Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live: मुसळधार पावसाने मराठवाड्यात हाहाकार; संपर्क मार्ग ठप्प

Marathi breaking live marathi - लातूर जिल्ह्यातील मान्याड नदीलाही पूर आला असून, पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. शेणकुडमधील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 27, 2025 | 01:16 PM
LIVE
Top Marathi News Today Live: विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार; 2 नक्षलवादी ठार

Top Marathi News Today Live: विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार; 2 नक्षलवादी ठार

Follow Us
Close
Follow Us:
  • 27 Sep 2025 01:16 PM (IST)

    27 Sep 2025 01:16 PM (IST)

    Maharashtra Rain Alert: समुद्रात काय घराबाहेर जाऊ नका! कोकणात ‘न भूतो न भविष्यति’, ‘या’ जिल्ह्यांत पावसाने…

    Kokan Rain Alert: गेले काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकणात पुन्हा एकदा अस्मानी संकटाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणासाठी पुढचे तीन दिवस आँरेज अलर्ट देण्यात आला आहे.

  • 27 Sep 2025 01:15 PM (IST)

    27 Sep 2025 01:15 PM (IST)

    पुण्यातील बँक कर्मचाऱ्यासह १७ जण अटकेत

    पुण्यातून एक बँक कर्मचाऱ्याचा धक्कदायक प्रकार समोर आलं आहे. दिवसा बँकेत नोकरी करणारा तरुण रात्री मात्र ऑनलाईन मटक्याचे आकडे घेण्याचे काम करत असल्याचे समोर आले आहे. खडक पोलिसांनी कारवाई करत बँक कर्मचाऱ्यासह आणखी 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे.

  • 27 Sep 2025 01:15 PM (IST)

    27 Sep 2025 01:15 PM (IST)

    ‘रील स्टार’ चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न; १७ ऑक्टोबरला महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

    बहुचर्चित ‘रील स्टार’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. १७ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या या चित्रपटातील सुमधूर गीत-संगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘रील स्टार’च्या माध्यमातून सुमधूर संगीताची जोड देत एक आशयघन कथानक सादर करण्यात आले आहे. दादर शिवाजी पार्क जवळील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये ‘रील स्टार’ चित्रपटाचा दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते आणि संपूर्ण टिम उपस्थित होती. सारेगामा अंतर्गत संगीतप्रेमींना या चित्रपटातील गीते सादर केली जाणार आहेत.

  • 27 Sep 2025 01:05 PM (IST)

    27 Sep 2025 01:05 PM (IST)

    बिहारचे ७० हजार कोटी कुठे गायब झाले…? चंपारणमधून प्रियांका गांधींचा पंतप्रधानांवर टिकास्त्र

    बिहारची विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसली तरी, बिहारचे राजकीय वातावरण तापू लागले आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या मतदार अधिकार यात्रेनंतर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही त्यांच्यासोबत बिहारच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात प्रियांका गांधींनी बिहारच्या महिलांच्या खात्यात हजार रुपये जमा करणाऱ्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेवरून निशाणा साधला आहे.

  • 27 Sep 2025 01:00 PM (IST)

    27 Sep 2025 01:00 PM (IST)

    मुंबईत दांडियाचा जल्लोष राड्यात बदलला

    मुंबई येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. गोरेगाव नेसको सेंटरमध्ये गरबा खेळतांना धक्का लागल्यामुळे दोन गटात राडा झाल्याची घटना समोर आली आहे. यात १९ वर्षीय विध्यार्थी जखमी झाला आहे. या राड्यामुळे शिवसेना खासदार रवींद्र वायकर नेस्को सेंटर विरोधात आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांना भेटून नेस्को सेंटरवर कारवाई करण्याची मागणी खासदार रवींद्र वायकर करणार आहेत.

  • 27 Sep 2025 12:51 PM (IST)

    27 Sep 2025 12:51 PM (IST)

    मृत घोषित झालेली महिला सापडली जिवंत

    मुंबईतील विक्रोळी परिसरातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एक महिला जिला मृत घोषित करण्यात आले होते. ती कळव्यात जिवंत सापडली आहे. या महिलेचे नाव मनीषा सराटे असे आहे. मनीषा ही कन्नमवार नगर, विक्रोळी येथील रहिवासी असून ती गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता होती, असे सांगण्यात येत आहे.तिच्या कुटुंबियांना तिचा मृत झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी त्या तरुणीचा शोध घेण्यासाठी विक्रोळी गाठले. तिथे पोलिसांची मदत घेण्यात आली. तेव्हा तपासात ती जिवंत असल्याचे समोर आले आहे.

