चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चाट खायला खूप जास्त आवडते. पापडी चाट, मिक्स कडधान्याचे चाट तर काहीवेळा वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून सुद्धा चाट बनवले जाते. पण कांदा लसूणचे सेवन न करणाऱ्या व्यक्तींना चाट खाण्याची मजा अजिबात घेता येत नाही. कारण चाट बनवताना त्यात वेगवेगळ्या भाज्या आणि चटण्यांचा वापर केला जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कांदा लसुणचा वापर न करता चविष्ट चाट कटोरी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ संध्याकाळची छोटी मोठी भूक भागवण्यासाठी सुद्धा करू शकता. लहान मुलांच्या पार्टीसाठी नवनवीन पदार्थ शोधत असाल तर वेगवेगळ्या कढधान्यांचा वापर करून बनवलेले चाट अतिशय उत्तम पर्याय आहे. हा पदार्थ कमीत कमी साहित्य आणि झटपट करू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)