Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim: केंद्रीय पथकाकडून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; वाशिम जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा

Washim drought Central government inspection: केंद्र सरकारच्या आंतर मंत्रालयीन पथकाने शुक्रवारी वाशिम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून पिकांचे नुकसान आणि दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 10, 2026 | 06:37 PM
Washim drought

Washim drought

Follow Us
Follow Us:
  • केंद्राचे ११ सदस्यीय पथक वाशिममध्ये दाखल
  • नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी
  • शेतकऱ्यांच्या समस्या घेतल्या जाणून
वाशिम: केंद्र सरकारच्या आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथकाने शुक्रवारी वाशिम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीचा बैठकीद्वारे आढावा घेतला. त्यानंतर पथकाने वाशिम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. केंद्रीय पथकात वरिष्ठ अधिकारी अर्जेशकुमार मधोक, महेश कुमार, सीमा रानी, संजय मीना आणि अभय भारत यांचा सहभाग आहे. पथकातील सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.

Buldhana News: १० दिवसांत जलसाठा ३ % घटला, बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता

वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना, अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे, अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना, वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान आणि कृषी सहसंचालक गणेश घोरपडे आदी उपस्थित होते. केंद्र शासनातर्फे राज्यातील दुष्काळ पाहणीसाठी ११ सदस्यांचे पथक नियुक्त करण्यात आले असून, त्यात कृषी, जलसंपदा, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, अन्न व सार्वजनिक वितरण, पशुसंवर्धन, अर्थ विभाग, नीती आयोग यांसह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या बैठकीत अमरावती विभागातील जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीबाबत सादरीकरण करण्यात आले.

पीक नुकसान, पाणी उपलब्धता व टैंकर्सची संभाव्य गरज, शेतीवर अवलंबून असलेले शेतमजूर व जमीनधारकांचे प्रश्न, मजुरांची स्थलांतराची शक्यता या बाबींकडे जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रीय पथकाचे लक्ष वेधले. यावेळी बैठकीदरम्यान कृषी – सहसंचालक घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा यांनी संचालन केले, दुपारी १ वाजता दौऱ्याच्या पुढील टप्प्यात पथकाने मानोरा तालुक्यातील कुपटा येथे मोहम्मद सादिक मोहम्मद शफी यांच्या तसेच कारंजा तालुक्यातील काळीकारंजा येथे त्र्यंबक फकिरा गुल्हाने व पानविहीर येथे रमेश भाऊराव थेर यांच्या शेताला भेट देऊन पीक नुकसानाची प्रत्यक्ष पाहणीसह शेतकऱ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.

जिल्ह्यातील विविध गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी

बैठकीनंतर केंद्रीय पथकाने जिल्ह्यात विविध गावांना भेटी देऊन दुष्काळी परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि पाणीटंचाईची प्रत्यक्ष पाहणी केली. पथकाकडून दुष्काळग्रस्त भागातील पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि प्रत्यक्ष परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन होणार आहे. त्यानुसार दुष्काळाची वस्तुस्थिती, शेतीपिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि आवश्यक उपाययोजनांची माहिती केंद्र सरकारसमोर मांडली जाणार आहे. केंद्रीय पथकाने वाशिम जिल्हा दौऱ्यात विविध गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली व शेतक-यांशी संवाद साधून त्यांची व्यथा जाणून घेतली. वाशीम तालुक्यातील सुपखेला येथे दयाराम विठ्ठल राऊत यांच्या शेतीला भेट देऊन नुकसान पाहणी करण्यात आली. त्यानंतर मंगरूळपीर तालुक्यातील स्वासिन येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाची पाहणी करून परिसरातील पाणीटंचाईचा आढावा पथकाने घेतला.

Buldhana: सोयाबीन काढणीला वेग; मध्य प्रदेशातून हजारो मजूर दाखल, स्थानिक मजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न

Web Title: Washim drought assessment central team crop damage inspection pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 06:37 PM

Topics:  

  • drought news
  • Washim
  • Washim news

संबंधित बातम्या

Drought News : शेतात जाऊन केंद्रीय पथकाने पाहिली पिकांची अवस्था; शेतकऱ्यांनी मांडल्या अडचणी, शेतकऱ्यांना काय मदत मिळणार?
1

Drought News : शेतात जाऊन केंद्रीय पथकाने पाहिली पिकांची अवस्था; शेतकऱ्यांनी मांडल्या अडचणी, शेतकऱ्यांना काय मदत मिळणार?

Hungary News : हंगेरीमध्ये १२६ वर्षांतील सर्वाधिक तीव्र दुष्काळ; शेती, पाणीपुरवठा आणि ऊर्जा क्षेत्रावर संकट
2

Hungary News : हंगेरीमध्ये १२६ वर्षांतील सर्वाधिक तीव्र दुष्काळ; शेती, पाणीपुरवठा आणि ऊर्जा क्षेत्रावर संकट

Washim: आठवड्यात दोनवेळा पाणीपुरवठा करा, तंटामुक्त समिती अध्यक्षांचे ग्रामपंचायतला निवेदन
3

Washim: आठवड्यात दोनवेळा पाणीपुरवठा करा, तंटामुक्त समिती अध्यक्षांचे ग्रामपंचायतला निवेदन

वाशिममधील २९१ ‘शून्य निपुण’ शाळांवर विशेष लक्ष; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश, प्रभावी उपाययोजनांसाठी जिल्हा सुकाणू समितीची सभा
4

वाशिममधील २९१ ‘शून्य निपुण’ शाळांवर विशेष लक्ष; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश, प्रभावी उपाययोजनांसाठी जिल्हा सुकाणू समितीची सभा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.