Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे १४ कोटींची ‘जलजीवन योजना’ रखडली; मसूर गावात पाण्यासाठी भटकंती

Jal Jeevan Mission- ग्रामपंचायतीकडून महावितरणसोबत वारंवार समन्वय साधण्याचा प्रयत्न केला गेला. यापूर्वी अनेकदा थकीत बिलांचे समायोजन ओगलेवाडी येथील कार्यकारी अभियंत्यांनी केले होते. परंतु सहा वर्षांपासून महावितरणने गावाचा मालमत्ता कर भरला नाही.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 15, 2026 | 09:38 AM
water crisis Satara, Jal Jeevan Mission, Satara News,

water crisis Satara, Jal Jeevan Mission, Satara News,

Follow Us
Follow Us:
  • सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक मसूर गाव सध्या भीषण पाण्याच्या संकटात
  • महावितरणने संपूर्ण गावाला ‘वेठीस’ धरल्याचा ग्रामस्थांचा  आरोप
  • सहा वर्षांपासून महावितरणने गावाचा मालमत्ता कर भरला नाही.
Jal Jeevan Mission In Masur : महावितरण कंपनीच्या उदासीन व आडमुठ्या धोरणामुळे सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक मसूर गाव सध्या भीषण पाण्याच्या संकटात आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत मंजूर झालेली १४ कोटी रुपयांची नळपाणी पुरवठा योजना पूर्णत्वास आली. मात्र केवळ एका वीज कनेक्शनअभावी संपूर्ण गावाला पाण्यासाठीची भटकंती सुरू आहे….. एकंदरीत महावितरणने मसूरची पेयजल योजना रखडवली.

माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सहकार्याने, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा भव्य प्रकल्प मंजूर झाला. मात्र, ग्रामपंचायत थकीत बिलाचे समायोजन करण्यास तयार असतानाही, महावितरणने संपूर्ण गावाला ‘वेठीस’ धरल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांचा आहे.

पंढरपूर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

एकीकडे ग्रामीण भागातील प्रत्येक घराला शुद्ध पाणी देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून ‘जल जीवन मिशन – हर घर जल’ आणि ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम’ यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून या योजनांच्या डिजिटल मॅपिंग व देखभालीसाठी विशेष प्रोत्साहन दिले जात असताना, महावितरणच्या अकार्यक्षम व बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे सरकारच्या चांगल्या योजनांची पायमल्ली होत आहे.सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (CEO) आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणात तातडीने लक्ष घालून महावितरणला कठोर निर्देश द्यावेत, अन्यथा गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होईल. असा इशाराही देण्यात आला आहे.

 

महावितरण व ग्रामपंचायतची परस्पर विरोधी ताठर भूमिका

ग्रामपंचायतीकडून महावितरणसोबत वारंवार समन्वय साधण्याचा प्रयत्न केला गेला. यापूर्वी अनेकदा थकीत बिलांचे समायोजन ओगलेवाडी येथील कार्यकारी अभियंत्यांनी केले होते. परंतु सहा वर्षांपासून महावितरणने गावाचा मालमत्ता कर भरला नाही. दुसरीकडे ग्रामपंचायत महावितरणचे बिल भरत नाही, अशा परस्परविरोधी व ताठर भूमिकेमुळे हा विषय चिघळला आहे. विभागीय कार्यकारी अभियंत्यांनी कोणतीही सकारात्मक, लवचिक भूमिका न घेतल्याने मसूरकरांवर ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे.

पंढरपूर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

महवितरणचे आडमुठे धोरण… प्रकल्प रखडवला

१४ कोटींच्या नवीन योजनेचे सर्व काम शंभर टक्के पूर्ण झाले. विजेसाठी ‘डीपी’ (रोहित्र) उभारण्यात आला. आता केवळ एक मुख्य वायर ओढून कनेक्शन देणे बाकी आहे. मात्र महावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे कोट्यवधींचा हा प्रकल्प रखडला आहे…. किंबहुना वितरणने योजनेला कात्रजचा घाट दाखवला आहे.

 

– मानसिंगराव जगदाळे, अर्थ व शिक्षण माजी सभापती जि. प.

