Maharashtra residents injured in stray dog attacks Information from central leaders
पुणे : देशभरातील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सर्वाधिक महाराष्ट्रातील रहिवासी जखमी झाल्याची माहिती केंद्रीयमंत्री ललन सिंह यांनी संसदेत दिली. केरळच्या एर्नाकुल मतदार संघाचे खासदार हिबी ईडन यांनी पशुपालन आणि डेअरी विभागाशी संबंधित मंत्री सिंह यांना भटक्या कुत्र्यांच्या दहशतीबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना सिंह यांनी धक्कादायक माहिती समोर ठेवली. २०२४ मध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यासंबंधी एकूण ३७ लाख १५ हजार १७३ प्रकरणांची नोंद झाली, त्यामध्ये एकट्या महाराष्ट्रात १३ टक्के प्रकरणे समोर आली. तर तामिळनाडूमध्येही ही संख्या जास्तच आहे. तिसऱ्या क्रमांकावर गुजरात असून, येथे ३ लाख ९२ हजार ८३७ प्रकरणांची नोंद करण्यात आली.
कर्नाटक आणि बिहारचीही अवस्था चिंताजनक आहे. या पाच राज्यांमध्ये नोंद प्रकरणांची संख्या सुमारे २० लाखांपर्यंत जाते, अर्थात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यासंबंधी २० लाख प्रकरणे या पाच राज्यांमध्ये नोंद झाली आहेत. तर उत्तर प्रदेशची लोकसंख्या २० कोटी असूनही येथे सर्वात कमी प्रकरणांची नोंद झाली. येथे दोन लाखांहून कमी प्रकरणे नोंदवली गेली, तर आसामची लोकसंख्या केवळ साडेतीन कोटी असूनही येथेही उत्तर प्रदेशप्रमाणेच प्रकरणे नोंदवले गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महाराष्ट्रात तब्बल ४ लाख ८५ हजार ३४५ प्रकरणांची नोंद झाली आहे. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवणे गरजेचे असल्याचेही यातून स्पष्ट होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्यभरामध्ये भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. यासाठी कर्जत महानगर पालिकेने उपाययोजना देखील केल्या आहेत. कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे.आतापर्यंत शहरात तब्बल 150 हून अधिक कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे.पुणे येथील पेट्स फोर्स संस्थेच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जात आहे. कर्जत नगरपरिषदेच्या वतीने भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी केली जात आहे.कर्जत शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक हैराण झाले होते. ही मोहीम यशस्वी झाल्यास कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होईल आणि कुत्रा चावल्यानंतर विषबाधेचा धोका कमी होऊ शकतो.तसेच त्यांना अँन्टीरेबीजची लस दिली जात आहे.जेणेकरून कुत्रा चावल्यानंतर नागरिकांना विषबाधा होणार नाही. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कुत्र्यांना त्याच ठिकाणी सोडले जात आहे.त्याचवेळी ज्या भागातून त्यांना पकडण्यात आले त्याच भागात सोडले जात आहे.