• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Maharashtra Politics Banner Hording Spotted In Kankavali After Ubt Program

आजचा सत्कार सिंधुदुर्गच्या इतिहासातील काळा दिवस, कणकवली तालुक्यात राजकीय बॅनरबाजी

शिवसेना ठाकरे गटाचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर कणकवली शहरासह कणकवली तालुक्यात काही ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरबाजीनंतर कणकवलीतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 23, 2024 | 12:12 PM
आजचा सत्कार सिंधुदुर्गच्या इतिहासातील काळा दिवस, कणकवली तालुक्यात राजकीय बॅनरबाजी

आजचा सत्कार सिंधुदुर्गच्या इतिहासातील काळा दिवस, कणकवली तालुक्यात राजकीय बॅनरबाजी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कणकवली: कणकवली येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलाथापालथ सुरु आहे. त्यातच अचानक राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेले बॅनर कणकवली तालुक्यात लावण्यात आले आहेत. “श्रीधर नाईक अमर रहे, सत्यविजय भिसे अमर रहे” असं बॅनरवर म्हटलं आहे. शिवाय आजचा सत्कार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील काळा दिवस असा उल्लेख देखील बॅनरवर करण्यात आला आहे. कणकवली तालुक्यात ठिकठिकाणी अशा स्वरूपाचे बॅनर लावण्यात आले आहेत. हे बॅनर माजी आमदार परशुराम उपरकर, राजन तेली यांना उद्देशुन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेदेखील वाचा- मतदानकार्ड नसलं तरी करता येणार मतदान; ‘ही’ ओळखपत्रं धरली जातील ग्राह्य, पण…

माजी आमदार परशुराम उपरकर, राजन तेली यांनी नुकताच ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर आता हे बॅनर कणकवली तालुक्यात झळकू लागले आहेत. हे बॅनर कोणी लावले आणि कोणासाठी लावले याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र ही बॅनरबाजी राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. बॅनरवर म्हटलं आहे की, श्रीधर नाईक अमर रहे, अमर रहे! सत्यविजय भिसे अमर रहे, अमर रहे! सत्यविजय भिसे आम्हाला माफ करा. आजचा सत्कार सिंधुदुर्गच्या इतिहासातील काळा दिवस.

हेदेखील वाचा- एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीच्या वारीवर; निवडणुकीपूर्वी कामाख्या देवीचं घेतलं दर्शन

कणकवली शहरासह कणकवली तालुक्यात नांदगाव, तरेळे, कासार्डे याठिकाणी लावलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या बॅनर वर “आजचा सत्कार, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील काळा दिवस” असा उल्लेख करत या बॅनरवर “श्रीधर नाईक अमर रहे” “सत्यविजय भिसे अमर रहे” असा उल्लेख केलेला आहे. “सत्यविजय भिसे आम्हाला माफ करा” असा देखील उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे. या बॅनरवरील ओळीचा संदर्भ घेतला असता काल मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाकडून कणकवली भगवती मंगल कार्यालय या ठिकाणी माजी आमदार परशुराम उपरकर व माजी आमदार राजन तेली यांचा सत्कार करण्यात आला.

सत्काराचा संदर्भ या बॅनर वर घेत हा बॅनर लावण्यात आल्याचे समजते. यामध्ये श्रीधर नाईक हत्येच्या गुन्ह्यात त्यावेळी परशुराम उपरकर संशयित आरोपी होते. मात्र त्यानंतर ते सदर केसमध्ये निर्दोश सुटले होते. तर सत्यविजय भिसे केसमध्ये देखील राजन तेली हे संशयित आरोपी होते. मात्र ते देखील या केसमध्ये निर्दोष सुटले होते. त्यामुळे उपरकर व तेली यांच्या सत्कारावर भाष्य करणारे बॅनर असल्याची चर्चा आहे. ठिकठिकाणी हे बॅनर कोणी लावले ? याबाबतची उत्सुकता सर्वांनाच आहे. मात्र या बॅनरमुळे आता कणकवलीमधील राजकारण तापणार का, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

Web Title: Maharashtra politics banner hording spotted in kankavali after ubt program

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2024 | 12:05 PM

Topics:  

