Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Employees Bonus: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! १० हजारांचा बोनस निश्चित; इतर मागण्यांवर तोडगा कधी? काय म्हणाले परिवहन मंत्री?

ST Employees Bonus: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळी बोनसबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांचा बोनस देण्याची घोषणा केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 05, 2026 | 04:14 PM
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! १० हजारांचा बोनस निश्चित; इतर मागण्यांवर तोडगा कधी? काय म्हणाले परिवहन मंत्री?

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! १० हजारांचा बोनस निश्चित; इतर मागण्यांवर तोडगा कधी? काय म्हणाले परिवहन मंत्री?

Follow Us
Follow Us:
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनसचा तिढा सुटला
  • दिवाळीसाठी १० हजार रुपये मिळणार
  • परिवहन मंत्र्यांची घोषणा
ST Employees Bonus: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दिवाळी उत्सवानिमित्त एसटी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांचा बोनस दिला जाणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान, पात्र कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये सण उचल आणि महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज जाहीर केला.

ST Employees: एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! थकीत देणी देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार

एसटी महामंडळातील विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. महामंडळ आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाही कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा आनंद हिरावून घेता येणार नाही, अशी ठाम भूमिका मंत्री सरनाईक यांनी यावेळी मांडली.

“एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र मेहनत करून लाखो प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सेवा देतात. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून दिवाळीच्या सणानिमित्त त्यांना सानुग्रह अनुदान देणे हे केवळ औदार्य नसून त्यांचा हक्क आहे. या निर्णयामुळे महामंडळावर सुमारे १६० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असला, तरी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, हे आमचे आद्य कर्तव्य आहे,” असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या खंबीर पाठबळामुळे एसटी महामंडळाचे भविष्य उज्ज्वल असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन अथवा संपाचे हत्यार उपसू नये, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले. “एसटी ही सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. कोणत्याही आंदोलनामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये. कर्मचारी आणि प्रवासी हे एसटीचे दोन महत्त्वाचे घटक आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर संवादातून मार्ग काढण्यास आम्ही सदैव तयार आहोत,” असेही त्यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असतानाच प्रवाशांना दर्जेदार सेवा देणे आणि एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, या दोन्ही उद्दिष्टांसाठी शासन आणि महामंडळ कटिबद्ध असल्याचे मंत्री सरनाईक यांनी यावेळी अधोरेखित केले.

इतर मागण्यांवर दिवाळीनंतर मार्ग काढणार

एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनसबरोबरच इतर आर्थिक आणि सेवा-संबंधित मागण्यांवरही चर्चा करण्यात आली. मात्र, या सर्व मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्यात आलेला नाही. कर्मचाऱ्यांच्या उर्वरित प्रश्नांवर दिवाळीनंतर मार्ग काढण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. त्यामुळे बोनसची घोषणा झाल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी इतर मागण्यांबाबत दिवाळीनंतर होणाऱ्या निर्णयाकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, १० हजार रुपयांच्या बोनसच्या घोषणेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीपूर्वी बोनस जाहीर झाल्याने कर्मचाऱ्यांना सणाचा आनंद घेण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.

ST Bus Employee: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून ३९१ कोटींचा निधी मंजूर

💡

Frequently Asked Questions

  • Que: एसटी कर्मचाऱ्यांना किती दिवाळी बोनस मिळणार आहे?

    Ans: एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी उत्सवानिमित्त १० हजार रुपयांचा बोनस दिला जाणार आहे.

  • Que: एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनसची घोषणा कोणी केली?

    Ans: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांचा बोनस देण्याची घोषणा केली आहे.

  • Que: एसटी कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांवर कधी निर्णय होणार?

    Ans: कर्मचाऱ्यांच्या बोनससह इतर मागण्यांवर चर्चा झाली असून, उर्वरित प्रश्नांवर दिवाळीनंतर मार्ग काढण्यात येईल, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

Web Title: Msrtc employees diwali bonus 10000 pratap sarnaik announcement sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • Diwali
  • msrtc
  • st bus
  • ST Employees

संबंधित बातम्या

Diwali Dreams: दिवाळीच्या काळात पडणारी ‘ही’ स्वप्ने मानली जातात शुभ, धनलाभासह करिअरमध्ये होऊ शकते प्रगती
1

Diwali Dreams: दिवाळीच्या काळात पडणारी ‘ही’ स्वप्ने मानली जातात शुभ, धनलाभासह करिअरमध्ये होऊ शकते प्रगती

Diwali Eye Safety: दिवाळीच्या आंनदासोबतच डोळ्यांची सुद्धा घ्या काळजी! फटाक्यांपासून संरक्षणासाठी ‘या’ टिप्स करा फाॅलो
2

Diwali Eye Safety: दिवाळीच्या आंनदासोबतच डोळ्यांची सुद्धा घ्या काळजी! फटाक्यांपासून संरक्षणासाठी ‘या’ टिप्स करा फाॅलो

Lakshmi Pujan: गरोदरपणात लक्ष्मीपूजन करता येते का? जाणून घ्या धर्मशास्त्र आणि आरोग्यशास्त्रातील नियम
3

Lakshmi Pujan: गरोदरपणात लक्ष्मीपूजन करता येते का? जाणून घ्या धर्मशास्त्र आणि आरोग्यशास्त्रातील नियम

Narak Chaturdashi 2026: नरक चतुर्दशीला यमदीप लावताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; जाणून घ्या नियम आणि परंपरा
4

Narak Chaturdashi 2026: नरक चतुर्दशीला यमदीप लावताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; जाणून घ्या नियम आणि परंपरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.