
Satara Jawali drought
जावळी तालुक्यात यंदा पावसाने दीर्घ खंड दिल्यामुळे भात, सोयाबीन आणि भुईमूग पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक भागांतील नाले, ओढे आणि लहान जलस्रोत आटण्याच्या स्थितीत आले असून शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे ठाकले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत तालुक्याला Trigger-1 मधून वगळणे हे वास्तवाला धरून नसल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
जावळीतील प्रत्यक्ष परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून प्रशासनाने तातडीने फेरपाहणी करावी. पिकांची वस्तुनिष्ठ तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
शासनाने केवळ कागदोपत्री आकडेवारीवर अवलंबून न राहता शेतशिवारात जाऊन प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. जावळीचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी शासनात महत्त्वाच्या पदांवर असतानाही तालुक्याच्या प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत व्यक्त करताना पवार म्हणाले, स्थानिक समस्या, पिकांची बिकट अवस्था आणि जलस्रोतांची स्थिती याबाबतचा वास्तव अहवाल शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचणे आवश्यक आहे. जावलीतील शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून Trigger-1 अंतर्गत जावलीचा समावेश करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. शासनाच्या सवलती आणि मदतीपासून जावलीतील शेतकरी वंचित राहू नयेत, अशी मागणी संदीप पवार यांनी केली.
Pune Rain Alert: काळ्या ढगांची दाटी अन् पुण्यात अक्षरश: ‘कोसळ’धार; उद्याचा अलर्ट काय?