Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वरोऱ्यात दिवसाढवळ्या मारहाणीची घटना! ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सुपरवायझरवर पाच जणांचा हल्ला

वरोरा तालुक्यातील एकोना माईन्स परिसरात कोळसा वाहतुकीच्या वादातून एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सुपरवायझरवर पाच अज्ञात व्यक्तींनी लोखंडी रॉड व दांड्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 03, 2026 | 03:01 PM
वरोऱ्यात दिवसाढवळ्या मारहाणीची घटना! ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सुपरवायझरवर पाच जणांचा हल्ला

वरोऱ्यात दिवसाढवळ्या मारहाणीची घटना! ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सुपरवायझरवर पाच जणांचा हल्ला

Follow Us
Follow Us:
  • सुपरवायझरला पाच अज्ञात व्यक्तींकडून मारहाण
  • हल्ल्यात मंगेश चव्हाण गंभीर जखमी
  • पाच अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
चंद्रपूर : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. वरोरा तालुक्यातील एकोना माईन्स परिसरात कोळसा वाहतुकीच्या वादातून एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सुपरवायझरवर पाच अज्ञात व्यक्तींनी लोखंडी रॉड व दांड्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली आहे.

 

या हल्ल्यात मंगेश दिलीप चव्हाण (वय २७, रा. स्नेहल नगर, अभ्यंकर वार्ड, चंद्रपूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी वरोरा पोलिसांनी पाच अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश चव्हाण हे रविवारी दुपारी माईन्स परिसरातील स्टॉकवरील एका झाडाखाली झोपले असताना कार तेथे आली. कारमधून उतरलेल्या पाच जणांनी त्यांना शिवीगाळ करीत लोखंडी रॉड व दांड्यांनी हात, पाय, छाती आणि पाठीवर मारहाण केली. हल्लेखोरांपैकी दोघांनी तोंडाला कापड बांधले होते. कोळसा वाहतुकीच्या कामावरून ट्रान्सपोर्ट कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमी चव्हाण यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अजिंक्य पवार करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : वरणगाव हादरलं! उड्डाणपुलाखाली तरुणाला गाठून गोळ्या झाडल्या; तरुणीला भेटायला आला अन्…

संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

हातउसने दिलेले ९४ हजार रुपये परत देण्याच्या बहाण्याने बोलावून तिघांनी गॅरेज चालकाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना १ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री चिकलठाणा रोडवरिल पुष्पा गार्डन समोर घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. सोहेल सलमान खान (वय ३२, रा. कटकट गेट), साजिद शेख (३०, रा. मोतीवाला कॉलनी, चिकलठाणा), सुलतान शेख (वय ४०, रा. जिन्सी) अशी मारहाण करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरेफ खुर्सी मंसुरी (वय २८, रा. केंब्रीजचौक) यांनी फिर्याद दिली आहे.

हे सुद्धा वाचा : छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार! कुटुंबावर गोळीबार अन् तलवारीने हल्ला; नेमकं काय घडलं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यातील एकोना माईन्स परिसरात काय घटना घडली?

    Ans: एकोना माईन्स परिसरात कोळसा वाहतुकीच्या वादातून एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सुपरवायझरला पाच अज्ञात व्यक्तींनी लोखंडी रॉड आणि दांड्यांनी बेदम मारहाण केली.

  • Que: या हल्ल्यात कोण जखमी झाले आणि त्यांची प्रकृती कशी आहे?

    Ans: या हल्ल्यात मंगेश दिलीप चव्हाण (वय २७, रा. चंद्रपूर) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • Que: या प्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

    Ans: वरोरा पोलिसांनी पाच अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य पवार करीत आहेत.

Web Title: An incident involving the assault of a young man has taken place in warora taluka nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Beed Suicide Case: पतीचे अनैतिक संबंध आणि रोजच्या मारहाणीला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; ॲसिड प्राशन करून संपवले आयुष्य!
1

Beed Suicide Case: पतीचे अनैतिक संबंध आणि रोजच्या मारहाणीला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; ॲसिड प्राशन करून संपवले आयुष्य!

वरणगाव हादरलं! उड्डाणपुलाखाली तरुणाला गाठून गोळ्या झाडल्या; तरुणीला भेटायला आला अन्…
2

वरणगाव हादरलं! उड्डाणपुलाखाली तरुणाला गाठून गोळ्या झाडल्या; तरुणीला भेटायला आला अन्…

IPS Officers Transfer: महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल! १६ वरिष्ठ IPS-RPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; ३ अधिकाऱ्यांना मुदतवाढ
3

IPS Officers Transfer: महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल! १६ वरिष्ठ IPS-RPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; ३ अधिकाऱ्यांना मुदतवाढ

हातउसने दिलेले पैसे मागणे पडले महागात, गॅरेज चालकावर जीवघेणा हल्ला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
4

हातउसने दिलेले पैसे मागणे पडले महागात, गॅरेज चालकावर जीवघेणा हल्ला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.