राजू शेट्टी नद्यांवरील पूल व बॅरेजच्या अडथळ्यांवर प्रकाश टाकताना म्हणाले, ‘‘सार्वजनिक बांधकाम विभाग पूल बांधताना ना पर्यावरण तज्ज्ञांचा सल्ला घेते, ना जलतज्ज्ञांचे मत. फक्त ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने पूल उभे राहतात. नद्यांच्या काठावर भराव टाकले जातात. परिणामी पाण्याचा निचरा न झाल्याने पूर स्थिती तीव्र होते,’’ असा आरोपही त्यांनी केला. तसेच ‘‘हिप्परगी बॅरेजच्या भरावामुळे नदीपात्रातील पाणी वाहून न जाता तुंबते, त्यामुळे कराड व वाळवा तालुक्यांमध्ये पूर वाढतो. याशिवाय चिप्परगी (मांजरी) भागातही हेच चित्र दिसत असल्याचे त्यांनी सांगितले,’’
Almatti Dam: अलमट्टी धरण उंचीवाढीच्या विरोधात शेतकरी-नागरिक आक्रमक; कर्नाटक सरकारचा पुतळा जाळला
‘पूर नियंत्रण, अलमट्टी पाणीपातळी, नुकसानभरपाई व नद्यांवरील पुलाचे अडथळे यांवर सरकारने ठोस भूमिका घेतली नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र जनआंदोलन उभारेल. सरकारने याला गभीरतेने घ्यावे. अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.