Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Konkan Ganesh Festival: चाकरमानी नव्हं ‘कोकणवासीय’ म्हणा! गणेशोत्सवाआधी राज्य सरकारने दिली खुशखबर, लवकरच…

Maharashtra Government: गणेशोत्सव आला की चाकरमानी कोकणाकडे जातात. कोकण गणेशोत्सवाला विशेष महत्व प्राप्त आहे. आरत्या, भजने , लोककला यांचा संगम आपल्याला गणेशोत्सवात कोकणात पाहायला मिळतो.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 23, 2025 | 04:29 PM
Konkan Ganesh Festival: चाकरमानी नव्हं 'कोकणवासीय' म्हणा! गणेशोत्सवाआधी राज्य सरकारने दिली खुशखबर, लवकरच...

Konkan Ganesh Festival: चाकरमानी नव्हं 'कोकणवासीय' म्हणा! गणेशोत्सवाआधी राज्य सरकारने दिली खुशखबर, लवकरच...

Follow Us
Close
Follow Us:

Konkan Ganeshotsav 2025: लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कोकणात गणेशोत्सवाला विशेष महत्व आहे. कोकणातील गणेशोत्सव म्हणजे जगप्रसिद्ध आहे. दरम्यान आता कोंकणी माणसांसाठी शासन दरबारी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने कोकणकरांना एक खुशखबर दिली आहे.

गणेशोत्सव आला की चाकरमानी कोकणाकडे जातात. कोकण गणेशोत्सवाला विशेष महत्व प्राप्त आहे. आरत्या, भजने , लोककला यांचा संगम आपल्याला गणेशोत्सवात कोकणात पाहायला मिळतो. चाकरमानी हा शब्द अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. मात्र हा शब्द बदलण्याची मागणी केली जात होती. या मागणीला आता यश मिळाले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागणीची दाखल घेतली आहे. अजित पवार यांनी प्रशासनाला चाकरमानी ऐवजी कोकणवासीय हा शब्द वापरण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या लोकांना कोकणवासीय म्हणून संबोधले जाणार आहे. याबाबत लवकरच परिपत्रक काढण्यात येणार आहे.

भारताच्या या भागात मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव

गणेश चतुर्थीचा सण आला की वातावरणात उत्साह आणि आनंदाचे वातावरण पसरते. प्रत्येक घरात आणि मंदिरात बाप्पांची स्थापना केली जाते तसेच ठिकठिकाणी भव्य पंडाल उभारले जातात. मुंबईतील गणेशोत्सवाचे दर्शन तर जगप्रसिद्ध आहेच, पण देशाच्या इतर अनेक भागांमध्येही हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. रस्ते, चौक सजवले जातात, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तांची गर्दी सर्वांना मोहून टाकते. जर तुम्ही गणेश चतुर्थीच्या काळात प्रवासाचा विचार करत असाल, तर मुंबई व्यतिरिक्तही काही ठिकाणे अशी आहेत जिथे गणेशोत्सवाची झलक वेगळ्याच उत्साहाने अनुभवता येते. चला तर जाणून घेऊया या खास ठिकाणांविषयी.

Ganesh Festival: यंदाचा गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होणार; आशिष शेलारांनी केली ११ कोटी निधीची घोषणा

यंदाचा गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होणार

वर्षानुवर्षांची परंपरा असलेला गणेशोत्सव यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यास शासनाची यंत्रणा सज्ज झाली असून गणेशोत्सव मंडळे व घरगुती गणेश आरास स्पर्धा, चौकाचौकात रोशनाई, ड्रोन शो, विविध सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारे जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार आहे. यावेळी प्रथमच राज्य शासन उत्सवात सहभागी होणार असून यासाठी शासनाने सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे.

 

Web Title: Maharashtra government said dont use chakarmani word used to kokanvasi ajit pawar konkan people ganesh festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 04:18 PM

Topics:  

  • Ganesh Festival
  • Konkan
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

MHADA lottery : घराचे स्वप्न साकार होणार! म्हाडा कोकण मंडळातर्फे 5354 घरांच्या सोडतीची तारीख ठरली, ‘या’ दिवशी होणार लॉटरी
1

MHADA lottery : घराचे स्वप्न साकार होणार! म्हाडा कोकण मंडळातर्फे 5354 घरांच्या सोडतीची तारीख ठरली, ‘या’ दिवशी होणार लॉटरी

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी ‘ती’ अट ठरतीये अडचणीची; दिवाळीत पैसे मिळणार का?
2

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी ‘ती’ अट ठरतीये अडचणीची; दिवाळीत पैसे मिळणार का?

राज्यात कोल्ड्रिफ कफ सिरपवर बंदी; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
3

राज्यात कोल्ड्रिफ कफ सिरपवर बंदी; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Flood Relief: देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला! शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; तब्बल ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर
4

Flood Relief: देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला! शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; तब्बल ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.