Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांद्याला हमी भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचा विराट क्रांती महामोर्चा; पुणे- नाशिक महामार्ग रोखला

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष व महाविकास संघर्ष करत राहील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. आज महाविकास आघाडीने पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदेलन केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 02, 2026 | 02:47 PM
कांद्याला हमी भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचा विराट क्रांती महामोर्चा; पुणे- नाशिक महामार्ग रोखला

कांद्याला हमी भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचा विराट क्रांती महामोर्चा; पुणे- नाशिक महामार्ग रोखला

Follow Us
Follow Us:

पुणे : शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी करून मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदा कवडीमोल दराने विकावा लागत आहे. कांद्याला प्रति किलो दोन रुपयेही दर मिळत नाही. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष व महाविकास संघर्ष करत राहील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

 

कांद्याला ३ हजार रुपये हमीभाव मिळावा, कमी भावात विकलेल्या कांद्याला इमुदान द्यावे, शेतकऱ्यांचा सर्व कांदा नाफेडमार्फत खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशा विविध मागण्यांसाठी आज महाविकास आघाडीने पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदेलन केले. पोलिसांकडून धरपकड सुरु असतानाही हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, खासदार निलेश लंके, आमदार बापूसाहेब पठारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार बाबाजी काळे, माजी आमदार अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा : कर्मचारी आणि पेन्शनर्सना दिलासा! मेमोरेंडमची शेवटची तारीख बदलली, कधीपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, वाढती महागाई, शेती उत्पादनाचा वाढलेला खर्च आणि शेतमालाला मिळत नसलेला योग्य भाव यामुळे राज्यातील शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत असून बाजारात कांद्याचे दर घसरल्याने त्यांना उत्पादन खर्चही वसूल होतं नाही. सरकारने कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नाही. कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी, अशी आमची स्पष्ट मागणी आहे. खरेदी प्रक्रियेत व्यापाऱ्यांचा फायदा करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे आणि त्यांना योग्य हमीभाव मिळाला पाहिजे. शेतकरी संकटात असताना सरकारकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने ग्रामीण भागात मोठी नाराजी आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण महाविकास आघाडी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव आणि दिलासा मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरू राहील, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.

Web Title: Mahavikas aghadi has protested for the demands of onion farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Harshvardhan Sapkal
  • Onion News
  • onion price

संबंधित बातम्या

‘म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला फसवणीस नाव दिले’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघाती हल्ला
1

‘म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला फसवणीस नाव दिले’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघाती हल्ला

Vidyanand Bapat Attack: ‘फडणवीस गुंडांना संरक्षण देणार की कायद्याचा धाक दाखवणार?’ मारहाणीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक
2

Vidyanand Bapat Attack: ‘फडणवीस गुंडांना संरक्षण देणार की कायद्याचा धाक दाखवणार?’ मारहाणीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक

Nashik Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी
3

Nashik Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी

Maharashtra Politics: ‘राहुल गांधींनी भाजपाची झोप उडवली’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार, ‘Get Well Soon’ म्हणत लगावला टोला
4

Maharashtra Politics: ‘राहुल गांधींनी भाजपाची झोप उडवली’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार, ‘Get Well Soon’ म्हणत लगावला टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.