Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal News: कापसाने गाठला ९,६०० रुपयांचा भाव! कापसाचे दर वधारले, मात्र शेतकऱ्यांचे उत्पादन घटले

Yavatmal News: पावसाने पाठ फिरविल्यामुळे कपाशीच्या वाढीवर परिणाम झाला. पाण्याअभावी झाडांची वाढ खुंटली, तर बोंडे आणि पात गळून पडली. त्यामुळे बागायती कपाशीचेही उत्पादन एकरी चार ते पाच क्विंटलपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 19, 2026 | 11:35 AM
Yavatmal News: कापसाने गाठला ९,६०० रुपयांचा भाव! कापसाचे दर वधारले, मात्र शेतकऱ्यांचे उत्पादन घटले

Yavatmal News: कापसाने गाठला ९,६०० रुपयांचा भाव! कापसाचे दर वधारले, मात्र शेतकऱ्यांचे उत्पादन घटले

Follow Us
Follow Us:

Yavatmal News: पावसाच्या लहरीपणामुळे यंदा शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले असले, तरी बाजारात मात्र कापसाच्या दराने जोरदार उसळी घेतली आहे. एका बाजूला पावसाच्या अनियमिततेमुळे कपाशीची वाढ खुंटली, बोंडे आणि पात गळून पडली, तर दुसऱ्या बाजूला बाजारात पांढऱ्या सोन्याचा भाव थेट ९ हजार ६०० रुपयांवर पोहोचला आहे. चांगल्या प्रतीच्या कापसाला खाजगी व्यापाऱ्यांकडून प्रतिक्विंटल ९ हजार ६०० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे चित्र आहे. बाजारातील तेजी कायम राहिल्यास कापसाचा भाव १२ हजार रुपयांचा टप्पा गाठणार का, याकडे आता शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्याने पेरणीला विलंब झाला.(फोटो सौजन्य – istock)

Yavatmal News: जलसाठ्यांवर भरारी पथकांची नजर! अनधिकृत पाणी उपसा केल्यास कारवाई; चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जिनिंग मालकांची धावपळ

पावसाने पाठ फिरविल्यामुळे कपाशीच्या वाढीवर परिणाम झाला. पाण्याअभावी झाडांची वाढ खुंटली, तर बोंडे आणि पात गळून पडली. त्यामुळे बागायती कपाशीचेही उत्पादन एकरी चार ते पाच क्विंटलपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी बिकट असून, एकरी एक ते दोन क्विंटल कापूस तरी हाती येईल की नाही, अशी चिंता त्यांना सतावत आहे. उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याने बाजारात कच्च्या कापसाची आवक कमी राहण्याचा अंदाज आहे. मागणी कायम असताना पुरवठा कमी झाल्यास कापसाच्या दरात आणखी वाढ होऊ शकते.

कापसाची उपलब्धता कमी पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने जिनिग कारखानदार आणि व्यापाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. कच्च्या कापसाचे दर नऊ हजार रुपयांच्या पुढे गेल्याचे सांगितले जात असून, कापूस मिळविण्यासाठी व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत आहेत. शेतातूनच कापूस खरेदी करण्याच्या या हालचालीमुळे बाजारातील स्पर्धा वाढण्याची चिन्हे आहेत. कापसाची आवक आणि बाजारातील मागणी यावर दरांची पुढील दिशा अवलंबून राहणार असल्याने शेतक-यांचे लक्ष बाजारभावाकडे लागले आहे.

भाव वाढला; पण शेतकऱ्याच्या पदरात किती?

गेल्या तीन ते चार वर्षांच्या तुलनेत यंदा कापसाला प्रतिक्विंटल १० ते १३ हजार रुपयांपर्यंत दर मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी वाढते दर दिलासादायक ठरू शकतात. मात्र, पावसामुळे उत्पादनातच मोठी घट झाल्यास या तेजीचा फायदा कितपत मिळणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कापसाचा भाव दहा हजार रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता असली, तरी वाढलेल्या दराचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना तेव्हाच मिळेल, जेव्हा विक्रीयोग्य कापूस पुरेशा प्रमाणात त्यांच्या हाती असेल.

Yavatmal News: झाडाखाली बसून शिक्षणाचे धडे! गडचिरोलीतील नेमडा येथील प्रकार; जीर्ण इमारतीचा फटका

शेतकऱ्यांचा हमीभावाला फाटा; खुल्या बाजाराला पसंती

केंद्र सरकारने यंदा मध्यम धाग्याच्या कापसासाठी प्रतिक्विंटल ८ हजार १२० रुपये, तर लांब धाग्याच्या कापसासाठी ८ हजार ६६७ रुपये किमान आधारभूत किमत (हमीभाव) जाहीर केली आहे. भारतीय कापूस महामंडळ अर्थात सीसीआयकडूनही खरेदीची तयारी असताना, खुल्या बाजारात हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांना कापूस विकण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सरकारी खरेदीपेक्षा खुल्या बाजारातील व्यवहारांकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे चित्र आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Yavatmal news cotton prices reach 9600 but farmers face a drop in production sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • drought news
  • farmer
  • Yavatmal

संबंधित बातम्या

Drought News : दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! ५१ हजार शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण
1

Drought News : दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! ५१ हजार शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण

Wardha News : वर्धेकरांनो, पाणी जपून वापरा! १४ गावांचा पाणीपुरवठा ५ दिवस बंद, २१ ऑक्टोबरपासून तांत्रिक कामासाठी शटडाऊन
2

Wardha News : वर्धेकरांनो, पाणी जपून वापरा! १४ गावांचा पाणीपुरवठा ५ दिवस बंद, २१ ऑक्टोबरपासून तांत्रिक कामासाठी शटडाऊन

Yavatmal News: दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान! पाच हजारांच्या मदतीची चर्चा; शेतकऱ्यांमध्ये नाराजी
3

Yavatmal News: दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान! पाच हजारांच्या मदतीची चर्चा; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Beed News : बीडमध्ये दुष्काळाचे संकट गडद; २२५ टँकर्स सुरू, सुनेत्रा पवारांनी दिले महत्त्वाचे निर्देश
4

Beed News : बीडमध्ये दुष्काळाचे संकट गडद; २२५ टँकर्स सुरू, सुनेत्रा पवारांनी दिले महत्त्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.