  • 27 Sep 2025 10:53 AM (IST)

    27 Sep 2025 10:53 AM (IST)

    बँक कर्मचाऱ्याचा धक्कदायक प्रकार

    पुण्यातून एक बँक कर्मचाऱ्याचा धक्कदायक प्रकार समोर आलं आहे. दिवसा बँकेत नोकरी करणारा तरुण रात्री मात्र ऑनलाईन मटक्याचे आकडे घेण्याचे काम करत असल्याचे समोर आले आहे. खडक पोलिसांनी कारवाई करत बँक कर्मचाऱ्यासह आणखी 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे.

  • 27 Sep 2025 10:48 AM (IST)

    27 Sep 2025 10:48 AM (IST)

    अंदमानच्या कुशीत सापडला ‘खजिना’

    भारताने एक मोठा विजय मिळवला आहे. अंदमान समुद्रात ३०० मीटर खोलवर लपलेला खजिना सापडला आहे. हा खजिना भारताच्या ऊर्जा क्षेत्रासाठी एक मोठी प्रगतीच ठरू शकतोय. अंदमान समुद्रात असलेल्या श्री विजयपुरम २ मध्ये नैसर्गिक वायूचे साठे सापडले असून पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्वतः अंदमान बेटांच्या पूर्व किनाऱ्यापासून सुमारे १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या या विहिरीत वायूचे साठे सापडल्याची घोषणा केली.

  • 27 Sep 2025 10:30 AM (IST)

    27 Sep 2025 10:30 AM (IST)

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू

    सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबईत उद्धव ठाकरे गटाविरोधात महायुतीने ताकदीने लढण्याची तयारी केली असून, बीएमसीवरील सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने कंबर कसली आहे.

    बातमी सविस्तर वाचा...

  • 27 Sep 2025 10:25 AM (IST)

    27 Sep 2025 10:25 AM (IST)

    भारतीय कर्णधाराने पाकला केलं चॅलेंज!

    विजयानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला, " हा सामना आम्हाला फायनलसारखा वाटला. पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावात भारतीय खेळाडूंनी खूप जोश दाखवला. मी त्यांना चांगली ऊर्जा राखण्यास सांगितले आणि आपण कुठे संपतो ते पहा. आम्हाला चांगली सुरुवात मिळाली. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी त्यांची लय शोधली आहे. संजू सलामीला येत नसला तरी तो जबाबदारी घेत आहे. तिलक देखील प्रचंड आत्मविश्वास दाखवत आहे, जे पाहणे चांगले होते."

  • 27 Sep 2025 10:15 AM (IST)

    27 Sep 2025 10:15 AM (IST)

    हार्दिक आणि अभिषेकच्या दुखापतींवर प्रशिक्षकांनी दिली मोठी अपडेट

    आशिया कप २०२५ मधील सुपर फोर सामने आता संपले आहेत. टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात आला. टीम इंडियाने हा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला. आता अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाईल. तथापि, हार्दिक पंड्या आणि अभिषेक शर्मा यांना झालेल्या दुखापतींमुळे अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाचा ताण वाढला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर, टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी या दोन्ही खेळाडूंच्या दुखापतींबद्दल अपडेट दिले.

    बातमी सविस्तर वाचा...

  • 27 Sep 2025 10:08 AM (IST)

    27 Sep 2025 10:08 AM (IST)

    Xiaomi, Poco आणि Redmi च्या या डिव्हाईसना मिळणार अपडेट

    चायनीज स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने त्यांचे लेटेस्ट सॉफ्टवेयर HyperOS 3 अखेर लाँच केले आहे. कंपनीचे हे ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉयड 16 वर आधारित आहे. स्मार्टफोन मेकर कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया मीडिया अकाऊंटवरून या सॉफ्टवेयर अपडेटचा ग्लोबल रिलीज टाइम लाइन शेयर केला आहे. असं सांगितलं जात आहे की, या नवीन अपडेटमध्ये अनेक नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे हे नवीन अपडेट वापरताना युजर्सना अधिक चांगला अनुभव येणार आहे.

