Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: दीनानाथ मंगेशकर रूग्णालयावर कारवाई कधी होणार? आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेचा ससून रुग्णालयाच्या उच्च स्तरीय समितीचा अहवाल प्राप्त होईल. त्यात कोणी दोषी असेल तर कारवाई केली जाणार आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 18, 2025 | 02:36 PM
Pune News: दीनानाथ मंगेशकर रूग्णालयावर कारवाई कधी होणार? आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
Follow Us
Follow Us:

पुणे: काही दिवसांपूर्वी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात गर्भवती महिलेचा उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणानंतर राज्यभरतून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच मंगेशकर रूग्णालयावर कारवाई कधी केली जाणार? असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान आता राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तीन विभागाकडून मंगेशकर रूग्णालयाची चौकशी केली जात आहे. यावर आता  आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  रूग्णालयाची चौकशी सुरू आहे. हे रूग्णालय धर्मादाय कायद्याच्या अंतर्गत सुरू झाले आहे. राज्याचा कायदा विभाग देखील त्याची चौकशी करत आहे, असे आरोग्यमंत्री म्हणाले.

कायदा विभाग, आरोग्य विभाग आणि ससून रूग्णालयाचा अहवाल प्राप्त झाल्यावर दीनानाथ मंगेशकर रूग्णालयावर कारवाई केली जाईल. रूग्णाला ज्या पद्धतीने त्रास झाल्या त्यामुळे कारवाई व्हावि अशी मागणी आहे. मात्र वस्तुस्थिती पाहूनच कारवाई केली जाईल. पुढील काही दिवसांत अहवाल  प्राप्त होईल. त्यानंतरच कारवाई संदर्भात पावले उचलली जातील, असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले.

काय आहे ससूनचा अहवाल?

ससून रूग्णालयाने या प्रकरणातील 6 पानी अहवाल पुणे पोलिसांकडे सादर केला आहे.ससून रूग्णालयाच्या वैद्यकीय समितीने मंगेशकर रूग्णालय घटनेतील 6 पानांचा अहवाल सादर केला आहे. या अहवालात समितीने दीनानाथ मंगेशकर रूग्णालय आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर ठपका ठेवण्यात आला नसल्याचे समोर येत आहे. अहवाल सादर झाल्यानंतर पुणे पोलिसांनी ससून रूग्णालयाकडे चार गोष्टींबाबत अभिप्राय मागितला आहे.

Pune News: गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणात मंगेशकर रूग्णालयासह डॉ. घैसासांवर ठपका? काय आहे ससूनचा अहवाल?

पुण्यातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी ससून हॉस्पिटलचा अहवाल वैद्यकीय शिक्षण सचिवांना सादर केला गेला आहे. मंगेशकर रूग्णालयात वैद्यकीय हलगर्जीपणा झाला का याचा तपास करण्यात आला. याआधी तीन समित्यांचे अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये दोन अहवालात मंगेशकर रूग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे.

डॉक्टर सुश्रुत घैसास यांना पोलिस संरक्षण

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेचा ससून रुग्णालयाच्या उच्च स्तरीय समितीचा अहवाल प्राप्त होईल. त्यात कोणी दोषी असेल तर कारवाई केली जाणार आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणात एक नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर आरोप होत आहेत. दरम्यान डॉक्टर घैसास यांनी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली होती.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात एका गर्भवती महिलेचा उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणात डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर डॉक्टर घैसास यांनी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. आपल्या जीवाला धोका असल्याने डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी पुणे पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. दरम्यान पोलिसांनी ही मागणी मान्य केली आहे. पुणे पोलिसांनी एक कर्मचारी डॉक्टर घैसास यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त केला आहे.

Web Title: Maharashtra health minister prakash abitkar statement on action against mangeshkar hospital case pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2025 | 02:26 PM

Topics:  

  • deenanath mangeshkar hospital
  • Maharashtra Health Department
  • pune news
  • Sasoon Hospital

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
2

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प
3

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…
4

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.