मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे (फोटो - सोशल मीडिया)
जालना : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. डिसेंबर महिन्यामध्ये बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्याचे वातावरण तापले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. कृष्णा आंधळे हा फरार असून त्याला अटक करण्याची मागणी होत आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये वाल्मिक कराड हाच मास्टरमाईंड असल्याचे सांगितले गेले आहे. त्याचबरोबर वाल्मिक कराड व मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये संबंध असल्याचा दावा करत राजीनामा मागितला जात आहे. या प्रकरणावर आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले जरांगे पाटील?
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बीड हत्या प्रकरणावरुन महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराडचे नाव आरोपी म्हणून घेण्यात आले असले तरी देखील धनंजय मुंडे यांचे घेतलेले नाही. यावरुन जरांगे पाटील यांनी रोष व्यक्त केला आहे. जरांगे पाटील म्हणाले की, “संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये खोटा अजेंठा राबवल्यामुळे धनंजय मुंडे यांना या प्रकरणात सह आरोपी केलं नाही, यात मुंडेना शिक्षा झाली असती मात्र राजकिय मित्राला वाचवलं. सोईकररित्या हे प्रकरण संपविले. राजकीय लोकांची राजकीय मैत्री जागी झाली आणि ही मैत्री जागी झाली की सर्वसामान्य जनतेला अन्याय सहन करावा लागतो. बडा नेता कोण हे न्यायालयाच्या पटलावर हा विषय आला की बड्या नेत्याला फोन केला मात्र सरकारने नेता वाचविला. या नेत्याचा हात शंभर टक्के आहे. नेत्याने गुंड मित्र वाचवला,” अशी टीका मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये लवकर आरोपपत्र दाखल होणार नाही असा आरोप देशमुख कुटुंबियांकडून केला जात होता. यामध्ये उशीर केला जाईल तसेच अनेकांना वाचवले जाईल पुरवणी आरोप पत्रात सहआरोपी होतीलच अशी शंका असल्याने या प्रकरणात धनंजय मुंडेना क्लीनचिट देण्यात आली, असा अंदाज धनंजय देशमुख यांनी केला होता. मात्र उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्यानंतर लगेगच आरोपपत्र दाखल करण्यात आले. यावरुन पुढे जरांगे पाटील यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “संतोष देशमुख प्रकरणाचे चार्जशीट अजून दोन महिने दाखल होणार नाही अशी अपेक्षा होती. त्या चार्जशीटमध्ये फोडाफोडी होणार नाही यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती मागणी करण्यात आली होती. मात्र त्यांच्या नियुक्तीच्या दुसर्या दिवशीच चार्जशीट दाखल करण्यात आली. धनंजय मुंडे सहआरोपी होणार होते. मात्र मुंडे या प्रकरणात वाचले. त्यांना वाचवण्यात आले,” असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे जरांगे पाटील म्हणाले की, “छुपा राजकीय अजेंडा चालवून गुंड आणि राजकीय मित्र वाचवला. मात्र तुमच्या पक्षाचा प्रमाणिक सरपंचाला न्याय देऊ शकला नाही. सरकारच्या प्रतिनिधींनी पद्धतशीरपणाने त्यांचे राजकीय गुंड मित्रासह टोळीही वाचवली. मात्र पुढील तपासात काही सहआरोपी होतात पाहू. मात्र न झाल्यास पुढील काळात त्रास देणार्या टोळीविरोधात आमची मोहिम असेल,” असा आक्रमक पवित्रा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे.