
#LiveBlogMarathi #BreakingNews #आजच्या_बातम्या
26 Dec 2025 01:08 PM (IST)
जयपूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. जयपूरमध्ये ग्रामीण भागात असलेल्या चौमून परिसरात एका मशिदीबाहेर हिंसाचार झाल्याची घटना घडली आहे. मशिदीबाहेरील दगड हटविण्यावरून हा वाद उफाळून आला आहे. पोलिसांनी ते रोखण्याच प्रयत्न केला असता, विशिष्ठ समुदायाच्या सदस्यांनी दगडफेक केली आणि त्यात बरेच पोलिस जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान जयपूरमध्ये एका मशिदीबाहेर हिंसाचार उफाळून आला आहे. काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामध्ये बरेच पोलिस जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. ही घटना पहाटेच्या वेळेस घडली. त्यानंतर या परिसरात 2 तासांसाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे.
26 Dec 2025 12:52 PM (IST)
भारतावर ५०% अतिरिक्त कर लादून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतःच्याच बनवलेल्या सापळ्यात अडकलेले दिसतात. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताला त्रास देण्याच्या उद्देशाने हा अतिरिक्त कर लादला असला तरी, भारताला त्याचा मोठा फायदा होत असल्याचे दिसून येते. एवढेच नाही तर, चीनसोबतचे भारताचे संबंध, जे खूपच कटु होते, ते आता सुधारत असल्याचे देखील दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या वर्षी ऑगस्टमध्ये भारतावर मोठ्या प्रमाणात कर लादल्यानंतर, त्यांच्यावर जगभरात टीका झाली. ट्रम्प यांच्या या निर्णयावर अमेरिकेतही टीका झाली. चीनने भारताला पाठिंबा दर्शविला होता.
26 Dec 2025 12:42 PM (IST)
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची युती होणार आहे. या युतीला विरोध करत प्रशांत जगताप यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार, असा प्रश्न उपस्थित होत होता. अशातच प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी १२ वाजता जगताप काँग्रेसमध्ये (Congress) अधिकृतरित्या प्रवेश करतील.
मुंबईतील दादर भवन येथे हा पक्षप्रवेश होणार असून, याबाबत जवळपास अंतिम निर्णय निश्चित झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. प्रशांत जगताप यांच्यासमोर भाजप, काँग्रेस, शिवसेना तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट असे अनेक पर्याय खुले होते. विविध पक्षांकडून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. मात्र, अखेर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
26 Dec 2025 12:32 PM (IST)
२००४ मध्ये “इंडियन आयडल सीझन १” जिंकल्यानंतर अभिजीत सावंत राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाला. परंतु, त्याचे चाहते या मोठ्या विजयाचा आनंद साजरा करत करत असताना, गायक थोडा घाबरला देखील होता. त्याने अलिकडच्या मुलाखतीत यामागील कारण स्पष्ट केले आहे. त्याच्या मते, त्याला भीती होती की इतकी लोकप्रियता मिळवल्यानंतर, एक प्रसिद्ध गायक म्हणून त्याला दीर्घकालीन प्रोजेक्टसाठी स्वाक्षरी करून तो फसेल आणि नंतर त्याला बाहेर काढू शकणार नाही.
26 Dec 2025 12:22 PM (IST)
14 वर्षीय ‘बिहारचा मुलगा’ वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेट विश्वामध्ये धूमाकुळ घालत आहे. त्याने नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्ये कमालीची कामगिरी केली होती. सध्या तो देशातंर्गत सामने खेळत आहे आणि त्याने यामध्ये देखील कमालीची कामगिरी केली आहे. त्याने बिहारकडून १९० धावांची धमाकेदार खेळी करत अरुणाचल प्रदेशच्या गोलंदाजांना त्रास दिला. २६ डिसेंबर रोजी मणिपूरविरुद्ध त्याला खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते, परंतु तो त्या सामन्याचा भाग नाही.
26 Dec 2025 12:12 PM (IST)
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या (Kokan Railway)रेल्वेगाड्या सध्या मंगळसूत्र चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’वर असल्याचे चित्र दिसून येत आहे. गर्दीचा व महिलांच्या झोपेचा गैरफायदा घेत चोरटे गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढत असल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या सात महिन्यांत कोकण मार्गावरील खेड हद्दीत तब्बल १४ महिला प्रवाशांच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारत लाखोंचा ऐवज लंपास (Crime) केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या एकाही चोरीचा अद्याप छडा लागलेला नाही. रेल्वेगाड्यांमधून प्रवास करताना प्रवासी बेसावध असल्याची संधी साधून चोरटे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे व इतर दागिने हातोहात हिसकावून पलायन करत आहेत.
