Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी; सक्तीच्या धर्मांतरावर 7 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्याने त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. आता राज्य सरकारच्या अधिसूचनेनंतर हा कायदा लागू होणार असून सक्तीच्या धर्मांतराविरोधात कठोर शिक्षेच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.

  • By विवेक
Updated On: Aug 02, 2026 | 07:05 PM
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला दिली मंजुरी
  • स्वेच्छेच्या धर्मांतरासाठी 60 दिवस आधी सक्षम प्राधिकरणाकडे अर्ज आवश्यक
  • सक्तीचे किंवा फसवणुकीने धर्मांतर केल्यास 7 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद
 

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिल्यानंतर या विधेयकाचे आता अधिकृतपणे कायद्यात रूपांतर झाले आहे. राज्य सरकारकडून अधिसूचना जारी झाल्यानंतर हा कायदा राज्यभर लागू होणार असून, सक्तीचे, फसवणुकीने किंवा आमिष दाखवून केले जाणारे धर्मांतर रोखण्यासाठी कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत.

माहितीनुसार, राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी हे विधेयक राज्य सरकारकडे अधिसूचना जारी करण्यासाठी पाठवले आहे. आता हा कायदा नेमक्या कोणत्या तारखेपासून लागू होईल, याबाबत अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार आहे.

हे विधेयक मार्च 2026 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर विधान परिषदेतही ते संमत झाले. दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर विधेयक राज्यपाल आणि त्यानंतर राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. राष्ट्रपतींची संमती मिळाल्याने कायदा अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

पंढरपूर वारीतून एसटी महामंडळाला तब्बल ‘इतक्या’ कोटींचे उत्पन्न; प्रताप सरनाईक यांनी दिली सविस्तर माहिती

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 चा मुख्य उद्देश बळजबरी, धमकी, फसवणूक, दिशाभूल, आर्थिक किंवा इतर आमिष तसेच लग्नाचे खोटे आश्वासन देऊन करण्यात येणाऱ्या धर्मांतराला आळा घालणे हा आहे. या प्रकारच्या धर्मांतराला दखलपात्र गुन्हा मानण्यात आले असून संबंधितांवर कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.

स्वेच्छेने धर्मांतर करायचे असल्यास…

कायद्यानुसार, एखाद्या व्यक्तीला स्वेच्छेने धर्मांतर करायचे असल्यास त्यासाठी 60 दिवस आधी सक्षम प्राधिकरणाकडे अर्ज करणे बंधनकारक असेल. तसेच धर्मांतर पूर्ण झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

याशिवाय, धर्मांतर स्वेच्छेने झाले असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्ती किंवा धर्मांतर करणारी संस्था यांच्यावर राहणार आहे. एखाद्या व्यक्तीचे धर्मांतर दबाव, फसवणूक किंवा आमिषामुळे झाले असल्याची शंका असल्यास आई-वडील, भाऊ-बहिण किंवा इतर जवळचे नातेवाईक तक्रार दाखल करू शकणार आहेत.

Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी संमतीची पुन्हा मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत असणार अंतिम संधी

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा काय ?

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना सात वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. पुनरावृत्ती झाल्यास ही शिक्षा दहा वर्षांपर्यंत वाढू शकते. तसेच, कायद्यात आंतरधर्मीय विवाहातून जन्मलेल्या अपत्याच्या धर्मासंदर्भातही स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून अधिसूचना जाहीर झाल्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी सुरू होईल. त्यामुळे राज्यातील धर्मांतराशी संबंधित प्रक्रिया आणि कायदेशीर नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार असल्याचे मानले जात आहे.

Web Title: Maharashtra dharma swatantrya act president approval forced conversion law

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 07:05 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • maharashtra
  • Maharashtra Government
  • President draupadi murmu

संबंधित बातम्या

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
1

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

महिला शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबारा नावावर नसला तरी मिळणार ‘शेतकरी’ प्रमाणपत्र; कृषिमंत्री भरणेंची घोषणा
2

महिला शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबारा नावावर नसला तरी मिळणार ‘शेतकरी’ प्रमाणपत्र; कृषिमंत्री भरणेंची घोषणा

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
3

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत
4

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.