Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिल्याच पावसात रस्त्यांची चाळण, राज्यातील पायाभूत सुविधांवर ‘कॅग’च्या अहवालाची मोहोर

राज्यातील पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पहिल्याच पावसात अनेक रस्ते आणि पूल खचल्याने नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांच्या अहवालातील गंभीर निरीक्षणांची प्रचिती आल्याचे चित्र दिसत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 05, 2026 | 11:33 AM
पहिल्याच पावसात रस्त्यांची चाळण, राज्यातील पायाभूत सुविधांवर 'कॅग'च्या अहवालाची मोहोर

पहिल्याच पावसात रस्त्यांची चाळण, राज्यातील पायाभूत सुविधांवर 'कॅग'च्या अहवालाची मोहोर

Follow Us
Follow Us:
  • पहिल्याच पावसात राज्यातील अनेक रस्ते आणि पुलांची दुरवस्था उघड झाली.
  • ‘कॅग’ अहवालात रस्ते प्रकल्पांतील आर्थिक व तांत्रिक त्रुटींवर गंभीर ताशेरे ओढण्यात आले होते.
  • निकृष्ट दर्जाच्या कामांवर कारवाई आणि उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे.
प्रशांत बारसिंग। राज्यातील रस्ते आणि पुलांच्या निकृष्ट दर्जाबाबत ‘कॅग’ अहवालाने व्यक्त केलेली चिंता पहिल्याच पावसात खरी ठरली आहे. मान्सूनच्या सुरुवातीच्या सरींनीच राज्यातील रस्ते आणि पुलांची दुरवस्था उघडी पाडली असून, ‘कॅग’ने उपस्थित केलेल्या गंभीर त्रुटींवर जणू काही प्रत्यक्षात शिक्कामोर्तब झाले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले प्रकल्प पहिल्याच पावसात खचू लागल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. केवळ दोन महिन्यांपूर्वी अत्यंत दिमाखात सुरू झालेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर पहिल्याच पावसात मोठमोठे खड्डे पडले आहेत. देशातील अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान वापरून हा मार्ग तयार केल्याचा दावा केला जात होता.

Mumbai News: रस्त्यांवरील झाडांचा गुदमरतोय श्वास! मुंबईत ‘डी-काँक्रिटीकरण’ करा, वॉचडॉग फाउंडेशनची मागणी

गडहिंग्लज-चंदगड रस्त्यावरील पूल खचला

दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज चंदगड रस्त्यावरील हिरण्यकेशी नदीदर नुकत्याच बांधण्यात आलेल्या पुलाचा काही भाग पहिल्याच पावसाने खचला आहे. राज्यातील पायाभूत सुविधांची ही दुरवस्था केवळ अपघाती नसून, त्यामागे नियोजनाचा अभाव आणि भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.

पायाभूत सुविधांमधील त्रुटींवर ताशेरे

  • रस्ते कामात २९७ कोटीची उधळपट्टी मार्च २०२६ च्या ताज्या ‘कॅग’ अहवालानुसार, राज्यात ‘हायब्रिड अॅन्युइटी मॉडेल’ अंतर्गत झालेल्या रस्ते प्रकल्पांमध्ये तांत्रिक चुका आणि सदोष आराखड्यांमुळे तब्बल २९७.९७ कोटी रुपयांचा अनावश्यक खर्च झाला आहे.
  • ८९१ कोटींचे वित्तीय नुकसान विविध विभागांमधील स्थानिक लेखापरीक्षणात सुमारे ८९१.२९ कोटी रुपयांच्या वित्तीय अनियमितता आणि महसूत नुकसानीच्या बाबी कॅगने समोर आणल्या आहेत.
  • १०,००० हून अधिक तक्रारी प्रलचित सरकारी विभागांनी गेल्या दशकभरात कंगने उपस्थित केलेल्या तब्बल १०,३४० ऑडिट परिच्छेदांमधील (तक्रारी/हरकती) त्रुटीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
  • ६५७ पूल जीर्ण अवस्थेत कॅगच्या २०२० च्या विशेष परफॉर्मन्स ऑडिट अहवालानुसार, महाराष्ट्रात तब्बल ६५७ पुल जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत आहेत.
  • १०३ पुलांचे कधीही ऑडिट नाही राज्यातील एकूण १०३ पुलांचे कधीही कोणतेही तांत्रिक किंवा स्ट्रक्चरल ऑडिट (लेखापरीक्षण) झाले नसल्याची धक्कादायक नोंद कंगने केली आहे.
अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल; पुण्यातील ‘अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस’ संस्थेची सुवर्णमहोत्सवी वाटचाल

 

Web Title: Maharashtra roads and bridges collapse in first rains cag report on infrastructure irregularities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • Bad Roads
  • maharashtra
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Cyber Crime: सायबर फसवणुकीला बळी पडू नका! ‘डिजिटल अरेस्ट’बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
1

Cyber Crime: सायबर फसवणुकीला बळी पडू नका! ‘डिजिटल अरेस्ट’बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Chandrapur News: कागदावर क्रीडांगण पूर्ण, प्रत्यक्षात काम अपूर्ण? खडसंगी ग्रामपंचायतीत 24 लाखांच्या कामावर प्रश्नचिन्ह
2

Chandrapur News: कागदावर क्रीडांगण पूर्ण, प्रत्यक्षात काम अपूर्ण? खडसंगी ग्रामपंचायतीत 24 लाखांच्या कामावर प्रश्नचिन्ह

Raigad News: माथेरानमध्ये राजकीय भूकंपाची चाहूल! शिंदे गटात बड्या नेत्यांचा प्रवेशाची चर्चा, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
3

Raigad News: माथेरानमध्ये राजकीय भूकंपाची चाहूल! शिंदे गटात बड्या नेत्यांचा प्रवेशाची चर्चा, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

Pune Municipal Corporation : विकासनिधीवरून BJP-NCP आमनेसामने, धीरज घाटेंचे सुनेत्रा पवार यांना पत्र
4

Pune Municipal Corporation : विकासनिधीवरून BJP-NCP आमनेसामने, धीरज घाटेंचे सुनेत्रा पवार यांना पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.