Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra budget session 2025 Live : लाडक्या बहीणींना मिळणार का 2100 रुपये? राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु

Maharashtra Assembly Budget Session : महायुती सरकार दुसऱ्यांदा स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. अधिवेशनला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांना घेरले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 03, 2025 | 11:37 AM
Maharashtra Assembly Budget Session 3rd March 2025 Live Updates

Maharashtra Assembly Budget Session 3rd March 2025 Live Updates

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Assembly Budget Session 2025 Live : मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (दि.03) सुरु झाले आहे. विधीमंडळ आवारमध्ये नवीन उत्साह दिसून येत आहे. विधीमंडळ आवारामध्ये सत्ताधारी नेत्यांसह विरोधी नेते देखील उपस्थित आहेत. राज्यामध्ये विधानसभा निवडणूका झाल्यानंतर आणि पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. यामुळे महायुती सरकार राज्याच्या लोकांना कोणत्या नवीन योजना आणि प्रकल्प देणार तसेच कोणत्या जिल्ह्याला निधीचा पुरवठा करणार याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा महायुतीचा अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत. अजित पवार हे येत्या १० मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात अर्थसंकल्प सादर करणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींना दर महिना 2100 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत निर्णय होणार असल्यामुळे सर्व लाडक्या बहीणींचे लक्ष हे अधिवेशनाकडे लागले आहे. निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लाडक्या बहिणींन दर महा 2100 रुपये देण्याचा निर्णय अर्थसंकल्पामध्ये घेतला जाणार आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सत्ताधारी नेत्यांसह विरोधी नेते हे विधीमंडळाच्या आवारामध्ये दाखल झाले आहेत.  यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडून सर्व क्षेत्राच्या मोठ्या अपेक्षा लागल्या आहेत. यासाठी मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधीमंडळामध्ये दाखल झाले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने कोणत्या घोषणा करणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. महायुतीच्या सर्व नेत्यांनी आणि मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन अधिवेशनला सुरुवात केली आहे. यावेळी राज्यातील प्रमुख नेत्यांसह मंत्री देखील उपस्थित होते. शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करुन विधीमंडळाचे कामकाज सुरु झाले आहे.

विरोधकांची बैठक पार

विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते शिवसेनेचे अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी विरोधकांची बैठक झाली. बैठकीला शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) विधिमंडळ नेते आदित्य ठाकरे, गटनेते भास्कर जाधव, प्रतोद सुनील प्रभू, काँग्रेसचे भाई जगताप, आमदार श्रीकृष्णकुमार नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) विधानसभा गटनेते जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना नऊ पानी पत्र लिहिले असून त्यामध्ये सरकारच्या १०० दिवसांतील कामगिरीचे वाभाडे काढले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील अनेक कामांना स्थगिती देऊन महायुतीचे मंत्री बेकायदेशीर काम करत होते, हे सरकारने मान्य केल्याचा दावा या पत्रात केला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

जितेंद्र आव्हाडांचा बेड्या घालून विधीमंडळात प्रवेश

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शरद पवार यांच्या आमदाराच्या हातात बेड्या घालून विधीमंडळामध्ये प्रवेश केला आहे.  महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे बेड्या घालून विधिमंडळात आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर सरकारने घाला घातला आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. अमेरिकेत भारतात जे हाल होत आहेत, त्यांच्यावर अत्याचार होत आहे, त्याचे प्रतिक म्हणून बेड्या घातल्या असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra budget session 2025 live updates in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2025 | 11:36 AM

Topics:  

  • Budget 2025
  • DCM Devedra Fadnavis
  • maharashtra news
  • Mahayuti Governmet

संबंधित बातम्या

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं
1

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

Maharashtra Rain Update: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली
2

Maharashtra Rain Update: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…
3

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

परभणीच्या येलदरी धरणासाठी पाऊस ठरला फायद्याचा; धरणात तब्बल 95 टक्के जलसाठा
4

परभणीच्या येलदरी धरणासाठी पाऊस ठरला फायद्याचा; धरणात तब्बल 95 टक्के जलसाठा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.