मुंबई : महायुतीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत राज्यभरात चर्चा सुरू आहे. राजकीय तज्ज्ञांकडूनही वेगवेगळी नावे समोर येत आहेत. तर महायुतीचे सरकार आल्यास देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचा अंदाजही अनेकजण व्यक्त करत आहेत.पण आता खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगितले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
काही दिवसांपूर्वी भाजप नेते विनोद तावडे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा सुरू झाली. त्याआधी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याचे संकेत दिले होते. पण आता त्यांनीच या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तसेच, 2019 पेक्षा 2024 मध्ये विधानसभेत महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील असा दावाही त्यांनी केला आहे.
हेही वाचा: शेकापच्या बालेकिल्ल्यात ठाकरे अन् एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी कडवी झुंज; सांगोल्यात तिरंगी लढत
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, असे भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांची भावना आहे. पण आदाडी किंवा महायुतीचे राजकारण वास्तवावर आधारित आहे. तिथे भावनेला प्रधान्य देता येत नाही. घटक पक्षांनागी सोबत घेऊन पुडे जायचे असते. त्यामुळे सर्वच इच्छा आकांशा पूर्ण होतीलच असे नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची कोणतीही शर्यत नाही आमि मी त्या शर्यतीततही नाही.
राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्रीपद कुणाला द्यायचे हे तिनही पक्षातील वरिष्ठ नेते ठरवतील, शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष एकत्र बसून मुख्यमंत्री कोण असेल यावर निर्णय घेतील. असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा: IRCTC वेबसाइट सोडा, हे ॲप्स आहेतट्रेन तिकीट बुकिंगसाठी सर्वोत्तम! सर्वात स्वस्त दरात मिळेल
दरम्यान, विधानसभा निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासून महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मुख्यमंत्री पदाचा कुणाला मिळणार, दोन्ही गटांनी आपापल्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, यावरून चर्चा सुरू झाल्या होत्या. पण निवडणूक जाहीर झाल्यापासून या चर्चांना अधिकच जोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि अमित शाह यांनीदेखील देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली आहे. याबाबत त्यांनी अनेकदा वक्तवेही केली आहेत. पण आपण या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनीच केलं आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची चर्चा आहे.