26 Dec 2025 12:08 PM (IST)
पुणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये वाद निर्माण झाला आहे. पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जागावाटपावरुन वाद सुरु आहे. यानंतर आता जागावाटपावरुन शिवसेना शिंदे गटाच्या आक्रमक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर आंदोलन सुरु केले आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून 20 ते 25 जागांची मागणी केली आहे.
26 Dec 2025 11:55 AM (IST)
रेल्वे तिकिटांच्या भाड्यात वाढ करण्याबाबत मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. आजपासून म्हणजेच २६ डिसेंबरपासून, २१५ किमी पेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी, सामान्य वर्गात प्रति किमी १ पैसे आणि मेल/एक्सप्रेसमध्ये प्रति किमी २ पैसे भाडे वाढवण्यात आले आहे. हा निर्णय ५ दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला होता आणि आता तो लागू करण्यात आला आहे. त्यामुळे, त्याचा परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होणार आहे.
26 Dec 2025 11:45 AM (IST)
कुष्ठरोग्यांसाठी आजीवन कार्य करणारे बाबा आमटे यांची आज जयंती. कुष्ठरोग्यांची सेवा, पुनर्वसन आणि समाजातील उपेक्षितांच्या हक्कांसाठी बाबा आमटे यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले. त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्रात ‘आनंदवन’ या कुष्ठरोग्यांसाठीच्या आश्रमाची स्थापना केली आणि ‘नर्मदा बचाव आंदोलन’ व ‘वन्यजीव संरक्षण’ यांसारख्या चळवळींमध्येही सक्रिय भूमिका बजावली. कुष्ठरोग्यांसाठी ‘आनंदवन’ ही स्वावलंबी वसाहत उभारली. आजही ते कुष्ठरोग्यांसाठी हक्काचे घर म्हणून उभे आहे. पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे, गांधी शांतता पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार यांसारखे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांचा वारसा प्रकाश आमटे यांनी पुढे सुरु ठेवला आहे.
26 Dec 2025 11:35 AM (IST)
मनसेतून बाहेर पडलेल्या प्रकाश महाजन यांचा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. आज दुपारी 12.30 वाजता ठाण्यात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.
26 Dec 2025 11:25 AM (IST)
कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी एका बाजूला सुरू असतानाच प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिकांनी मात्र या निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतलाय... प्रभागातील मतदारांनी तसा बोर्डस आपल्या मतदार संघात लावला आहे.. या बोर्ड च्या माध्यमातून मतदारांनीइच्छुकांना तसेच नेत्यांना देखील इशाराच देण्याचा प्रयत्न केला आहे.. प्रभाग क्रमांक 20 मधील साई मंदिर ते वाशी नाका या परिसरातील रस्त्यासह नागरी सुविधा देण्याची आश्वासन दिली गेली मात्र त्याची पूर्तता झाली नसल्याचा उल्लेख या बोर्डवर करण्यात आला आहे.... साई मंदिर ते वाशी नाका रस्त्यावर लावलेल्या या बोर्डची सध्या कोल्हापूर शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
26 Dec 2025 11:20 AM (IST)
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या निकालावर बोलताना ते म्हणाले, 'घाटावरचा सारखा खाली येतोय त्याची लायकी काय? अशी मला चिठ्ठी आली. मी काय केलंय असंही विचारलं, मी सांगतो येताना टमटम घेऊन आलोय. आता टमटममध्ये बसल एवढेच राहिलेत. माझ्या भागात विकासकामे झाली नाही पाहिजे म्हणून काम करणारा नेता. या भागातला दुष्काळ हटला नाही पाहिजे असा नेता, अनेक षडयंत्र करणारा नेता, म्हणून हा शकुनी मामा, काय होता तू काय झाला तू, बरबाद झाला तू...'
26 Dec 2025 11:13 AM (IST)
सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरूच आहे. मिरजेतल्या दिग्गज नगरसेवकांच्या प्रवेशानंतर सांगलीतल्या भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातल्या नगरसेवकांनी आज अजित पवार गटात प्रवेश केला आहे. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांगली शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या उपस्थितीत सांगलीतल्या विद्यमान नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिजीत भोसले, स्नेहन सावंत आणि भाजपाच्या नसीमा नाईक यांचा समावेश आहे.
26 Dec 2025 10:57 AM (IST)
भारतावर ५०% अतिरिक्त कर लादून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतःच्याच बनवलेल्या सापळ्यात अडकलेले दिसतात. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताला त्रास देण्याच्या उद्देशाने हा अतिरिक्त कर लादला असला तरी, भारताला त्याचा मोठा फायदा होत असल्याचे दिसून येते. एवढेच नाही तर, चीनसोबतचे भारताचे संबंध, जे खूपच कटु होते, ते आता सुधारत असल्याचे देखील दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या वर्षी ऑगस्टमध्ये भारतावर मोठ्या प्रमाणात कर लादल्यानंतर, त्यांच्यावर जगभरात टीका झाली. ट्रम्प यांच्या या निर्णयावर अमेरिकेतही टीका झाली. चीनने भारताला पाठिंबा दर्शविला होता.
26 Dec 2025 10:44 AM (IST)
बलुचिस्तान (Balochistan) हा प्रांत सध्या पाकिस्तानी (Pakistani) सुरक्षा दलांच्या छळाचा आणि मानवी हक्कांच्या पायमल्लीचा नरक बनला आहे. बलुचिस्तानच्या मानवाधिकार परिषदेने (HRCB) नोव्हेंबर २०२५ चा आपला अहवाल सादर केला असून, त्यातील आकडेवारी पाहून जगाच्या अंगावर शहारे येत आहेत. या एका महिन्यात पाकिस्तानी सैन्याने १०६ बलुच नागरिकांचे अपहरण केले असून ४२ जणांची हत्या केली आहे. या भयावह परिस्थितीमुळे बलुचिस्तानमध्ये संतापाचा ज्वालामुखी उसळला असून, जगभरातील मानवाधिकार संघटनांनी यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
26 Dec 2025 10:37 AM (IST)
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची युती होणार आहे. या युतीला विरोध करत प्रशांत जगताप यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार, असा प्रश्न उपस्थित होत होता. अशातच प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी १२ वाजता जगताप काँग्रेसमध्ये (Congress) अधिकृतरित्या प्रवेश करतील.
26 Dec 2025 10:30 AM (IST)
२००४ मध्ये “इंडियन आयडल सीझन १” जिंकल्यानंतर अभिजीत सावंत राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाला. परंतु, त्याचे चाहते या मोठ्या विजयाचा आनंद साजरा करत करत असताना, गायक थोडा घाबरला देखील होता. त्याने अलिकडच्या मुलाखतीत यामागील कारण स्पष्ट केले आहे. त्याच्या मते, त्याला भीती होती की इतकी लोकप्रियता मिळवल्यानंतर, एक प्रसिद्ध गायक म्हणून त्याला दीर्घकालीन प्रोजेक्टसाठी स्वाक्षरी करून तो फसेल आणि नंतर त्याला बाहेर काढू शकणार नाही.
26 Dec 2025 10:19 AM (IST)
काल ग्वाल्हेरमधील कैलाश खेर यांचा संगीत कार्यक्रम पार पडला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ग्वाल्हेर मेळा मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गृहमंत्री अमित शहा यांनी दिवसभर कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. त्यानंतर, संध्याकाळी कैलाश खेर यांचा संगीत कार्यक्रम पार पडला. मात्र, गर्दीने इतका गोंधळ घातला की कैलाश खेर यांना त्यांचा कार्यक्रम मधेच बंद करावा लागला. शिवाय, कैलाश खेर यांना स्टेजवरून लोकांच्या गर्दीला प्राण्यांसारखे वागू नका असे आवाहन करावे लागले.
26 Dec 2025 10:12 AM (IST)
दोन्ही खेळाडूंनी त्यांच्या प्रभावी खेळीनंतर जल्लोष साजरा केला आणि आता चाहते पुन्हा एकदा त्यांच्या स्फोटक फलंदाजीची आतुरतेने वाट पाहत आहेत. स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीच्या दिल्लीचा सामना गुजरातशी होईल. हा सामना बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळला जाईल. रोहित शर्माच्या मुंबईचा सामना जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर उत्तराखंडशी होईल. दोन्ही सामने शुक्रवारी सकाळी ९ वाजता सुरू होतील.
26 Dec 2025 09:59 AM (IST)
United States Airstrikes In Nigeria: अमेरिकेच्या लष्कराने गुरुवारी रात्री वायव्य नायजेरियामध्ये दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या तळांना लक्ष्य करत हवाई हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिली.
