Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरोग्य विभागाचे प्रशिक्षण धोरण जाहीर, प्रशिक्षण प्रणालीमध्ये अमुलाग्र बदल – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागाने नवीन प्रशिक्षण धोरण जाहीर केले आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण अनिवार्य असून २८ दिवसांचे स्किल लॅब प्रशिक्षण आणि पाच वर्षांचा प्रशिक्षण आराखडा प्रस्तावित आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 21, 2026 | 09:00 PM
Prakash Abitkar

Prakash Abitkar

Follow Us
Follow Us:

मुंबई,दि.२१: राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीवर भर देण्यात येणार असून प्रशिक्षण प्रणालीमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आले असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

या धोरणानुसार विभागातील सर्व स्तरांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात येणार असून, प्रशिक्षण अधिक परिणामकारक व एकसंध करण्यासाठी राज्यातील प्रशिक्षण संस्थांना सार्वजनिक आरोग्य सेवा प्रशिक्षण संचालनालय, नागपूर यांच्या तांत्रिक व प्रशासकीय नियंत्रणाखाली आणण्यात येणार आहे.

आरोग्य सेवा देणाऱ्या मनुष्यबळाचे ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोन अधिक सक्षम करणे हा प्रशिक्षण धोरणाचा केंद्रबिंदू आहे. प्रशिक्षणाला केवळ प्रशासकीय बाब न मानता मनुष्यबळ विकासातील महत्त्वाची गुंतवणूक म्हणून या धोरणात स्थान देण्यात आले आहे. राज्यातील प्रशिक्षण व्यवस्थेत एकसूत्रता आणून आरोग्य सेवेची गुणवत्ता सुधारण्यावर भर देण्यात आला आहे.

केंद्रीय योजनांच्या निधीचा पूर्ण वापर करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे विभागप्रमुखांना स्पष्ट आदेश

तीन स्तरांवर प्रशिक्षणाची व्यवस्था

राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्था (SIHFW), नागपूर ही सार्वजनिक आरोग्य विभागाची नोडल प्रशिक्षण संस्था राहणार आहे. विभागीय, जिल्हा आणि तालुका स्तरावरील प्रशिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार नवीन प्रशिक्षण केंद्रेही निर्माण केली जाणार आहेत.

पदोन्नतीसाठी प्रशिक्षण अनिवार्य

नवीन कर्मचारी सेवेत रुजू झाल्यानंतर एका वर्षाच्या आत प्रारंभिक प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. पदोन्नतीनंतरही संबंधित प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. तसेच चार ते सहा वर्षांच्या सेवेनंतर मध्य-स्तर उजळणी अभ्यासक्रम आणि दहा वर्षांनंतर प्रगत किंवा वरिष्ठ स्तरावरील प्रशिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. प्रशिक्षण सर्व पदांवरील नियमित तसेच कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य राहणार आहे. प्रशिक्षणास विनापरवानगी अनुपस्थित राहिल्यास प्रचलित नियमानुसार प्रशासकीय कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.

कौशल्य प्रयोगशाळेत प्रत्यक्ष प्रशिक्षण

आरोग्य कर्मचाऱ्यांना केवळ पुस्तकी प्रशिक्षण न देता प्रत्यक्ष कौशल्य आत्मसात करण्यासाठी २८ दिवसांचे निवासी ‘स्किल लॅब’ प्रशिक्षणही प्रस्तावित करण्यात आले आहे. यामध्ये २० दिवस कौशल्य प्रयोगशाळेत सराव, तर आठ दिवस जिल्हा रुग्णालयात प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय आशा, अंगणवाडी सेविका आणि एएनएम यांच्यासाठीच्या प्रशिक्षणात राज्य व जिल्हा स्तरावरील प्रशिक्षकांचा सातत्याने सहभाग राहणार आहे.

पाच वर्षांचा प्रशिक्षण आराखडा

प्रत्येक पदाच्या प्रशिक्षण गरजांचे विश्लेषण करून पाच वर्षांची प्रशिक्षण रूपरेषा आणि वार्षिक प्रशिक्षण आराखडा तयार केला जाणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रम आणि प्रत्यक्ष कामकाज यांचा समन्वय साधण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक आर्थिक तरतूद सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अर्थसंकल्पातून करण्यात येणार असून, हे प्रशिक्षण धोरण योजना म्हणून राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात ‘महा सीएसआर प्राधिकरण’ स्थापन होणार? CSR निधीच्या प्रभावी वापरासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, “दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी सक्षम, कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळ अत्यंत आवश्यक आहे. मानव संसाधन विकास आणि क्षमता विकासाच्या माध्यमातून आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवून राज्यातील नागरिकांना अधिक गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याच्या दिशेने हे प्रशिक्षण धोरण महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.”

सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक म्हणाले, “राष्ट्रीय प्रशिक्षण धोरणाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्याने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तसेच प्रशिक्षण संस्थांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी आराखडा तयार केला आहे. हे धोरण सार्वजनिक आरोग्य सेवेचा दर्जा दृढ करण्यासोबतच आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख होऊन नागरिकांचा आरोग्यसेवेवरील विश्वास वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.”

Web Title: Maharashtra public health department new training policy prakash abitkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • health care news
  • maharashtra
  • Prakash Abitkar

संबंधित बातम्या

Zepto Illegal Vehicles: ‘४८ तासांत कारवाई करा, अन्यथा आंदोलन’; झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवरून युवासेनेचा इशारा
1

Zepto Illegal Vehicles: ‘४८ तासांत कारवाई करा, अन्यथा आंदोलन’; झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवरून युवासेनेचा इशारा

Bhandara News: गणेशपूर होणार ‘कवितेचे गाव’! लाखनी ‘पुस्तकांचे गाव’; मराठी भाषा मंत्री डॉ. सामंत यांची घोषणा
2

Bhandara News: गणेशपूर होणार ‘कवितेचे गाव’! लाखनी ‘पुस्तकांचे गाव’; मराठी भाषा मंत्री डॉ. सामंत यांची घोषणा

Satara News: जलसंवर्धनासाठी हजारो नागरिकांची पावले एकवटली; वॉकेथॉनमधून पाणी वाचवण्याचा निर्धार
3

Satara News: जलसंवर्धनासाठी हजारो नागरिकांची पावले एकवटली; वॉकेथॉनमधून पाणी वाचवण्याचा निर्धार

Dharashiv Zilla Parishad: महिला उद्योजकतेला बळ! प्रत्येक कर्जप्रकरणासाठी सीआरपींना ₹१ हजार; धाराशिवचा राज्यात पहिला प्रयोग
4

Dharashiv Zilla Parishad: महिला उद्योजकतेला बळ! प्रत्येक कर्जप्रकरणासाठी सीआरपींना ₹१ हजार; धाराशिवचा राज्यात पहिला प्रयोग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.