्टेंबरसाठीचे रिडीम कोड्स जारी करण्यात आले आहेत. फ्री फायर मॅक्स प्लेअर्स या कोड्सची अगदी आतुरतेने वाट पाहत होते. या रिडीम कोड्सच्या मदतीने आज प्लेअर्सना वेपन, ग्लू वॉल स्किन, इमोट आणि पेट असे गेमिंग आयटम्स फ्रीमध्ये मिळणार आहेत. Free Fire Max मध्ये रिडीम कोड्ससाठी कोणतेही पैसे खर्च करण्याची गरज नाही. कारण गरेना रोज त्यांच्या प्लेअर्ससाठी रिडीम कोड्स जारी करत असते. या रिडीम कोड्सच्या मदतीने मोफत रिवॉर्ड्स मिळतात.
29 Sep 2025 09:59 AM (IST)
भारताने पाकिस्तानवर पाच विकेट्सने मात करून आशिया कप 2025 चे विजेतेपद नवव्यांदा पटकावले. मात्र सामन्यानंतरच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात अनपेक्षित वळण आले. भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष व पाकिस्तानी मंत्री मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.
29 Sep 2025 09:52 AM (IST)
हिमाचल प्रदेश: हिमाचल प्रदेशमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणीचं अर्धवट जळालेला मृतदेह आढळला असल्याचे समोर आले आहे. या मृतदेहाची ओळख पटली असून तीच नाव अंशिका असे आहे. ती केवळ २४ वर्षांची आहे. तीच २४ सप्टेंबरला लग्न होत. पण लग्नाच्या आधल्या दिवशीच तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
29 Sep 2025 09:46 AM (IST)
टीम इंडियाने २०२५ चा आशिया कप जिंकला, पण भारतीय संघाला ट्रॉफी नाकारण्यात आली. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या चॅम्पियन संघाला ट्रॉफी नाकारण्यात आली. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या आशिया कपच्या फायनलच्या सामन्यानंतर नवा वाद उकळला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसीन नक्षी यांनी भारताला ट्रॉफी देण्यास मनाई केली त्यानंतर ते ट्रॉफी घेऊन ड्रेसिंग मध्ये गेले. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आशियाई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष, जे पाकिस्तानी मंत्री देखील आहेत, यांच्या अहंकारामुळे हे घडले.
29 Sep 2025 09:40 AM (IST)
जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे आज २९ सप्टेंबर रोजी सोमवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-अप सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,८१६ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ १२६ अंकांचा प्रीमियम होता.
29 Sep 2025 09:30 AM (IST)
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टी-२० आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर पाच विकेट्सनी रोमांचक विजय मिळवला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताने १४७ धावांचे लक्ष्य दोन चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले आणि नवव्यांदा ट्रॉफी जिंकली. विजेतेपद जिंकल्यानंतर टीम इंडियाने आशियाई क्रिकेट परिषदेचे (Acc) प्रमुख आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांचा जाहीर अपमान केला. ते पाकिस्तानचे गृहमंत्री देखील आहेत.
29 Sep 2025 09:22 AM (IST)
भारताने पाकिस्तानवर पाच विकेट्सने मात करून आशिया कप 2025 चे विजेतेपद नवव्यांदा पटकावले. मात्र सामन्यानंतरच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात अनपेक्षित वळण आले. भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष व पाकिस्तानी मंत्री मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.
पीटीआयच्या वृत्तानुसार, पुरस्कार सोहळा सुरू होण्यापूर्वी नक्वी एका बाजूला उभे होते, तर भारतीय खेळाडू सुमारे 15 यार्ड अंतरावर थांबले होते. त्यांनी आपल्या जागांवरून हलण्यास नकार दिल्यामुळे समारंभ उशिरा पार पडला.
या घटनेवर निवृत्त पाकिस्तानी मेजर आदिल राजा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्स (पूर्वी ट्विटर) वर लिहिताना नमूद केले की, भारतीय संघाने नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देणे हा मोठा अपमान असून, याचा थेट धक्का पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या प्रतिमेलाही बसतो.
29 Sep 2025 09:20 AM (IST)
“बिग बॉस १९” या रिॲलिटी शोच्या अलिकडेच झालेल्या “वीकेंड का वार” एपिसोडने प्रेक्षकांना खूप चकीत करून टाकले. सलमान खानने त्याच्या उर्जेने आणि नृत्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले, तर या आठवड्यात आवेज दरबारवर नॉमिनेशनची वेळ आली. शोमधील त्याचा प्रवास कालपासून संपला आहे. त्याला जाताना पाहून घरातील सदस्य आणि चाहते दोघेही भावुक झाले. त्याच्या जाण्याने चाहते ‘बिग बॉस’ वर नाराजी व्यक्त करत आहेत.