जलजीवन मिशन योजनेच्या जुन्या जीआर (शासकीय निर्णय) मध्ये काळाच्या गरजेनुसार ऐतिहासिक बदल घडवून आणला. योजनेविषयी सातत्याने आवाज उठवला. विविध उच्चस्तरीय चर्चासत्रांमधून या योजनेतील त्रुटींवर बोट ठेवत अभ्यासपूर्ण स्पष्टीकरणे मांडली. ‘मसूर’ हे नाव राज्यासह देशपातळीवर अभिमानाने पोहोचले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला दरडोई प्रतिदिन मिळणारा पाण्याचा कोटा ४० लीटरवरून थेट ७० लीटर मंजूर करून घेण्यात आला. योजनेसाठी लागणारा वाढीव निधी देखील मंजूर करून आणला. यामुळे ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याला मोठी गती मिळणार आहे.

 

‘तृणमूल’ मध्ये बंडखोरीला नवे वळण, बंडखोर खासदार होणार नव्या पक्षात विलीन, NDA ला देणार पाठिंबा?

महावितरणची ताठर भूमिका – थकीत बिलाच्या समायोजनास नकार. महावितरणने संपूर्ण गावाला वेठीस धरले.

शासकीय धोरणांना हरताळ – सरकारकडून पेयजल योजनांना मोठे प्रोत्साहन, मात्र स्थानिक महावितरणकडून अडथळ्यांची शर्यत.

हजारो नागरिक पाण्याविना – चावडी चौक, पोस्ट गल्ली, शेंबडे चौक, जुनी व्यापारपेठ, गावठाण विभागातील शिक्षक कॉलनी, संतोषीमाता नगर, शिवाजीनगरसह दक्षिण भागास तीव्र पाणीटंचाईच्या झळा.

मसूरची उपेक्षा का? – उंब्रज, पाली, गोवारे या ठिकाणच्या पेयजल योजना मार्गी केवळ मसूरची उपेक्षा का? असा ग्रामस्थांचा वीज महवितरणासह प्रशासनाला सडेतोड प्रश्न.

जुनी यंत्रणा निकामी – पाणीपुरवठा यंत्रणा व जुनी पाईपलाईन क्षाराने बंदिस्त व पूर्णपणे खराब झाल्याने पाण्याचा अगदीच कमी दाबाने पुरवठा. ग्रामस्थांना पाण्यासाठी करावी लागतेय भटकंती.

प्रशासनाकडे हस्तक्षेपासह कारवाईची मागणी – सद्यस्थितीत पाण्याच्या टंचाईची झळ बसत असल्याने लोकहित लक्षात घेऊन जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करून तातडीने कठोर कारवाई करण्याची गरजेचे.

 

Web Title: Mahavitarans stubborn attitude halts 14 crore jal jeevan mission in masur village satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • Satara News
  • Water Crisis
  • water issues

संबंधित बातम्या

Pune Water Supply: पुण्याला सम आणि विषम तारखांनुसार होणार पाणीपुरवठा; नवे वेळापत्रक जाहीर
1

Pune Water Supply: पुण्याला सम आणि विषम तारखांनुसार होणार पाणीपुरवठा; नवे वेळापत्रक जाहीर

पाटण शहरातील अतिक्रमणांवर कारवाई न केल्यास आंदोलन करू, सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ यांचा इशारा
2

पाटण शहरातील अतिक्रमणांवर कारवाई न केल्यास आंदोलन करू, सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ यांचा इशारा

छ. संभाजीनगरकरांची पाणी कोंडी फुटणार! मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण; नव्या योजनेतून पाणीपुरवठा सुरू होण्याची चिन्हे
3

छ. संभाजीनगरकरांची पाणी कोंडी फुटणार! मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण; नव्या योजनेतून पाणीपुरवठा सुरू होण्याची चिन्हे

Bhandup News: पाण्यासाठी भांडुपकरांचा संघर्ष! कमी दाबामुळे उंच भागातील वस्त्या तहानलेल्या, नागरिक हैराण
4

Bhandup News: पाण्यासाठी भांडुपकरांचा संघर्ष! कमी दाबामुळे उंच भागातील वस्त्या तहानलेल्या, नागरिक हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.