महायुतीचा 'हा' संभाव्य फॉर्म्युला ठरतोय चर्चेचा विषय
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला 230 जागांसह ऐतिहासिक विजय मिळाला. यामध्ये भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या, शिवसेनेच्या शिंदे गटाने 57 तर राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी 41 जागा जिंकल्या. पण त्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळातच नव्हे तर राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या मनतही एकच प्रश्न फिरत आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार. सध्या राज्याचे राजकारण याच प्रश्नाभोवती फिरताना दिसत आहे.
महायुतीत सामील असलेल्या एकनाथ शिंदेंना आपल्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षा आहे. तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी जोर लावला जात आहे. त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात सध्या नाराजीचा सूर उमटू लागला आहे. निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या भाजपने मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. तर महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवाव आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी मागणी होत आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेलाही उशीर होत असल्याची चर्चा सुरू आहे. पण या सर्व गोष्टींमागे गेल्या निवडणुकीच्या निकालानंतर काय काय झालं हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.
CM of Maharashtra: एकनाथ शिंदेंनी धुडकावल्या भाजपच्या ऑफर्स; राजकीय वर्तुळात नाराजीनाट्य सुरू
शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (२६ नोव्हेंबर) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र, राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी शिंदे यांना नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपर्यंत हंगामी मुख्यमंत्री राहण्यास सांगितले.
त्याचवेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊनही मुख्यमंत्रीपदाची स्थिती स्पष्ट झालेली नाही. भाजप आणि शिवसेना यांच्यात आपापल्या नेत्यांच्या मुख्यमंत्रीपदावरून राजकीय मतभेदाची ठिणगी पडली
दरम्यान, दिल्लीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत सांगितले की, भाजप नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र पक्षाकडून अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही. एकनाथ शिंदे यांना केंद्रात पाठवावे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्याबाबत शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे की, विधानसभा निवडणूक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली आणि जिंकली, त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले जावे.
X लॉगआऊट केलं, आता Bluesky वर अकाउंट तयार करायचय? या सोप्या स्टेप्स तुम्हाला
दुसरीकडे भाजप नेत्यांचा दावा आहे की, जनतेने त्यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा दिल्या आहेत, त्यामुळे त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हायला हवा.
राज्यातील नवीन सरकारमधील विभागांचे विभाजन होईपर्यंत भाजप मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची घाई करणार नसल्याचेही भाजपच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
या सगळ्यात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (२५ नोव्हेंबर) एकनाथ शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा मागितला.
मात्र, महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस हेच आपली पहिली पसंती असतील, असे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या वतीने स्पष्ट केले आहे.
Nagarjuna : मुस्लिम धर्माची, उद्योगपतीची मुलगी
पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावावर एकमत होण्यास महाआघाडीला विलंब होऊ शकतो. मंगळवारी सकाळी राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितल्यावर याचे संकेत मिळाले.