29 Sep 2025 09:18 AM (IST)
टीम इंडियाने आशिया कप २०२५ जिंकला. भारताने आशिया कप जिंकण्याची ही नववी वेळ आहे. संपूर्ण आशिया कपमध्ये पाकिस्तान अस्वस्थ दिसत होता. भारताविरुद्धचा प्रत्येक सामना त्यांनी गमावला. पाकिस्तानी खेळाडूंनी आपला संयम गमावण्याचे हे एक कारण आहे. अंतिम सामन्यातही ही चिडचिड दिसून आली. भारताकडून झालेला पराभव पचवू न शकल्याने पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने मिळालेला उपविजेत्या संघाचा चेक सार्वजनिक ठिकाणी फेकला.
सामन्यानंतरच्या सादरीकरण समारंभात, आघा यांनी आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) प्रतिनिधी अमिनुल इस्लाम यांच्याकडून उपविजेत्या संघाचा चेक घेतला, मागे वळून तो जमिनीवर फेकला. त्यानंतर गर्दीने मोठ्याने ओरड केली.
29 Sep 2025 09:11 AM (IST)
भारतीय संघाने (Team India) आशिया चषक 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आणि विजेतेपद आपल्या नावे केले. मात्र, फायनलइतकाच पारितोषिक वितरण सोहळाही नाट्यमय ठरला. तासाभराहून अधिक वेळ चाललेल्या या कार्यक्रमात आशियाई क्रिकेट कौन्सिलचे (ACC) अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्या हस्ते ट्रॉफी व पदके स्वीकारण्यास भारतीय खेळाडूंनी नकार दिला. परिणामी, मोठा गोंधळ उडाला आणि नक्वी हे ट्रॉफी घेऊन थेट हॉटेलकडे रवाना झाल्याची चर्चा रंगली.
29 Sep 2025 09:10 AM (IST)
India’s team celebrated Asia Cup 2025 victory without the trophy : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये काल आशिया कप 2025 चा फायनलचा सामना पार पडला या सामन्यामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी करत विजय मिळवला. भारताचे संघाने पाकिस्तानला या स्पर्धेमध्ये तिसऱ्यांदा पराभूत करून आशिया कप २०२५ चे जेतेपद नावावर केले आहे. फायनल सामन्यांमध्ये भारताचा संघाने पाकिस्तानचा संघाला दोन चेंडू शिल्लक असताना पाच विकेट्स ने पराभूत केले. या स्पर्धेमध्ये टीम इंडियाचा युवा खेळाडू तिलक वर्मा याची अविश्वासनीय खेळी पाहायला मिळाली.
29 Sep 2025 09:03 AM (IST)
भारतीय संघाने (Team India) आशिया चषक 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 गडी राखून दमदार विजय मिळवत विजेतेपद पटकावले. या विजयात तिलक वर्मा (Tilak Verma) मुख्य हिरो ठरला, तर अखेरच्या चेंडूवर रिंकू सिंहने (Rinku Singh) मारलेल्या चौकारामुळे भारताचा विजय निश्चित झाला. विशेष म्हणजे, सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील टीम इंडियाने संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता थेट किताब आपल्या नावे केला.
फायनलइतकाच या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळाही रंगतदार ठरला. तासाभरापेक्षा अधिक वेळ चाललेल्या या समारंभात नाट्यमय वळण आले. कारण आशियाई क्रिकेट कौन्सिलचे (ACC) अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्या हस्ते आशिया चषक आणि व्यक्तिगत पुरस्कार स्वीकारण्यास भारतीय संघाने नकार दिला.
29 Sep 2025 09:03 AM (IST)
भारतात आज 29 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,547 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,584 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,660 रुपये आहे. भारतात आज 29 सप्टेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,05,840 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,15,470 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 86,600 रुपये आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 148.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,48,900 रुपये आहे.
Marathi Breaking news live updates- भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये काल आशिया कप 2025 चा फायनलचा सामना पार पडला या सामन्यामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी करत विजय मिळवला. भारताचे संघाने पाकिस्तानला या स्पर्धेमध्ये तिसऱ्यांदा पराभूत करून आशिया कप २०२५ चे जेतेपद नावावर केले आहे. फायनल सामन्यांमध्ये भारताचा संघाने पाकिस्तानचा संघाला दोन चेंडू शिल्लक असताना पाच विकेट्स ने पराभूत केले. या स्पर्धेमध्ये टीम इंडियाचा युवा खेळाडू तिलक वर्मा याची अविश्वासनीय खेळी पाहायला मिळाली.
वाचा सविस्तर-
भारताच्या संघाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजय! पहा Video