Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC News: लालपरीचा होणार कायापालट! 2035 पर्यंत एसटी ताफा पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचा निर्धार

“महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५” अंतर्गत २०३५ पर्यंत एसटीच्या सर्व बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शासनाच्या वतीने परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 25, 2026 | 01:45 PM
लालपरीचा होणार कायापालट! २०३५ पर्यंत एसटी ताफा पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचा निर्धार (फोटो सौजन्य - chatgpt)

लालपरीचा होणार कायापालट! २०३५ पर्यंत एसटी ताफा पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचा निर्धार (फोटो सौजन्य - chatgpt)

Follow Us
Follow Us:
  • लालपरीचा होणार कायापालट
  • 2035 पर्यंत एसटी ताफा पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचा निर्धार
  • एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला
मुंबई : राज्याच्या पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकत “महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५” अंतर्गत २०३५ पर्यंत एसटीच्या सर्व बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शासनाच्या वतीने परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला आहे. सभागृहात नियम २९३ अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना मंत्री सरनाईक यांनी हे धोरण मांडले.

या वेळी मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, वाढते प्रदूषण, इंधन दरातील अस्थिरता आणि बदलते जागतिक वातावरण यांचा विचार करता इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार ही केवळ गरज नसून काळाची अपरिहार्यता बनली आहे. सुमारे १४ हजार बसेसचा ताफा असलेली एसटी ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून, या सेवेला आता ‘ हरित ऊर्जे ‘ची नवी ओळख देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या धोरणाअंतर्गत नागरिकांना इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी कर सवलती देण्यात येणार असून, टोल माफीमुळे प्रवास खर्चात मोठी बचत होणार आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर दर २५ किलोमीटर अंतरावर चार्जिंग सुविधा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय चार्जिंग पायाभूत सुविधांसाठी आर्थिक प्रोत्साहन देण्यात येणार असून संशोधन, नवकल्पना आणि कौशल्य विकासालाही चालना दिली जाणार आहे.

गाडी सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत ‘बोर्डिंग’ बदला, तिकीट गैरवापर रोखण्यासाठी रेल्वेच्या नव्या सुधारणा; खऱ्या प्रवाशांना दिला

मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, विशेष म्हणजे, चार्जिंग स्टेशनसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यावर भर देण्यात येणार असून ऊर्जा निर्मितीपासून वापरापर्यंत संपूर्ण प्रक्रिया पर्यावरणपूरक करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या निर्णयामुळे केवळ पर्यावरण संवर्धनालाच चालना मिळणार नाही, तर एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीतही मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. अर्थात, हरित ऊर्जेमुळे इंधन व देखभाल खर्चात बचत होऊन दीर्घकालीन टिकाऊपणा साधता येणार आहे. याबरोबरच ई-मोबिलिटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊन महाराष्ट्र देशात अग्रस्थानी राहील, असा विश्वास व्यक्त मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

“डिझेलच्या धुरातून हरित ऊर्जेकडे” हा बदल केवळ तांत्रिक नसून विचारांतील परिवर्तन असल्याचे नमूद करत, “हरित महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र आणि सक्षम एसटी” हेच शासनाचे अंतिम ध्येय असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्र हरित आणि शाश्वत विकासाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Kalyan Gramin News : अनधिकृत इमारत रहिवाशांना दिलासा ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय

Web Title: Maharashtra journey towards the green revolution determination to make the st fleet fully electric by 2035

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • msrtc
  • st mahamandal

संबंधित बातम्या

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ११ ऑगस्टला ८६ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन
1

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ११ ऑगस्टला ८६ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा लांबणीवर; ‘कर्मचाऱ्यांचे संसार वेठीस धरू नका’, ७ तारखेचा पगार आता १० ऑगस्टला?
2

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा लांबणीवर; ‘कर्मचाऱ्यांचे संसार वेठीस धरू नका’, ७ तारखेचा पगार आता १० ऑगस्टला?

Ganpati Special ST Bus : चाकरमान्यांना बाप्पा पावला; गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार
3

Ganpati Special ST Bus : चाकरमान्यांना बाप्पा पावला; गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.