Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर; संयुक्त परीक्षेबाबत महाराष्ट्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियमाअंतर्गत राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी राज्य शासकीय सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 24, 2024 | 02:53 PM
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर; संयुक्त परीक्षेबाबत महाराष्ट्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी एक वेळची विशेष बाब म्हणून शासन सेवेतील प्रवेशासाठी विहित कमाल वयोमर्यादेत एक वर्ष इतकी शिथिलता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या अनुषंगाने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या परीक्षांसाठी वयाधिक झालेल्या पात्र उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी देण्यात आली असून, उमेदवारांना ६ जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियमाअंतर्गत राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी राज्य शासकीय सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. या अधिसूचनेतील तरतुदीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासनामार्फत पदसंख्या आणि आरक्षण नमूद करून सुधारित मागणीपत्रे एमपीएससीला देण्यात आली होती. त्यानुसार एमपीएससीने जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र, एक वेळची विशेष बाब म्हणून वयाधिक उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय २० डिसेंबर रोजी घेण्यात आला.

एमपीएससी विद्यार्थ्यांसोबत आपले महायुती सरकार!
कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याबाबत शासन निर्णय…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमार्यदेत शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त परीक्षा तसेच… pic.twitter.com/1k4f153F0i — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 23, 2024

पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी

या निर्णयाच्या अनुषंगाने एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ या संवर्गाच्या जाहिरातींस अनुसरुन निश्चित केलेल्या कमाल वयोमर्यादेमध्ये एक वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे. तसेच पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

यंदा MPSC च्या वर्षभर परीक्षाच-परीक्षा; वेळापत्रकही जाहीर

राज्य शासनाच्या सेवेत जाण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आगामी प्रमुख परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून, वर्षभर परीक्षाच-परीक्षा राहणार आहे. त्यामुळे गुणवान, मेहनती व महत्त्वाकांक्षी उमेदवार तयारीला लागणार आहे.

नव्या वर्षांत 5 जानेवारी रोजी महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक श्रेणी-1, मुद्रांक निरीक्षक या पदांचा समावेश आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, बेलिफ व लिपीक टंकलेखक, सहायक मोटार वाहन निरीक्षक या पदांचा यामध्ये समावेश आहे.

हेही वाचा: यंदा MPSC च्या वर्षभर परीक्षाच-परीक्षा; वेळापत्रकही जाहीर, सरकारी नोकरीचा प्रयत्न करणाऱ्यांना ‘अच्छे दिन’

दरम्यान, 16 मार्च रोजी दिवाणी न्यायाधीश व कनिष्ठस्तर न्यायदंडाधिकारी या पदासाठीची पूर्वपरीक्षा आहे. महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा नुकतीच झाली असून, 26 एप्रिल रोजी 35 संवर्गातील मुख्य परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 10 मे, 2025, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 18 मे, 2025, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 18 मे, 2025 समावेश आहे. तसेच दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असलेल्या परीक्षामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा आदींचा समावेश आहे.

Web Title: Maharashtra government take decision joint examination age limit mpsc student marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 02:45 PM

Topics:  

  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांचे आरोग्य आता Maharashtra सरकारची जबाबदारी; शासनाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
1

विद्यार्थ्यांचे आरोग्य आता Maharashtra सरकारची जबाबदारी; शासनाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.