Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विरोधक उभारणार EVM विरोधातला लढा; कायदेशीर,रस्त्यावरची लढाईसाठी महाविकास आघाडी सज्ज

ठाकरे गटाचे नेते राजन विचारे म्हणाले की, निवडणुकीच्या आधीच महाराष्ट्रात आठ- पंधरा दिवस आधीपासून महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे दिसत  होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 27, 2024 | 11:14 AM
विरोधक उभारणार EVM विरोधातला लढा; कायदेशीर,रस्त्यावरची लढाईसाठी महाविकास आघाडी सज्ज
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला 230 जागांवर दणदणीत यश मिळाले.  पण  महाविकास आघाडीला मात्र 49 जागांवर समाधान मानावं लागलं. अनेक संस्थांनी  गेल्या निवडणुकीसाठी केलेल्या सर्वेक्षणांमधून अटीतटीची लढाई होणार असल्याचे अंदाज वर्तवले होते. पण यंदाच्या विधानसभा निकालाने महाविकास आघाडीलाच धक्काच नव्हे तर महाविकास आघाडीत भूकंपच घडवून आणला. त्यानंतर राज्यभरातून विरोधी पक्षांच्या उमेदवारांकडून निकालावर आणि ईव्हीएम मशीनसंदर्भात आक्षेप घेण्यास सुरूवात झली. अनेक उमेदवारांनी त्यांच्या मतदारसंघातील इव्हीएम मशीन आणि मतमोजणी केंद्रावरही गडबड झाल्याचा दावा केला. यासंदर्भात अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर फिरू लागले. या सर्व घडामोडींनंतर राज्यातील विरोधी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने ईव्हीएम विरोधात नव्या जनजागृतीची हाक दिली आहे.

काँग्रेस काढणार ‘ईव्हीएम छोडो’ यात्रा?

दोन वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते कश्मीर अशी पायी ‘भारत जोडो’ काढली होती. या यात्रेच्या माध्यमातून देशभरात काँग्रेससाठी अनुकूल वातावरण निर्मिती करण्याचा हा प्रयत्न होता. त्यात त्यांना काही प्रमाणात यशही आले. यानंतर आता राज्यासह काँग्रेसकडून ‘ईव्हीएम छोडो’ यात्रा काढण्यात येणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी  या यात्रेची घोषणा केली आहे.  विधानसभा निवडणुकीच्या निकालनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत इव्हीएम संदर्भातही  बैठक झाली. यात शिवसेनेच्याही अनेक उमेदवारांनी इव्हीएम मशीनसंदर्भात आक्षेप नोंदवले.  त्यानंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतील इतर नेत्यांशी चर्च करून भूमिका घेणार असल्याची माहिती आहे.

सुधीर मुनगंटीवार सातव्यांदा विधानसभेत; बल्लारपूरमधून सलग चौथ्यांदा ठरले विजयी

महाविकास आघाडी कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढणार

निकालानंतर विरोधी महाविकास आघाडीने ईव्हीएम विरोधात कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने कायदेशीर लढाई लढण्यासाठीदेखील तयारी सुरु केली आहे. विशेष  म्हणजे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात ईव्हीएम विरोधात लढा उभा करायचा. आता मागे हटायचं नाही, कायदेशीरच नव्हे तर रस्त्यावरचीही लढाई लढायची. त्यासाठी अनुभवी आणि तज्ज्ञ वकिलांची टीम उभी करण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे.

तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार- राजन विचारे

ठाकरे गटाचे नेते राजन विचारे म्हणाले की, निवडणुकीच्या आधीच महाराष्ट्रात आठ- पंधरा दिवस आधीपासून महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे दिसत  होते. लोकांचाही प्रतिसाद दिसत होता. कित्येक ठिकाणी धनशक्तीचा वापर झाला. काही ठिकाणी 99 टक्के बॅटरी असलेल्या मशीन आढळून आल्या. इव्हीएम विरोधात राज्यभरातून निवडणूक आयोगाकडे एवढया तक्रारी जाऊनही आयोगाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. अनेक ठिकाणी मतदारांनीही इव्हीएममध्ये गडबड असल्याच्या तक्रारी दिल्या होत्या. असंच चालू राहिलं तर एक दिवस देशातील लोकशाही संपून जाईल, त्यामुळे ता रसत्यावरचा लढा लढावाच लागेल. आता जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा निर्णय़ होत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहील, असा एल्गार राजन विचारे यांनी यावेळी केला.

Maharashtra’s power struggle: महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेला का होतोय उशीर?

Web Title: Mahavikas aghadi will form a fight against evm nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2024 | 11:14 AM

Topics:  

  • Mahavikas Aghadi
  • Mallikarjun Kharge
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

मतचोरीवर संपूर्ण देशामध्ये जोरदार चर्चा; राहुल गांधींचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
1

मतचोरीवर संपूर्ण देशामध्ये जोरदार चर्चा; राहुल गांधींचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा

Vote चोरीचे प्रकरण काँग्रेसवरच पलटणार? चव्हाणांच्या कुटुंबियांनी दुबार-तिबार मतदान केलं? भाजपचा गंभीर आरोप
2

Vote चोरीचे प्रकरण काँग्रेसवरच पलटणार? चव्हाणांच्या कुटुंबियांनी दुबार-तिबार मतदान केलं? भाजपचा गंभीर आरोप

राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अडचणी वाढणार? सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
3

राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अडचणी वाढणार? सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला
4

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.