Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे होतंय स्मार्ट सीटी! तरीही मावळ भागातील दुर्गम भागांमध्ये आजही भेडसावतीये वीज समस्या

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील दुर्गम भाग जिथे वीजपुरवठ्याची समस्या भेडसावत आहे. याच पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघात बैठक पार पडली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 03, 2025 | 05:55 PM
Mahavitaran meeting regarding power supply to remote areas in Vadgaon Maval Pune News

Mahavitaran meeting regarding power supply to remote areas in Vadgaon Maval Pune News

Follow Us
Close
Follow Us:

वडगाव मावळ : पुणे जिल्हा हा विकसनशील आणि प्रगतीशील मानलो जातो. शिक्षणासह आयटी क्षेत्रामध्ये देखील पुण्याने उंच भरारी घेतली आहे. मात्र आजही पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील दुर्गम भाग जिथे वीजपुरवठ्याची समस्या भेडसावत आहे. याच पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार व अखंड वीजपुरवठा मिळावा या दृष्टीने आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत पुणे मंडळाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांच्या दालनात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सन २०२३-२४ व २०२४-२५ मधील डीपीडीसी निधीतून मंजूर कामांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

यावेळी दुर्गम भागातील वीज समस्या दूर करण्याचा निर्धार करण्यात आला. राजमाची, कळकराईसारख्या दुर्गम भागांतील वीज समस्येवर उपाय शोधत वनविभागाची परवानगी घेऊन तातडीने काम सुरू करावे, असे निर्देश आमदार शेळके यांनी दिले आहेत. आंदर मावळाला सतत भेडसावणारा वीजेचा लपंडाव आता संपायला हवा,” असे सांगत त्यांनी नव्याने मंजूर झालेल्या वडेश्वर सबस्टेशनचे काम त्वरित सुरू करून सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

यावेळी शहरी भागांसाठी ठोस निर्णय करण्याबाबत देखील सखोल चर्चा झाली. कामशेत शहरातील नागरिकांनी वीज वितरण कार्यालयाबाबत व्यक्त केलेल्या असमाधानावर त्वरित उपाय म्हणून फीडर, कंडक्टर आणि जी.ओ.डी. बदलण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच ग्रामीण भागातील जुने झालेल्या डी.पी. बॉक्स तातडीने बदलून नवे बसविण्याचे आदेश देण्यात आले. देहू शहरातील वाढत्या नागरिकीकरणाचा विचार करून स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देखील या बैठकीत देण्यात आले. तर देहूरोड कॅंटोन्मेंट भागातील वीज समस्यांवर विस्तृत चर्चा करून त्यावर तातडीच्या उपाययोजना ठरविण्यात आल्या.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

यावेळी या बैठकीस अधीक्षक अभियंता युवराज जरग, सिंहाजी गायकवाड, कार्यकारी अभियंता केशव काळुमाळी, अतुल देवकर, किरण सरोदे तसेच वडगाव, लोणावळा, तळेगाव, देहू व देहूरोड येथील विद्युत वितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले मावळवासीयांना अखंड, सुरळीत वीजपुरवठा मिळावा हे आमचे प्राधान्य आहे. गावागावांपर्यंत वीजेचा लपंडाव दूर करून दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे हीच आमची बांधिलकी आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व पातळीवर आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत,”

Web Title: Mahavitaran meeting regarding power supply to remote areas in vadgaon maval pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 05:55 PM

Topics:  

  • maval news
  • pune news
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

Pune Ganesh Festival: जगात भारी आमचे पुणे! विसर्जन मिरवणुकीत यंदा ‘ढोल ताशां’च्या नवीन तालांची पर्वणी
1

Pune Ganesh Festival: जगात भारी आमचे पुणे! विसर्जन मिरवणुकीत यंदा ‘ढोल ताशां’च्या नवीन तालांची पर्वणी

Pune Ganesh Festival: गौरी विसर्जनानंतर पुण्यनगरीत गर्दीला उधाण; सलग सातव्या दिवशीही…
2

Pune Ganesh Festival: गौरी विसर्जनानंतर पुण्यनगरीत गर्दीला उधाण; सलग सातव्या दिवशीही…

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पुणे विभागीय महिला सरचिटणीसपदी शर्मिला गायकवाड यांची निवड
3

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पुणे विभागीय महिला सरचिटणीसपदी शर्मिला गायकवाड यांची निवड

Ganeshotsav 2025 : मुंबईच्या धर्तीवर पुण्यातील गणेशोत्सव; डोळ्याचे पारणे फेडणारी 22 फूटी उंच गणपती मूर्ती
4

Ganeshotsav 2025 : मुंबईच्या धर्तीवर पुण्यातील गणेशोत्सव; डोळ्याचे पारणे फेडणारी 22 फूटी उंच गणपती मूर्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.