Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोकुळाष्टमीपूर्वी मोठा दिलासा! दोन लाख गोविंदांना विमा संरक्षणाची शक्यता; एकनाथ शिंदेंचे तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

गोकुळाष्टमी आणि दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या सुमारे दोन लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांच्या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 25, 2026 | 07:03 PM
गोकुळाष्टमीपूर्वी मोठा दिलासा! दोन लाख गोविंदांना विमा संरक्षणाची शक्यता; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

गोकुळाष्टमीपूर्वी मोठा दिलासा! दोन लाख गोविंदांना विमा संरक्षणाची शक्यता; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

Follow Us
Follow Us:
  • गोकुळाष्टमीपूर्वी मोठा दिलासा!
  • दोन लाख गोविंदांना विमा संरक्षणाची शक्यता
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश
Eknath Shinde On Dahi Handi: गोकुळाष्टमी आणि दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेला प्राधान्य देत राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. राज्यातील सुमारे दोन लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याच्या मागणीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेत संबंधित विभागाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राज्यातील सर्व गोविंदांना व्यापक विमा संरक्षण देण्याची मागणी केली होती. गोकुळाष्टमी आणि दहीहंडी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असून, दरवर्षी लाखो गोविंदा जीव धोक्यात घालून या उत्सवात सहभागी होतात. सरावादरम्यान तसेच प्रत्यक्ष दहीहंडी फोडताना अनेकांना गंभीर दुखापती होतात. अनेक मंडळांची आर्थिक परिस्थिती मर्यादित असल्याने उपचारांचा खर्च उचलणे कठीण जाते, त्यामुळे शासनाने विमा संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती.

Mumbai News : “नाद करा पण आमचा कुठं”; तब्बल 13 वर्षांनी मुंबईतील मंडळाच्या दहीहंडीची गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

यापूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून सुमारे एक लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्यात आले होते. मात्र यंदा हा लाभ वाढवून सुमारे दोन लाख गोविंदांपर्यंत पोहोचवावा आणि “महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन”च्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी सरनाईक यांनी केली होती. या मागणीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रावर “याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करावी” अशी स्पष्ट नोंद करत संबंधित यंत्रणेला तातडीने आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले.

याबाबत प्रतिक्रिया देताना पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले. गोविंदांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे ही काळाची गरज असल्याचे सांगत, राज्य सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे लाखो गोविंदांना मोठा दिलासा मिळेल आणि यंदाचा गोकुळाष्टमी व दहीहंडी उत्सव अधिक सुरक्षित वातावरणात साजरा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, पालघर आणि राज्यातील अनेक शहरांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो. अनेक सामाजिक संस्था, मंडळे आणि राजकीय संघटना या स्पर्धांचे आयोजन करतात. विजेत्या गोविंदा पथकांना लाखो रुपयांची बक्षिसे दिली जातात.

हंड्या फुटल्या…आता वेध गणेशाेत्सवाचे! पुणेकरांनी अनुभवला डीजेमुक्त दहीहंडीचा थरार

Web Title: Maharashtra government positive on insurance cover for two lakh dahi handi govindas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • Dahi Handi
  • Eknath Shinde
  • Govinda

संबंधित बातम्या

लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!
1

लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!

Uday Samant : ‘गटबाजी सोडा, संघटना मजबूत करा; ही शेवटची संधी!’ उदय सामंतांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर
2

Uday Samant : ‘गटबाजी सोडा, संघटना मजबूत करा; ही शेवटची संधी!’ उदय सामंतांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर

Eknath Shinde: लंडनच्या ब्रिटिश संसदेत एकनाथ शिंदेंची इंग्रजीमध्ये दमदार गर्जना; ‘स्टेट्समनशिप पुरस्कारा’ने झाला सन्मान
3

Eknath Shinde: लंडनच्या ब्रिटिश संसदेत एकनाथ शिंदेंची इंग्रजीमध्ये दमदार गर्जना; ‘स्टेट्समनशिप पुरस्कारा’ने झाला सन्मान

Eknath Shinde : लंडनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदेंचा गौरव; ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी दुमदुमली ब्रिटिश संसद
4

Eknath Shinde : लंडनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदेंचा गौरव; ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी दुमदुमली ब्रिटिश संसद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.