  • 27 Sep 2025 10:00 AM (IST)

    27 Sep 2025 10:00 AM (IST)

    भारत आणि श्रीलंका यांच्यात रंगणार ICC Womens World Cup 2025 चा पहिला सामना

    ICC Womens World Cup 2025 First Match : आयसीसी महिला विश्वचषक 2025 ला आता फक्त तीन दिवस शिल्लक राहिले आहेत.  या विश्वचषकाचा पहिला सामना हा भारत विरुद्ध श्रीलंका महिला संघांचा खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका या विश्वचषकाचा पहिला सामना हा गुवाहाटी येथे रंगणार आहे. भारताच्या संघासाठी पहिला सामना हा फार महत्वाचा असणार आहे टीम इंडिया त्यांच्या घरच्या मैदानावर आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाची सुरुवात विजयाचा हेतूनेच मैदानात उतरेल. विश्वचषक सुरू होण्याआधी भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमधील हेट टू हेड आकडेवारी कशी आहे कोणाचे पारडे जड आहे या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.

  • 27 Sep 2025 09:56 AM (IST)

    27 Sep 2025 09:56 AM (IST)

    मृत घोषित झालेली महिला सापडली जिवंत

    मुंबई: मुंबईतील विक्रोळी परिसरातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एक महिला जिला मृत घोषित करण्यात आले होते. ती कळव्यात जिवंत सापडली आहे. या महिलेचे नाव मनीषा सराटे असे आहे. मनीषा ही कन्नमवार नगर, विक्रोळी येथील रहिवासी असून ती गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता होती, असे सांगण्यात येत आहे. तिच्या कुटुंबियांना तिचा मृत झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी त्या तरुणीचा शोध घेण्यासाठी विक्रोळी गाठले. तिथे पोलिसांची मदत घेण्यात आली. तेव्हा तपासात ती जिवंत असल्याचे समोर आले आहे.

  • 27 Sep 2025 09:52 AM (IST)

    27 Sep 2025 09:52 AM (IST)

    सुपर ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर धावबाद होऊनही शनाका नाबाद?

    भारताचा शेवटचा सुपर 4 चा सामना हा श्रीलंकेविरुद्ध पार पडला, या सामन्यामध्ये भारताच्या संघाने सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला. २०२५ आशिया कपमधील शेवटचा सुपर फोर सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २०२ धावा केल्या, तर श्रीलंकेनेही २०२ धावा केल्या, ज्यामुळे सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर पंचांनी निकाल निश्चित करण्यासाठी सुपर ओव्हर बोलावण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या फलंदाजीदरम्यान, चौथा चेंडू चर्चेचा विषय बनला. पंचांनी दासुन शनाकाला बाद देऊनही नॉट आऊट घोषित केले. चला संपूर्ण प्रकरणाचा शोध घेऊया.

  • 27 Sep 2025 09:49 AM (IST)

    27 Sep 2025 09:49 AM (IST)

    पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये बदल

    शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत महत्त्वाची घडामोड झाली आहे. या योजनेत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात २० हप्त्यांचे पैसे जमा झाले आहेत. आता शेतकरी २१व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असताना, सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होणार असून, ठरावीक अटी पूर्ण न केल्यास पुढील हप्ता मिळण्यात अडचणी येऊ शकतात, अशी माहिती मिळतेय. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

  • 27 Sep 2025 09:47 AM (IST)

    27 Sep 2025 09:47 AM (IST)

    सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा बदल!

    भारतात आज 27 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,489 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,531 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,617 रुपये आहे. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,05,310 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,890 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 86,170 रुपये आहे.

  • 27 Sep 2025 09:37 AM (IST)

    27 Sep 2025 09:37 AM (IST)

    काँग्रेस नेते राहुल गांधी येणार मराठवाडा दौऱ्यावर

    नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यावर येणार असल्याची माहिती सध्या दिली जात आहे. राहुल गांधी हे मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करण्याची शक्यता असून, दसऱ्या आधीच पूरग्रस्त पीडितांची भेट घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, आपल्या दौऱ्यात कल्याणमधील साडी प्रकरणातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांची भेट घेऊन काँग्रेसच्यावतीने त्यांचा सन्मानही केला जाणार असल्याचे समजते.

