पुण्यात थंडीचा कडाका (फोटो- ai gemini)
दोन दिवसांत किमान आणि कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता
शहर आणि परिसरातील किमान तापमानात सातत्याने घट
पहाटे आणि रात्री पुणेकरांना भरतेय हुडहुडी
Pune Weather: स्वच्छ आकाश आणि उत्तरेकडून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे पुणे शहराच्या तापमानात मोठी घट झाली आहे. शुक्रवारी (ता. २०) शहरात ११.३ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचे हे नीचांकी तापमान ठरले आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्री पुणेकरांना हुडहुडी भरत असून, दिवसा उन्हाचा चटका जाणवत असला तरी हवेत गारवा कायम आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरातील किमान तापमानात सातत्याने घट होत आहे. गुरुवारी १४ अंश सेल्सिअस असलेले किमान तापमान शुक्रवारी ११.३ अंशांपर्यंत खाली आले. म्हणजेच एका दिवसात तापमानात सुमारे तीन अंशांची घट झाली आहे. पुणे शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांतही थंडीचा प्रभाव वाढला आहे.
Pune Weather: हुडहुडी भरणार! कारण पुण्यात गारठा वाढणार; स्वेटर घालूनच फिरा; पुढील काही दिवसांत…
या तापमान घसरणीमागील कारण स्पष्ट करताना भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी सांगितले की, सध्या आकाश मुख्यतः निरभ्र असल्याने रात्रीच्या वेळी जमिनीतून उष्णता वेगाने बाहेर पडते. या प्रक्रियेला ‘रेडिएशन कूलिंग’ असे म्हणतात. त्यामुळे जमिनीचे तापमान लवकर कमी होते. त्याचबरोबर उत्तरेकडून महाराष्ट्राच्या दिशेने थंड आणि कोरडे वारे वाहत असल्याने राज्यातील अनेक भागांच्या तापमानात घट झाली आहे. या दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम पुण्याच्या तापमानावर झाला आहे.
दरम्यान, पुढील दोन दिवसांत किमान आणि कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. शनिवारी (ता. २१) कमाल तापमान ३२, तर किमान तापमान १२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून, पुढील दोन दिवस तापमानात फारसा बदल अपेक्षित नाही.
Wardha News : वर्धेकरांनो, स्वेटर बाहेर काढा! दिवाळीनंतर थंडीचा जोर वाढला! तापमानाचा पारा घसरला
पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी बोचऱ्या वाऱ्यांमुळे गारठ्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. शहरात किमान तापमान १३.५ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दरम्यान, उपनगरांमध्येही तापमानात घट झाली असून, एनडीए परिसरात यंदाच्या हंगामातील नीचांकी ११.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
Ans: शुक्रवारी (२० नोव्हेंबर) पुणे शहरात ११.३ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.
Ans: स्वच्छ आकाश आणि उत्तरेकडून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणारे थंड व कोरडे वारे यामुळे पुण्यातील तापमानात घट झाली आहे.






