Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Legislative Council Election : विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग, इच्छुकांची गर्दी, अर्ज दाखल मात्र शून्य

Maharashtra Legislative Council Election प्रक्रियेला वेग आला असला तरी पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. मात्र, 14 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने राजकीय हालचालींना वेग आला असून आगामी दिवसांत चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 25, 2026 | 06:26 PM
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग, इच्छुकांची गर्दी, अर्ज दाखल मात्र शून्य

विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग, इच्छुकांची गर्दी, अर्ज दाखल मात्र शून्य

Follow Us
Follow Us:
  • विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग
  • पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही
  • १४ इच्छुकांनी घेतले अर्ज
सोलापूर, शहर प्रतिनिधी : सोलापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झाली. मात्र पहिल्याच दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. दरम्यान, विविध पक्षांसह अपक्षांकडून एकूण १४ अर्ज घेण्यात आल्याने आगामी काही दिवसांत राजकीय हालचालींना वेग येणार असल्याचे चित्र आहे.

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून इच्छुकांकडून जोरदार चाचपणी सुरू झाली आहे. भाजपकडे स्पष्ट संख्याबळ असतानाही पहिल्याच दिवशी पक्षाकडून एकही अर्ज न घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पहिल्या दिवशी इंडियन नॅशनल काँग्रेसकडून २, शिवसेना (शिंदे गट) ४, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ३, राष्ट्रीय समाज पक्ष १, बहुजन समाज पार्टी १ आणि अपक्षांकडून ३ अर्ज घेण्यात आले.

Karjat News : सरकारी रस्ता हडप करण्याचा अधिकाऱ्यांचा डाव ? नगरपरिषदेच्या विरोधात शरद पवार गटाचं उपोषण

उमेदवारीचा सस्पेन्स कायम

विधानपरिषद निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी १४ अर्ज विकले गेले असले तरी भाजपकडून एकही अर्ज उचलला गेला नाही. ६१६ पैकी ३०७ मते असलेल्या भाजपचा उमेदवार कोण असणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दोन्ही शिवसेना सक्रिय

शिंदे गटाकडून सर्वाधिक ४ तर ठाकरे गटाकडून ३ अर्ज घेण्यात आले आहेत. दोन्ही गट स्वतंत्रपणे ताकद आजमावणार की महायुती-महाविकास आघाडीचे गणित जुळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसची चाचपणी

९६ मते असलेल्या काँग्रेसकडून २ अर्ज घेण्यात आले आहेत. मात्र पक्ष स्वतःचा उमेदवार देणार की अन्य पक्षाला पाठिंबा देणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रीय समाज पक्ष व बहुजन समाज पार्टीनेही प्रत्येकी एक अर्ज घेतल्याने निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. अपक्षांकडूनही ३ अर्ज घेतले गेल्याने निवडणुकीतील रंगत वाढणार आहे.

निवडणूक कार्यक्रम

आचारसंहिता कालावधी : २५ मे ते २५ जून २०२६
मतदान : १८ जून २०२६मतदार संख्या : ६१६ (नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य)

गोदामांच्या निर्मितीमुळे भिवंडी जलमय होण्याची भीती! तालुका महसूल प्रशासनाने सतर्क राहण्याची आवश्यकता; नागरिकांची अपेक्षा

Web Title: Maharashtra legislative council election no nomination filed on first day 14 applicants collected forms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • Election
  • maharashtra
  • Maharashtra Legislative Council

संबंधित बातम्या

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा
1

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ; सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेचा उलगडा
2

सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ; सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेचा उलगडा

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश
3

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल
4

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.