पुढील पाच दिवस महत्त्वाचे, या 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय स्थिती? वाचा एका क्लिकवर (फोटो सौजन्य-X)
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात मुसळधार पावसाने अनेक भागात हाहाकार माजवला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून नाशिक आणि पालघरमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघरमधील सूर्या नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे धामडी धरणाचे सर्व 5 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. नाशिकमध्येही गोदावरी नदी वाहत आहे, ज्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. प्रशासनाने पर्यटन स्थळांवर अलर्ट जारी केला आहे आणि लोकांना नद्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर राज्यात पावसासाठी पुढील पाच दिवस महत्त्ताचे सांगितले आहेत.
राज्यात बऱ्याच ठिकाण जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह अत्यंत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, कोल्हापूर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून या भागातही यलो अलर्ट जारी केला आहे.
जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने इशारा दिला आहे की बीड, लातूर, धाराशिव या तीन जिल्ह्यांतय वादळ वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण विभागात ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक घाटमाथा परिसरात आणि जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
पालघर जिल्ह्यात दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला होता. रविवारी संध्याकाळी हवामान विभागाने सोमवारी सुद्ध अलर्ट जाहीर केल्याने वादळासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारची सुट्टी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी, सरकारी आणि खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित आणि विनाअनुदानित, सर्व आश्रम शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.