
Mahayuti alliance has emerged victorious in Nanded, dealing a major blow to the opposition
Nanded News : नांदेड : जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या ‘अग्निपरीक्षेत’ आमदार श्रीजया चव्हाण, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर आदी आमदार पास झाले असून आमदार भीमराव केराम, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार,आमदार जितेश अंतापूरकर, आदी आमदार सपशेल अपयशी ठरले आहेत, या सर्व आमदारांना अति आत्मविश्वास नहला आहे.
नगरपालिका निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार अजित गोपछडे काँग्रेसचे खासदार रविंद्र चव्हाण यांच्यासह सर्वच आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कंधार लोहा नगरपालिका निवडणुकीची जबाबदारी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी खांद्यावर घेतली होती, या निवडणुकीत सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्याने राज्यात व केंद्रात मित्र असणारे महायुतीतील पक्ष एकमेकाच्या विरोधात लढले.
हे देखील वाचा : दिल्लीकरांचा कोंडतोय श्वास; भारताला वायू प्रदुषण नियंत्रित करणाऱ्या मॉडेलची गरज
भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार गजानन सुर्यवंशी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शरद पवार यांच्यात थेट लढत झाली. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस (अप) यांना १० हजार ९९१ मते मिळाली तर भाजपचे गजानन सूर्यवंशी यांना ८ हजार १९६ मते मिळाली. पवार यांनी सूर्यवंशी यांचा २ हजार ८३२ मतांनी पराभव केला, लोह्यात भाजपला परिवारवाद भोवाला असून अतिआत्मविश्वास नडला आहे. मतदारांनी पुन्हा एकदा आमदार चिखलीकर यांचे सर्वसमावेशक नेतृत्व मान्य केले आहे.
लोह्यातील विजपाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसला कंधारमध्ये विजय मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु कंधारमधील मतदारांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीता प्रतापरावांना ‘हात’ देत काँग्रेसला भक्कम साथ दिली आहे. काँग्रेसचे शहाजी अरविंदराव नळगे यांना ८,७६० मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस अ.प. गटाचे स्वप्नील लुंगारे यांन २ हजार ३४९ मतांनी पराभव केला. कंधारमध्ये काँग्रेसला मिळालेल विजय आमदार चिखलीकरांना धक्का देगारा ठरला असून मतदारांनी विकासाची जाण असणाऱ्या नळगे परिवारावर पुन्हा एकदा विश्वास दाखविला आहे.
‘लोहा कमावले… कंधार गमावले ‘अशा शब्दात कंधारच्या पराभवाबद्दल लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
मुखेड नगरपालिकेच्या निवडणुकीत आ. डॉ. तुषार राठोड, व त्यांचे बंधू गंगाधर राठोड यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपला मुखेडमध्ये शतप्रतिशत यशश मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जाता होता. परंतु अंतर्गत सर्वेक्षणात भाजपची नगराध्यक्षपदाची जागा धोक्यात आहे, असे सांगण्यात आले होते. राठोड बंधूंना अति आत्मविश्वास नडला असून मुखेड वासीयांनी त्यांना साफ धुत्कारले आहे. भाजपच्या उमेदवार विजया धोंडूराम देबडवार (शिवसेना) यांनी २ हजार ८६ मतांनी विजय मिळविला असून भाजपाच्या विजया राम पत्तेवार यांचा पराभव केला आहे.
हे देखील वाचा : स्वतंत्र लढत, एकत्रित यश ; महायुतीची अंतर्गत संघर्षाची ‘ती’ स्ट्रॅटेजी यशस्वी
बिलोली नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने उमेदवार उभे केले नव्हते मरावाडा जनहित पार्टीने घवघवीत यश मिळविले आहे. माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी ४०२६ मते मिळविली असून त्यांनी काँग्रेसचे भरत पवार यांना २ हजार ९०३ मते मिळाली आहेत. कुलकर्णी यांनी पवार यांचा ११२३ मतांनी पराभव केला आहे. कुंडलवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद दीर्घ काळ भूषविलेले के, रामलू यांच्या कुलवधू भाजपाच्या उमेदवार प्रेरणाताई कोटलावार यांनी राष्ट्रवादी कविसचे व्ही.सी. कुडमूलवार यांचा पराभव केला आहे. कोटलावार यांचा विजय पक्का असल्याची चर्चा सुरुवातीपासून सुरू होती.
चुरशीची निवडणूक
हिमायतनगरमध्ये भाजप व शिंदे शिवसेनेमधील अंतर्गत कलहाचा फायदा काँग्रेसला झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व शुन्य असल्याचे या निकालावरून दिसून आले आहे. शेख रफीक शे. महेबुब यांना ६ हजार ६५० मते मिळाली तर भाजपचे डॉ. राजेंद्र वानखेडे यांना ४ हजार २८१ मते मिळाली २.३६९ मतांची आघाडी ही काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीची आणि योग्य उमेदवार निवडीची पावती ठरली. किनवट नगरपालिकेच्या निवडणुकीतही भाजपचे आमदार भीमराव केराम यांना पक्षांतर्गत कलहाचा फटका बसला नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मच्छेवार यांना उमेदवारी दिल्यामुळे उफाळलेली नाराजी भाजपच्या पराभवाचे कारण ठरली असून आ. केराम यांच्या एकाधिकारशाहीला किनवटकरांनी या माध्यमातून चपराक दिली आहे. शिवसेना उबाठा गटाच्या सुजाता येंडूलवार यांनी ३९९६ मतांनी विजय मिळवला.