ट्रम्प यांनी यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात नायजेरियामधील दहशतवाद्यांवर ख्रिश्चनांच्या हत्येचे गंभीर आरोप केले होते. त्या वेळीच त्यांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाईचा इशारा दिला होता. नायजेरियातील सरकार हिंसा रोखण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप करत, जर ही परिस्थिती अशीच राहिली आणि अमेरिकेने हस्तक्षेप केला नाही, तर नायजेरियातील ख्रिश्चनांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होऊ शकतो, असे विधानही ट्रम्प यांनी केले होते.
26 Dec 2025 09:47 AM (IST)
एकमेकांचे नेते आणि पदाधिकारी पक्षात घेऊ नयेत, असा अलिखित करार भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यात असल्याचे सांगितले जात होते. मात्र मिरा-भाईंदरमध्ये या परस्पर सामंजस्याला तडा गेल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपचे दोन नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना (शिंदे गट) मध्ये सामील झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे अनेकांना तिकीट मिळण्याची शक्यता कमी वाटत असून, याच कारणामुळे काही नेत्यांनी पक्षबदलाचा मार्ग स्वीकारल्याचे बोलले जात आहे.
26 Dec 2025 09:41 AM (IST)
Pune Politics: राजकीय वर्तुळात चर्चेत असलेले प्रशांत जगताप आज दुपारी १२ वाजता काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील दादर भवन येथे हा पक्षप्रवेश होणार असून, याबाबत जवळपास अंतिम निर्णय निश्चित झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. प्रशांत जगताप यांच्यासमोर भाजप, काँग्रेस, शिवसेना तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट असे अनेक पर्याय खुले होते. विविध पक्षांकडून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. मात्र, अखेर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
26 Dec 2025 09:36 AM (IST)
फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी आनंदाची बातमी आहे. गेममध्ये ड्रिम रिंग लक रॉयल ईव्हेंट आता लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट ख्रिसमस थिमवर आधारित आहे. यामध्ये मिळणारे ग्लू वॉल, व्हीकल आणि वेपन स्किनचे डिझाईन सेंटा क्लॉसची सवारी म्हणजेच रेंडियरने प्रेरित आहे. या गेमिंग रिवॉर्डशिवाय प्लेअर्सना या ईव्हेंटमध्ये यूनिवर्सल रिंग टोकन देखील क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. गेमिंग कंपनी गरेनाचं असं मत आहे की, अशा प्रकराच्या रिवॉर्ड्समुळे प्लेअर्सना एक्सक्लूसिव गेमिंग आयटम जिंकण्याची संधी मिळते आणि यामुळे प्लेअर्सचा गेमिंगचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला होतो.
26 Dec 2025 09:30 AM (IST)
Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफीने भारतीय स्थानिक क्रिकेटच्या मर्यादित षटकांच्या स्वरूपाचा उत्साह पुन्हा जिवंत केला आहे. त्याचे कारण म्हणजेच भारतीय संघामधील काही दिग्गज खेळाडूंचा स्पर्धेमध्ये समावेश. या स्पर्धेमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळाला आणि चाहत्यांची गर्दी बिहारने बुधवारी विक्रमी सांघिक धावसंख्येसह लिस्ट ए मोहिमेची सुरुवात केली. रांची येथे अरुणाचल प्रदेशविरुद्ध बिहारने ५० षटकांत ६ गडी गमावून ५७४ धावा केल्या, जी विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आहे.
26 Dec 2025 01:02 AM (IST)
स्मार्टफोन बनवणारी कंपनी शाओमीने गुरुवारी त्यांच्या फ्लॅगशिप लाइनअपमधील चौथे मॉडेल चीनमध्ये लाँच केले आहे. हा नवीन स्मार्टफोन Xiaomi 17 Ultra या नावाने लाँच करण्यात आला. नुकताच लाँच करण्यात आलेला हा नवीन स्मार्टफोन Xiaomi 15 Ultra चा सक्सेसर असल्याचं सांगितलं जात आहे. हा स्मार्टफोन यावर्षीच्या सुरुवातीला देशात लाँच करण्यात आला होता. नवीन Xiaomi 17 Ultra क्वालकॉमच्या फ्लॅगशिप ऑक्टा-कोर Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेटने सुसज्ज आहे, जो 3nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे.
Maharashtra to World Breaking News Live: जागतिक बाजारपेठेत आज सकारात्मक ट्रेंड पाहायला मिळाले आहेत. मात्र तरी देखील आज २६ डिसेंबर रोजी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, लाल रंगात उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टी २६,१४३ च्या जवळ व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा ३३ अंकांनी किंवा ०.१३% ने कमी होता.