Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis : इंधनाची वाढती मागणी, साठेबाजीचा संशय; कांद्याचा खरेदी दर 15 रुपये किलो, सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

Devendra Fadnavis News : राज्यात पेट्रोल-डिझेलच्या मागणीत 52 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून, साठेबाजी रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलत असल्याचे सांगितले. दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत खरेदी दर 15 रुपये किलो करण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 26, 2026 | 03:27 PM
BJP will give ticket to women for Vidhan Parishad candidature in Solapur

BJP will give ticket to women for Vidhan Parishad candidature in Solapur

Follow Us
Follow Us:
  • इंधनाची वाढती मागणी, साठेबाजीचा संशय
  • कांद्याचा खरेदी दर 15 रुपये किलो
  • सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
Devendra Fadnavis on Onion Farmers Protest: राज्यात पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या चर्चांदरम्यान महायुती सरकारने महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितले की, राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत अचानक 52 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, सरकारकडून इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू असून नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या मते, अचानक वाढलेल्या मागणीमागे काही भागांमध्ये साठेबाजी (hoarding) होत असल्याचा संशय आहे. काही लोक मोठ्या प्रमाणात इंधन साठवण्याचा प्रयत्न करत असल्याने कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, सरकारकडून कठोर कारवाईची तयारी सुरू आहे.

शेतकऱ्यांच्या कांद्याला भरीव हमीभाव द्या, नाहीतर आम्ही…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठीही सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने कांद्याचा खरेदी भाव साडेतीन रुपयांनी वाढवत तो 15 रुपये प्रति किलो करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर कांद्याची खरेदीही सुरू झाल्याचे सरकारने सांगितले.

कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी राज्य सरकारच्या विनंतीवरून उद्या दिल्लीमध्ये केंद्र सरकारसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत कांद्याच्या किमतीतील चढ-उतार, शेतकऱ्यांचे नुकसान आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवरही निशाणा साधत, “आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच कांदा खरेदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. विरोधकांनी त्यांच्या काळात असा निर्णय घेतला होता का, ते दाखवावे,” अशी टीकाही केली.

फोटो ऑपॉर्च्युनिटी’ शोधत आहेत- सरकारची टीका

काही विरोधक या मुद्द्यावर केवळ राजकारण करत असून फोटो ऑपॉर्च्युनिटी शोधत आहेत, अशी टीका सरकारने केली आहे. “कांदा कापल्यानंतर ज्यांच्या डोळ्यात कधी पाणी येत नाही, असे लोक आज राजकारण करत आहेत. मात्र, महायुती सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असून त्यांच्या हिताचेच निर्णय घेईल, अशी ग्वाही यावेळी फडणवीस यांनी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर पसरलेल्या अफवांमुळे नागरिक नेहमीपेक्षा 52 टक्के जास्तीची इंधन खरेदी करत आहेत. या अतिरेकी खरेदीमुळे तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. ही 52 टक्के अतिरिक्त इंधन खरेदी नेमकी कोण करतंय आणि यामध्ये कोण साठेबाजी करतंय, याचा तात्काळ शोध घेऊन पुरवठा व गृह विभागाने कडक कारवाई करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

आता घरांवर सोलर लावणं झालं सोपं; महावितरणने आणली नवी योजना, वीज बिलात होणार फायदा…

Web Title: Maharashtra onion price hike petrol diesel demand hoarding devendra fadnavis delhi meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Farmers
  • petrol diesel

संबंधित बातम्या

पाहणी दौरे, पंचनाम्यांची नाटकं बंद करा, दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख द्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी
1

पाहणी दौरे, पंचनाम्यांची नाटकं बंद करा, दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख द्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

‘इनर रिंग रोड’च्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांची संमती; पीएमआरडीएकडून योग्य मोबदल्याची ग्वाही
2

‘इनर रिंग रोड’च्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांची संमती; पीएमआरडीएकडून योग्य मोबदल्याची ग्वाही

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश
3

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
4

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.