Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-कॅब चालकांसाठी मोठी बातमी! मराठीचे ज्ञान बंधनकारक अन्यथा…; नियमभंग केल्यास परवाना होणार निलंबित

Marathi Language: महाराष्ट्रात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅब चालकांसाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. Maharashtra Motor Vehicles (Amendment) Rules, 2026 अंतर्गत महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये सुधारणा करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 12, 2026 | 11:32 AM
रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-कॅब चालकांसाठी मोठी बातमी! मराठीचे ज्ञान बंधनकारक अन्यथा...; नियमभंग केल्यास परवाना होणार निलंबित

रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-कॅब चालकांसाठी मोठी बातमी! मराठीचे ज्ञान बंधनकारक अन्यथा...; नियमभंग केल्यास परवाना होणार निलंबित

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यवहारिक मराठी अनिवार्य
  • नियमभंग केल्यास परवाना निलंबित होणार
  • प्रवाशांशी संवादासाठी चालकांना मराठीचे ज्ञान बंधनकारक
  • महाराष्ट्र मोटार वाहन नियमांत मोठी सुधारणा
मुंबई : महाराष्ट्रात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक प्रवासी वाहनांच्या चालकांना प्रवाशांशी प्रभावीपणे संवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांद्वारे ही अट अधिक स्पष्ट करण्यात आली असून, मराठीचे आवश्यक ज्ञान नसलेल्या चालकाच्या वाहन चालविण्याच्या परवान्यावरील संबंधित अधिकृतता निलंबित अथवा रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

शासनाच्या अधिसूचनेनुसार Maharashtra Motor Vehicles (Amendment) Rules, 2026 अंतर्गत महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये विविध महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या सुधारणांमध्ये रिक्षा, टॅक्सी तसेच इलेक्ट्रॉनिक मीटर बसविलेल्या ॲप-आधारित मोटार कॅब आणि त्यांच्या परवाना व अधिकृततेशी संबंधित चालक तसेच परमिटधारकांसाठी व्यवहारिक मराठीच्या ज्ञानाची अट स्पष्ट करण्यात आली आहे.

‘ST’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नियम ४ मध्ये ‘मराठी भाषेचे कार्यकारी ज्ञान’ अनिवार्य

महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ४ च्या उपनियम (४) मध्ये ‘antecedents’ या शब्दांनंतर “and working knowledge of Marathi language” हे शब्द समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित अधिकृततेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे आवश्यक पात्रतेसोबत मराठी भाषेचे कार्यकारी अर्थात व्यवहारिक ज्ञान असणे आवश्यक राहणार आहे.

इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या मोटार कॅबच्या चालकांसाठी स्वतंत्र तरतूद

नियम २२ मध्ये बदल करून ॲप आधारित इलेक्ट्रॉनिक मीटर बसविलेल्या मोटार कॅबच्या अधिकृत चालकांसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. नव्या नियम २२(३ए) नुसार, अशा मोटार कॅबच्या अधिकृत चालकाला मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान असणे बंधनकारक राहणार आहे.

अधिकृत चालकाकडे आवश्यक मराठी भाषेचे ज्ञान नसल्याचे आढळून आल्यास, नियमांचे पालन न केल्याबद्दल परवाना प्राधिकरणाला लेखी कारणे नोंदवून संबंधित चालकाविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
यानुसार (अ) चालकाच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरील संबंधित अधिकृतता जास्तीत जास्त तीन महिन्यांपर्यंत निलंबित करता येईल.
(ब) त्यानंतरही संबंधित चालकाकडून नियमांचे सातत्याने पालन होत नसल्यास, चालकाच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरील संबंधित अधिकृतता रद्द करता येईल.

नियम ७८ : परमिटधारकासाठीही मराठीची अट

सुधारित नियमांमध्ये ही अट केवळ चालकांपुरती मर्यादित ठेवण्यात आलेली नाही. महाराष्ट्र मोटार वाहन नियमांच्या नियम ७८ मधील उपनियम (२) मधील खंड (c) नंतर खंड (d) समाविष्ट करण्यात आला आहे. या नव्या तरतुदीनुसार, संबंधित परमिटधारकाकडे मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान असणे आवश्यक राहणार आहे.

नियम ८५ : परमिट नूतनीकरणासाठीही व्यवहारिक मराठी आवश्यक

सुधारित नियमांमधील आणखी एक महत्त्वाची तरतूद नियम ८५ मध्ये करण्यात आली आहे. नियम ८५ च्या उपनियम (१) मध्ये करण्यात आलेल्या नव्या तरतुदीनुसार, ॲप आधारित इलेक्ट्रॉनिक मीटर बसविलेल्या मोटार कॅबच्या परमिटचे नूतनीकरण करताना परमिटधारकाकडे मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान असणे आवश्यक राहणार आहे. हे ज्ञान संबंधित प्राधिकरणाच्या समाधानकारक पातळीचे असणे आवश्यक असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

‘महाराष्ट्र मोटार वाहन कायदा-२०२६’ नव्हे; सुधारित मोटार वाहन नियम

या सुधारणांना “महाराष्ट्र मोटार वाहन कायदा-२०२६” असे संबोधणे अचूक नाही. अधिसूचनेत त्यांचा उल्लेख “Maharashtra Motor Vehicles (Amendment) Rules, 2026”, अर्थात “महाराष्ट्र मोटार वाहन (सुधारणा) नियम, २०२६” असा करण्यात आला आहे. हे बदल मोटार वाहन अधिनियम, १९८८ अंतर्गत महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील काही तरतुदी अधिक स्पष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार हे बदल करण्यात आले आहेत.

यापूर्वीच्या नियमांमधील संदिग्धता किंवा त्रुटींचा आधार घेत काही अमराठी चालकांकडून मराठी भाषेच्या ज्ञानाबाबत टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या विषयाच्या कायदेशीर पैलूंवर यापूर्वी न्यायालयीन स्तरावरही चर्चा झाली होती. त्यामुळे सुधारित नियमांमुळे मराठी भाषेच्या व्यवहारिक ज्ञानाची अट अधिक स्पष्टपणे लागू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

आषाढीसाठी एसटीची मेगा तयारी, ५,५०० विशेष बस धावणार; ४० भाविक जमवा, गावातून थेट पंढरपूर गाठा; मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

“या सुधारणांमुळे नियमांमधील संदिग्धता दूर होऊन प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांसाठी व्यवहारिक मराठीचे महत्त्व अधिक स्पष्ट झाले आहे. प्रवाशांशी संवाद साधणे, त्यांचे म्हणणे समजून घेणे आणि सुरक्षित व सुलभ प्रवास सुनिश्चित करणे यासाठी स्थानिक भाषेचे व्यवहारिक ज्ञान आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात या नियमांची अधिक परिणामकारकपणे अंमलबजावणी करणे शक्य होईल,” असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra commercial passenger vehicle drivers marathi language knowledge mandatory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • maharashtra
  • Marathi Language
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.