
PHOTO GENERATE AI
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयांवर देखील मोर्चा काढण्यात आला. ऑगस्टनंतर पाऊस न झाल्याने सोयाबीन, भात, कापूस व तूर जळाली आहे. शासनाने 305 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करून फक्त पाच हजारांची मदत जाहिर केली.पण यावर ठोस उपाययोजना केलेली नाही.
प्रशासनाने पंचनाम्यांऐवजी सरसकट सर्व शेतकऱ्यांना आणि 2020 पूर्वीच्या वनहक्क दावेदारांना प्रत्येक हेक्टर नुसार 25 हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी. भूमिहीन शेतमजूर व कष्टकऱ्यांना पुढील वर्षभर दरमहा पाच हजार रुपये जीवन अनुदान द्यावे.अशी प्रमुख मागणी केली आहे. या मोर्चात हजारो शेतकरी व कष्टकरी सहभागी झाले होते.
सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आज धुळ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडक मोर्चा काढण्यात आला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत द्या, भूमिहीन मजूर आणि कष्टकरी कुटुंबांना दरमहा 5 हजार रुपये आणि रेशन द्या. या मागण्या यावेळी करण्यात आल्या आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली असताना शेतकऱ्याला फक्त 5 हजार रुपयाची मदत करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम या सरकारने केले असल्याचा गंभीर आरोप मोर्च्या दरम्यान आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला.
महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यानंतर पाऊस न झाल्यामुळे सोयाबीन, कापूस, भात आणि तूर यांसारखी पिके पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत कमी असल्याचा आरोप करत, प्रशासनाने वेळकाढू पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट आणि ठोस आर्थिक मदत करावी. अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली.
आंदोलनाचे नेतृत्व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे किशोर ढमाले करत असून, ग्रामीण भागातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या विविध न्याय हक्कांचे प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर मांडण्यात आले.
Ans: दुष्काळी परिस्थिती, पिकांचे नुकसान, अपुरी आर्थिक मदत, आदिवासी वनहक्क कायद्याची अंमलबजावणी आणि एसआयआर प्रक्रियेच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला.
Ans: प्रतिहेक्टरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी.
Ans: धुळे आणि नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयांसह साक्री, नवापूर, कन्नड आणि सटाणा येथील तहसील कार्यालयांवर.