  • 27 Sep 2025 09:32 AM (IST)

    27 Sep 2025 09:32 AM (IST)

    आशिया कप 2025 : सुपर ओव्हरमध्ये भारताचा थरारक विजय; पण कुठे होता हार्दिक पांड्या  

    आशिया कप 2025 मध्ये भारतीय संघाने आपला विजयरथ कायम ठेवत सुपर-4 मधील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेवर नाट्यमय विजय मिळवला. हा सामना इतका चुरशीचा झाला की निकाल सुपर ओव्हरवर जाऊनच ठरला. या सामन्यातील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हार्दिक पांड्या गोलंदाजीसाठी दिसला का नाही? आशिया कपमधील आतापर्यंतच्या प्रत्येक सामन्यात त्याने नवीन चेंडूने पहिलं षटक टाकलं होतं. श्रीलंकेविरुद्धही त्याने सुरुवातीला कुसल मेंडिसचा मौल्यवान विकेट घेतला. मात्र त्यानंतर संपूर्ण डावात तो पुन्हा गोलंदाजीसाठी आला नाही.

  • 27 Sep 2025 09:30 AM (IST)

    27 Sep 2025 09:30 AM (IST)

    टेंबलाई देवीचा ललित पंचमी सोहळा आज

    कोल्हापूर : कोल्हापूरच्या शारदीय नवरात्रौत्सवातील ललिता पंचमीचा सोहळा शनिवारी (दि. २७) रोजी साजरा होणार आहे. कोल्हासुराच्या वधाचे प्रतीक असलेला कुष्मांड भेदन विधी टेंबलाई टेकडीवर होणार आहे. त्यासाठी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची पालखी तुळजाभवानी व गुरुमहाराज यांच्या पालखीसह त्र्यंबोलीच्या भेटीला जाणार आहे. यानिमित्ताने पालखी मार्गावर स्वागत कमानी, पायघड्या घालण्यात आल्या असून, प्रथेनुसार पालखी विसाव्यासाठी शाहूमिल आवारात तयारी पूर्ण झाली आहे.

  • 27 Sep 2025 09:22 AM (IST)

    27 Sep 2025 09:22 AM (IST)

    राज्यात पुन्हा दमदार पाऊस होणार

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच उघडीप दिलेला पाऊस आता पुन्हा दमदार बरसताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस पडेल. तर पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातील घाट परिसरात आणि नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) 26 ते 29 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

  • 27 Sep 2025 09:15 AM (IST)

    27 Sep 2025 09:15 AM (IST)

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल; महायुतीची रणनीती ठरविण्याची तयारी

    राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, नोव्हेंबरपासून या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याआधीच महायुतीने रणनीती आखण्याचे काम गती घेतले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. मात्र काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याचीही चिन्हे आहेत. विशेषतः मुंबईत ठाकरे गटाविरोधात महायुती ताकदीने लढण्याची तयारी करत आहे. बीएमसीवर सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कंबर कसली आहे.

Marathi Breaking news live updates:  दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने मराठवाड्यासह विदर्भात थैमान घातले आहे. नांदेड, हिंगोली, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत रविवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची संततधार सुरू झाली. आधीच्याच पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर या पावसामुळे आणखी संकट कोसळले आहे.

मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली असून, हिंगोली–पूसद हा मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमदूरी तालुक्यातील माळेगाव परिसरात पूरस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी आणि नागरिकांच्या हालचालींवरही परिणाम झाला आहे. अनेक वाहने रस्त्यावर अडकून पडली आहेत.

लातूर जिल्ह्यातील मान्याड नदीलाही पूर आला असून, पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. शेणकुडमधील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.  परिणामी, विदर्भ–मराठवाड्याचा संपर्क तुटल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Marathi breaking news today live updates political national international crime sports entertainment lifestyle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 09:14 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today: सुशिला कार्की यांनी घेतली नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान पदाची शपथ
1

Top Marathi News Today: सुशिला कार्की यांनी घेतली नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान पदाची शपथ

Top Marathi News Today: विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार; 2 नक्षलवादी ठार
2

Top Marathi News Today: विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार; 2 नक्षलवादी ठार

Top Marathi News Today:  उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या भेटीला; अनिल परब, संजय राऊत देखील सोबत
3

Top Marathi News Today: उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या भेटीला; अनिल परब, संजय राऊत देखील सोबत

Top Marathi News Today: कुणबी-मराठा आरक्षणाला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध; थेट मराठा म्हणून आरक्षणाची मागणी
4

Top Marathi News Today: कुणबी-मराठा आरक्षणाला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध; थेट मराठा म्हणून आरक्षणाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.