Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC St Bus: एसटीच्या NCMC Card संदर्भात महत्त्वाची अपडेट! एसटी प्रवासासाठी आता लगेच…; प्रताप सरनाईक यांचा निर्णय

MSRTC St Bus: एसटी महामंडळाच्या बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत पात्र प्रवाशांना जुन्या पद्धतीने सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 06, 2026 | 12:09 PM
एसटीच्या NCMC Card संदर्भात महत्त्वाची अपडेट! एसटी प्रवासासाठी आता लगेच...; प्रताप सरनाईक यांचा निर्णय

एसटीच्या NCMC Card संदर्भात महत्त्वाची अपडेट! एसटी प्रवासासाठी आता लगेच...; प्रताप सरनाईक यांचा निर्णय

Follow Us
Follow Us:
  • महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा!
  • एसटीच्या एनसीएमसी कार्ड सक्तीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
  • १ जानेवारी २०२७ पासून होणार सक्ती
 

MSRTC St Bus: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत शासनाच्या निर्देशानुसार समाजातील विविध घटकांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. या सवलतींचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावीपणे मिळावा, यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (MSRTC St Bus)

मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिला लाभार्थ्यांची कार्ड नोंदणी अद्याप अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्री महोदयांकडून करण्यात आलेल्या विनंत्या व सूचनांचा सकारात्मक विचार करून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

अकोल्यात एसटीच्या UPI तिकीटाला प्रवाशांची पसंती; 18917 प्रवाशांनी केला यूपीआयचा वापर

एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या प्रवासात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. आतापर्यंत सुमारे १ कोटी १० लाख कार्डांची नोंदणी व वितरण करण्यात आले आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिला लाभार्थ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचली नसल्याने त्या अद्याप स्मार्ट कार्डपासून वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे.

ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाने आता ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून ही शिबिरे राबविण्यात येणार आहेत. या विशेष मोहिमेद्वारे ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांची १०० टक्के एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने निश्चित केले आहे.

कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मुदतवाढ

महिला लाभार्थ्यांची मोठी संख्या आणि ग्रामीण भागात कार्ड नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन तसेच विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्री महोदयांकडून करण्यात आलेल्या विनंत्यांचा सकारात्मक विचार करून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड नसतानाही उद्या, ७ नोव्हेंबर २०२६ पासून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत एसटीच्या प्रवास सवलतींचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे कार्ड नोंदणी अद्याप पूर्ण न झालेल्या महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मुदतवाढीच्या कालावधीत सर्व पात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांनी आपले एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी करून घ्यावे, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलतींच्या लाभापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे. विशेष नोंदणी मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत एनसीएमसी स्मार्ट कार्ड पोहोचविण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांनी सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

ST News : NCMC कार्डचा घोळ? पैसे कट, पण तिकीट निघेना; श्रीरंग बरगेंची चौकशीची मागणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला किती मुदतवाढ देण्यात आली आहे?

    Ans: एनसीएमसी कार्डची सक्ती ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. १ जानेवारी २०२७ पासून कार्ड अनिवार्य होणार आहे.

  • Que: मुदतवाढीचा फायदा कोणत्या प्रवाशांना मिळणार आहे?

    Ans: एसटीच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

  • Que: एनसीएमसी कार्ड नसल्यास ३१ डिसेंबरपर्यंत सवलतीत प्रवास करता येणार का?

    Ans: होय. ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पात्र प्रवाशांना पूर्वीप्रमाणे आवश्यक ओळखपत्र दाखवून सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे.

Web Title: Msrtc ncmc card deadline extended january 1 2027 women senior citizens sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • msrtc
  • NCMC Card
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

ST Bus Accident: एसटी बसस्थानकात भीषण अपघात! ६० वर्षीय महिलेच्या दोन्ही पायांवरून बसचे चाक, प्रकृती गंभीर
1

ST Bus Accident: एसटी बसस्थानकात भीषण अपघात! ६० वर्षीय महिलेच्या दोन्ही पायांवरून बसचे चाक, प्रकृती गंभीर

ST Employees Bonus: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! १० हजारांचा बोनस निश्चित; इतर मागण्यांवर तोडगा कधी? काय म्हणाले परिवहन मंत्री?
2

ST Employees Bonus: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! १० हजारांचा बोनस निश्चित; इतर मागण्यांवर तोडगा कधी? काय म्हणाले परिवहन मंत्री?

MSRTC Employees: एसटी कर्मचाऱ्यांचा संताप वाढला! पीएफ, ग्रॅच्युइटी, दिवाळी भेट अन् महागाई भत्ता रखडला; आंदोलनाचा इशारा
3

MSRTC Employees: एसटी कर्मचाऱ्यांचा संताप वाढला! पीएफ, ग्रॅच्युइटी, दिवाळी भेट अन् महागाई भत्ता रखडला; आंदोलनाचा इशारा

दिवाळी प्रवासासाठी एसटी सज्ज, पुणे विभागाकडून 900 जादा बसचे नियोजन; ‘या’ मार्गांना सर्वाधिक प्रतिसाद
4

दिवाळी प्रवासासाठी एसटी सज्ज, पुणे विभागाकडून 900 जादा बसचे नियोजन; ‘या’ मार्गांना सर्वाधिक प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.