मुंबई : आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आदी उपस्थित होते. ही बैठक विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दरम्यान, या बैठकीत हिवाळी अधिवेशनातील रणनिती तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ज्यांनी वादग्रस्त वक्तव्यं केली, त्यांच्याविरोधात कोणती भूमिका घ्यायची यावर बैठकीत निर्णय घेण्यात आला.
[read_also content=”अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मविआची बैठक, वंचितबाबत होणार निर्णय? https://www.navarashtra.com/maharashtra/mva-meeting-under-the-chairmanship-of-ajit-pawar-decision-will-be-take-about-vanchit-351194.html”]
दरम्यान, 17 तारखेला मविआ महामोर्चा काढणार आहे, सकाळी 11 वाजता जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा मोर्चा काढणार आहे, असं उद्धव ठाकरेंनी (Udhav Thackeray) सांगितले. भाजपातील महाराजप्रेमीनी देखील या मोर्च्यात सहभागी व्हावे, असं असं उद्धव ठाकरेंनी आवाहन यावेळी केले. हा राजकीय मोर्चा नाही, तर अस्मितेचा प्रश्न आहे. महाराष्ट्र दिनदुबळा करायचा नाही. राज्यपाल हटाव तसेच ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय त्यांच्या विरोधात हा मोर्चा असल्याचं असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात
यावेळी असं उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टिका केली. छत्रपतीचा महाराष्ट्र डाव तोडण्याची काम सुरु आहे. मविआचं सरकार गद्दारी करुन पाडलं, कर्नाटक आता सांगलीनंतर सोलापूरवरही दावा सांगतंय, यावेळी राज्य सरकार नेभळचपणाने शांत आहे. राज्यात फुटीरतेची बीजं रोवली जाताहेत. हे सरकार कायदेशीर की बेकायदेशीर याचा निकाल लागायचा बाकी आहे. राज्यपाल कोणीही येतात आणि काहीही बोलतात, हे ठिक नाही. महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान याचे भाजपाला काहीही नाहीय, गुजरातेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेले. हे राज्य सरकार नेभळट आहे. आज तिन्ही पक्षांची बैठक झाली. तिन्ही पक्षानी एकजूट दाखविण्याची आता गरज आहे. असं असं उद्धव ठाकरेंनी म्हटले. त्यामुळं येत्या 17 डिसेंबरला मविआचा भाजपातील नेते, राज्यपाल व राज्य सरकारच्या विरोधात महामोर्चा काढणार असल्याचं असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.