Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cabinet Decision: मंत्रिमंडळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! अपघात योजनेला मुदतवाढ, महिला शेतकरी, भूमिहीन मजुरांना दिलासा

Cabinet Decision: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेस तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असून, मुंबईतील शासकीय कार्यालयांच्या वीज बिलांसाठी बेस्टच्या संयुक्त बिलिंग प्रणालीला मंजुरी देण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 04, 2026 | 03:37 PM
मंत्रिमंडळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! अपघात योजनेला मुदतवाढ, महिला शेतकरी, भूमिहीन मजुरांना दिलासा

मंत्रिमंडळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! अपघात योजनेला मुदतवाढ, महिला शेतकरी, भूमिहीन मजुरांना दिलासा

Follow Us
Follow Us:
  • महिला शेतकरी, भूमिहीन मजुरांना दिलासा
  • मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय
  • राज्यात नवीन न्यायालये आणि माहिती आयुक्त पदांना मंजुरी
 

Maharashtra Cabinet Decisions: महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित तसेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये शेतकरी कल्याण, ऊर्जा, न्यायव्यवस्था आणि प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हे निर्णय महत्त्वाचे मानले जात आहेत.

शेतकरी अपघात सुरक्षा योजनेस तीन वर्षांची मुदतवाढ

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेस आणखी तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला शेतकरी सक्षमीकरण कायद्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

मुंबईतील शासकीय कार्यालयांची वीज बिले BEST मार्फत

मुंबई शहरातील सर्व शासकीय कार्यालये आणि मुंबई महानगरपालिकांची वीज देयके बेस्टच्या संयुक्त बिलिंग (Composite Billing) प्रणालीद्वारे केंद्रीकृत पद्धतीने अदा करण्यास मंत्रिमंडळाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे वीज बिल व्यवस्थापन अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे.

School Inspection: शिक्षकांची रिक्त पदे आणि दर्जाहीन शिक्षणाचा पर्दाफाश होणार? बाल हक्क आयोगाच्या धाडीमुळे प्रशासनात खळबळ!

राज्य माहिती आयोगात तीन नवीन पदे

महाराष्ट्र राज्य माहिती आयोगात राज्य माहिती आयुक्तांची आणखी तीन नवीन पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली. या पदांसाठी आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदनिर्मितीही करण्यात येणार आहे.

राज्यात नवीन न्यायालयांना मंजुरी

न्यायव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणी नवीन न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच सरकारी वकील कार्यालय सुरू करण्यात येणार असून, आवश्यक न्यायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदांना मंजुरी देण्यात आली आहे.

चांदवड (जि. नाशिक) येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास आणि त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती व आर्थिक तरतुदीस मंजुरी देण्यात आली.

किनवट (जि. नांदेड) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, सरकारी वकील कार्यालय आणि वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

केज (जि. बीड) येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास आवश्यक पदनिर्मिती व खर्चास मंजुरी देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) येथे विशेष मोटार वाहन न्यायालय स्थापन करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिला आहे.

या निर्णयांमुळे शेतकरी, महिला, भूमिहीन मजूर, नागरिक आणि न्यायव्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असून राज्यातील प्रशासन अधिक कार्यक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आल्याचे मानले जात आहे.

Mumbai Police Salary Scam: पोलीस दलातील ६.५ कोटींच्या वेतन घोटाळ्यात ५ जणांवर गुन्हा; मंत्रालयातील अधिकारी रडारवर

Web Title: Maharashtra cabinet decisions farmer accident scheme best billing new courts information commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Farmers
  • gopinath munde

संबंधित बातम्या

धाराशिव जिल्ह्यात तीव्र दुष्काळ; तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा सुरु; राणाजगजितसिंह पाटलांची माहिती
1

धाराशिव जिल्ह्यात तीव्र दुष्काळ; तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा सुरु; राणाजगजितसिंह पाटलांची माहिती

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित
2

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित

साखर आयुक्तालयाचा सहकारी साखर कारखान्यांना दणका; केवळ ऊस पुरवठ्यावर सभासदत्व देता येणार नाही
3

साखर आयुक्तालयाचा सहकारी साखर कारखान्यांना दणका; केवळ ऊस पुरवठ्यावर सभासदत्व देता येणार नाही

Nashik Farmers: बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब
4

Nashik Farmers: बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.