Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Voter List: मतदार यादीबाबत मोठी अपडेट! SIRची मुदत संपली, मात्र २ कोटी मतदारांचे गणना अर्ज जमा नाहीत; निवडणूक आयोगाची आकडेवारी

Voter List: राज्यातील मतदार यादीच्या प्रक्रियेदरम्यान सुमारे २ कोटी ७ लाख ३ हजार २६८ मतदारांचे गणना अर्ज अद्याप जमा किंवा संकलित झालेले नाहीत, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. या आकडेवारीमुळे मतदार यादीच्या प्रक्रियेकडे लक्ष वेधले गेले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 18, 2026 | 01:26 PM
मतदार यादीबाबत मोठी अपडेट! SIRची मुदत संपली, मात्र २ कोटी मतदारांचे गणना अर्ज जमा नाहीत; निवडणूक आयोगाची आकडेवारी

मतदार यादीबाबत मोठी अपडेट! SIRची मुदत संपली, मात्र २ कोटी मतदारांचे गणना अर्ज जमा नाहीत; निवडणूक आयोगाची आकडेवारी

Follow Us
Follow Us:
  • SIRची मुदत संपली
  • मतदार यादीबाबत मोठी अपडेट
  • राज्यात २ कोटी ७ लाख मतदारांचे गणना अर्ज अद्याप जमा नाहीत
  • निवडणूक आयोगाची आकडेवारी
 

Voter List: राज्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाची (SIR) गणना प्रक्रिया सोमवारी (17 ऑगस्ट) अंतिम टप्प्यात पोहोचली. याचसंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सकाळी १० वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदार आहेत. पैकी ७ कोटी ६९ लाख ५२ हजार २६२ मतदारांचे गणना अर्ज डिजिटाइझ झाले आहेत. ही संख्या एकूण मतदारांच्या ७८.६४ टक्के इतकी आहे. मात्र, तब्बल २ कोटी ७ लाख ९३ हजार ९१६ मतदारांचे म्हणजेच २१.२५ टक्के गणना अर्ज अद्याप जमा झाले नाहीत.

९९.८९ टक्के मतदारांचा डेटा ऑनलाइन प्रक्रियेत

डिजिटाइझ झालेले अर्ज आणि अद्याप जमा न झालेले अर्ज अशी एकत्रित आकडेवारी पाहता ९ कोटी ७७ लाख ४६ हजार १७८ मतदारांचा डेटा ऑनलाइन प्रक्रियेत समाविष्ट झाला आहे. हे प्रमाण एकूण मतदारसंख्येच्या ९९.८९ टक्के आहे. दरम्यान, गणना अर्ज जमा करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर हरकती आणि दावे दाखल करण्याची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

SIR प्रक्रियेवर रोहित पवारांचा गंभीर आरोप; मतदारांचा हक्क धोक्यात असल्याचा दावा

ठाणे, मुंबई, पुण्यात मोठ्या प्रमाणात अर्ज संकलित नाहीत

जिल्हानिहाय आकडेवारी पाहता राज्यातील काही महत्त्वाच्या शहरी भागांमध्ये अद्याप मोठ्या प्रमाणात गणना अर्ज संकलित झालेले नाहीत.

ठाणे: ३८.७७ टक्के अर्ज अद्याप संकलित नाहीत
मुंबई शहर: ३७.५७ टक्के
मुंबई उपनगर: ३४.४८ टक्के
पुणे: ३१.९२ टक्के
नागपूर: ३०.३२ टक्के
पालघर: २८.८८ टक्के

याउलट काही जिल्ह्यांमध्ये गणना अर्ज संकलनाचे प्रमाण ९० टक्क्यांच्या आसपास किंवा त्यापेक्षा अधिक आहे.

हिंगोली: ९१.१८ टक्के
बुलढाणा: ९०.८३ टक्के
लातूर: ८९.२१ टक्के

यावरून ग्रामीण भागातील काही जिल्ह्यांमध्ये अर्ज संकलनाचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचे दिसून येते.