  • kankavali
  • Maharashtra Political News

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Jio Recharge Plan: केवळ 198 रुपयांत मिळणार दररोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… जिओचा हा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट

Jio Recharge Plan: केवळ 198 रुपयांत मिळणार दररोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… जिओचा हा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट

Oct 27, 2025 | 10:38 PM
Honda सोडून ‘या’ कंपनीच्या Scooter मागे ग्राहकांची धावपळ! झपाझप मिळवला 29 टक्के मार्केटवर ताबा

Honda सोडून ‘या’ कंपनीच्या Scooter मागे ग्राहकांची धावपळ! झपाझप मिळवला 29 टक्के मार्केटवर ताबा

Oct 27, 2025 | 10:13 PM
कर्जतमध्ये शेतकऱ्यांसाठी ‘ड्राय डायरेक्ट पेरणी’ भात तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक; ५०% पाण्याची बचत, उत्पादन वाढणार

कर्जतमध्ये शेतकऱ्यांसाठी ‘ड्राय डायरेक्ट पेरणी’ भात तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक; ५०% पाण्याची बचत, उत्पादन वाढणार

Oct 27, 2025 | 09:50 PM
Devendra Fadnavis: “महाराष्ट्र देशाच्या सागरी व्यापार आणि…”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Devendra Fadnavis: “महाराष्ट्र देशाच्या सागरी व्यापार आणि…”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Oct 27, 2025 | 09:49 PM
Thane News: “अदानीला 33 हजार कोटी देता, तर आम्हाला किमान 33 हजारांचे कर्ज द्या!” शरद पवार गटाची LIC कार्यालयावर धडक

Thane News: “अदानीला 33 हजार कोटी देता, तर आम्हाला किमान 33 हजारांचे कर्ज द्या!” शरद पवार गटाची LIC कार्यालयावर धडक

Oct 27, 2025 | 09:46 PM
श्रीमंतांनाही घाम फोडणारी Rolls-Royce इतकी महाग का? एकच कार बनवायला लागतात ‘इतके’ दिवस!

श्रीमंतांनाही घाम फोडणारी Rolls-Royce इतकी महाग का? एकच कार बनवायला लागतात ‘इतके’ दिवस!

Oct 27, 2025 | 09:22 PM
Crime News: इतका अभ्यास नको रे बाबा! ताण सहन न झाल्याने विद्यार्थ्याने केली आत्महत्या

Crime News: इतका अभ्यास नको रे बाबा! ताण सहन न झाल्याने विद्यार्थ्याने केली आत्महत्या

Oct 27, 2025 | 09:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Oct 27, 2025 | 06:59 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Oct 27, 2025 | 06:54 PM
Raigad : सुनील तटकरे यांनी खोपोलीत निवडणूकीचे रणशींग फुंकले

Raigad : सुनील तटकरे यांनी खोपोलीत निवडणूकीचे रणशींग फुंकले

Oct 27, 2025 | 06:45 PM
Virar Chhath Puja : कोर्टाच्या आदेशानंतर सर्व पक्षीय बैठक, प्रशासनाकडून छट पूजे बाबत मोठा निर्णय

Virar Chhath Puja : कोर्टाच्या आदेशानंतर सर्व पक्षीय बैठक, प्रशासनाकडून छट पूजे बाबत मोठा निर्णय

Oct 26, 2025 | 08:04 PM
Wardha : वर्ध्यात साकारण्यात आली ‘किल्ले लोहगड’ ची आकर्षक प्रतिकृती

Wardha : वर्ध्यात साकारण्यात आली ‘किल्ले लोहगड’ ची आकर्षक प्रतिकृती

Oct 26, 2025 | 07:57 PM
Election : ऑल इंडिया ख्रिश्चन फोरम कडून मोर्चे बांधणीला सुरुवात

Election : ऑल इंडिया ख्रिश्चन फोरम कडून मोर्चे बांधणीला सुरुवात

Oct 26, 2025 | 07:42 PM
Raju Shetti : कायदा – सुव्यवस्थेवरून राजू शेट्टींनी केला गृहमंत्र्यांवर हल्लाबोल

Raju Shetti : कायदा – सुव्यवस्थेवरून राजू शेट्टींनी केला गृहमंत्र्यांवर हल्लाबोल

Oct 26, 2025 | 07:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.