२४ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी

SIRची गणना अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रारूप यादीवर मतदारांना दावे आणि हरकती दाखल करण्याची संधी मिळणार आहे. २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर आवश्यक पडताळणी आणि कार्यवाही पूर्ण करून २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

नाव मतदार यादीत नसेल तर काय कराल?

प्रारूप मतदार यादीत पात्र मतदाराचे नाव आढळले नाही, तर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत फॉर्म ६ भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येईल. तसेच १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनाही या कालावधीत मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्रातील मतदारनिहाय गणना अर्ज (EFs) यांच्या डिजिटायजेशन आणि ‘गणना अर्ज जमा न होणे’ची स्थिती – १७ ऑगस्ट २०२६
Maharashtra’s Status of Digitization and Uncollected of elector specific Enumeration Forms (EFs) – 17.8.2026
#SIR2026 #SIRMAHARASHTRA pic.twitter.com/2g1rZO3UQP — ChiefElectoralOffice (@CEO_Maharashtra) August 17, 2026

पत्ता किंवा फोटोमध्ये बदल असल्यास?

मतदार यादीतील नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठीही या कालावधीत अर्ज करता येणार आहे.

फॉर्म ६: मतदार यादीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी
फॉर्म ७: मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी
फॉर्म ८: पत्ता बदल, फोटो किंवा इतर तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी

त्यामुळे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक मतदाराने आपले नाव, पत्ता, फोटो आणि इतर तपशील तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पुढील महत्त्वाच्या तारखा

प्रारूप मतदार यादी- २४ ऑगस्ट २०२६
दावे व हरकती दाखल करण्याची मुदत -२४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६
१८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांसाठी अर्ज -२३ सप्टेंबरपर्यंत
अंतिम मतदार यादी -२७ ऑक्टोबर २०२६

मतदारांसाठी काय महत्त्वाचे?

मतदार यादीमध्ये आपले नाव योग्य पद्धतीने नोंदलेले आहे की नाही, याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. गणना अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यास संबंधित मतदारांनी अधिकृत निवडणूक यंत्रणेकडून आपल्या नोंदीची स्थिती तपासणे आवश्यक ठरू शकते.

एकूणच, SIRच्या गणना प्रक्रियेचा टप्पा अंतिम झाला असला तरी २ कोटी ७ लाखांहून अधिक मतदारांचे गणना अर्ज संकलित झालेले नसल्याची आकडेवारी महत्त्वाची ठरली आहे. आता २४ ऑगस्टला प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका

Web Title: Maharashtra election commission 2 crore 7 lakh voters enumeration forms not collected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • maharashtra
  • Voter List

संबंधित बातम्या

Congress Voter Campaign : १३ कोटी मतदारांच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक! भरतसिंह सोलंकींची देशव्यापी मोहिमेची घोषणा
1

Congress Voter Campaign : १३ कोटी मतदारांच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक! भरतसिंह सोलंकींची देशव्यापी मोहिमेची घोषणा

Purandar Airport : विमानतळ भूसंपादनात ‘रात्रीच्या व्यवहारां’ची चर्चा; शासकीय विश्रामगृहातील कथित मोबदला वाटपावर आरोप
2

Purandar Airport : विमानतळ भूसंपादनात ‘रात्रीच्या व्यवहारां’ची चर्चा; शासकीय विश्रामगृहातील कथित मोबदला वाटपावर आरोप

चक्क भाजप खासदाराचे नाव मतदारयादीतून गायब; समाजवादी पक्षाचा राज्य निवडणूक आयोगावर निशाणा
3

चक्क भाजप खासदाराचे नाव मतदारयादीतून गायब; समाजवादी पक्षाचा राज्य निवडणूक आयोगावर निशाणा

Housing Problems: उपोषणे झाली, आश्वासनेही मिळाली; तरी टाटा कंपनीकडून ना जमीन, ना घरे! तापकीरवाडीतील आदिवासींच्या समस्या कायम
4

Housing Problems: उपोषणे झाली, आश्वासनेही मिळाली; तरी टाटा कंपनीकडून ना जमीन, ना घरे! तापकीरवाडीतील आदिवासींच्या समस्या कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.